गव्हाच्या पिकात दाणे भरण्याच्या टप्प्यातील कार्ये आणि फवारणी

  • गव्हाच्या पिकात दाणे भरण्याचा टप्पा अत्यंत महत्वाचा असतो. 
  • या टप्प्यात ओंबीत दाणे भरतात. अशा वेळी सिंचन अत्यंत महत्वाचे असते. 
  • त्याबरोबरच दाण्यांच्या भरघोस वाढीसाठी होमोब्रासिनोलिड 0.04% @ 100 मिली 00:52:34 सह @ 1 किग्रॅ/ एकर फवारावे.
  • खताची तिसरी मात्रा म्हणून युरिया @ 40 किग्रॅ आणि सूक्ष्म पोषक द्रव्ये @ 8 किग्रॅ/ एकर द्यावे. 
Share

गव्हावरील शीर्ष करपा रोगाचे नियंत्रण

  • रोगमुक्त, प्रमाणित बियाणे वापरावे.
  • लागण झालेली रोपे उपटून नष्ट करावीत. त्यामुळे रोगाचा फैलाव रोखला जातो.
  • कार्बोक्सिन 37.5 + थिराम 37.5% @ 2.5 ग्रॅ/ किलो बियाणे वापरून बीजसंस्करण करावे.
  • दर आठवड्याला कसुगामायसिन 5% + कॉपर ऑक्सीक्लोराईड 45% डब्ल्यूपी 320 ग्रॅ/ एकर फवारावे किंवा
  • थियोफनेट मिथाईल 70% डब्ल्यू पी 300 मिली/ एकर फवारावे.
Share

गव्हावरील शीर्ष फुलोरा उत्स्फोट रोगाचे निदान

  • रोगग्रस्त रोपांच्या पानांवर डोळ्याच्या आकाराचे, फिकट करड्या रंगाचा केंद्रबिंदू असलेले गडद तपकिरी व्रण दिसतात. दिसतात.
  • उत्स्फोटामुळे गव्हाच्या ओंब्यांवर परिणाम होतो. लागण सुरु होताना शीर्ष फुलोरा रंगहीन दिसू लागतो.
  • बुरशीमुळे गव्हाच्या ओंब्या पूर्णपणे रंगहीन होतात. 
Share

गव्हातील राखाडी तांबेर्‍याचे नियंत्रण

गव्हातील राखाडी तांबेर्‍याचे नियंत्रण

  • हा रोग बुरशीजन्य आहे.
  • याची लक्षणे 10-14 दिवसात दिसू लागतात.
  • ही बुरशी पानांच्या वरील पृष्ठभागावरून सुरू होऊन बुडावर लाल-नारिंगी रंगाचे डाग पाडते. हे डाग 1.5 एम.एम. आकाराचे अंडाकृती असतात.
  • या रोगाचा फैलाव 15 -20° से.ग्रे. तापमान असताना होतो.
  • याचे जिवाणू हवा, पाऊस, सिंचनाद्वारे संक्रमण करतात.

नियंत्रण-

  • पीक चक्र अवलंबावे.
  • रोग प्रतिरोधक बियाणे पेरावे.
  • बीजसंस्करण किंवा उर्वरक उपचार केल्याने पेरणीनंतर चार आठवडे तांबेर्‍याचे नियंत्रण होते आणि त्यानंतर औषधे वापरता येतात.
  • एकच सक्रिय घटक असलेली बुरशीनाशके पुन्हापुन्हा वापरू नये.
  • कासुगामाईसिन 5% + कॉपर ऑक्सीक्लोरिड 45% डब्लू.पी. 320 ग्रॅम/एकर या प्रमाणात किंवा प्रोपिकोनाज़ोल 25% ई.सी. 240 मिली /एकर या प्रमाणात फवारावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

गव्हावरील तांबेऱ्याचे निदान

  • पानावरील तांबेरा बुरशीमुळे होतो. 
  • रोगाचे पहिले लक्षण (बीजाणूकजनन) लागण झाल्यानंतर 10-14 दिवसांनी आढळून येते.
  • पानाच्या तांबेरा रोगात लालसर-केशरी रंगाचे, 1.5 मिमी आकाराचे, गोल ते अंडाकार बीजाणू तयार करते .
  • ते पानाच्या वरील बाजूला आढळतात. हे पानावरील तांबेरा आणि पानाच्या दोन्ही बाजूंच्या पृष्ठभागावर आढळणाऱ्या खोडावरील तांबेऱ्यातील फरक ओळखण्याचे लक्षण आहे.
  • बीजाणूना गव्हावर यशस्वी हल्ला करण्यासाठी 15 ते 20º सेल्सियस तापमान आणि दव/ पाऊस/ सिंचनाने पानांवर निर्माण झालेली आद्रता आवश्यक असते. 
Share

गव्हाच्या पिकातील मुळावरील माव्याचे नियंत्रण

  • गव्हाच्या पिकात सहसा नोव्हेंबर-फेब्रुवारी या काळात माव्याचा हल्ला होतो.
  • पावसाळी पिकात आणि उशिरा पेरणी केलेल्या पिकात ही कीड जास्त हानी करते.
  • गव्हाच्या बुडाजवळ लहान पिवळे डास आढळून येतात.
  • त्यांनी रोपातला शोषल्याने रोपे पिवळी पडतात.
  • हे कीटक विषाणूजन्य रोगांच्या फैलावास देखील मदत करतात.
  • या किडीमुळे उत्पादनात 50% पर्यन्त घट येऊ शकते.

नियंत्रण-

  • पिकाची पेरणी उशिरा करू नये.
  • यूरियाचा अनावश्यक आणि अतिरिक्त वापर करू नये.
  • उभ्या पिकावर इमिडाक्लोप्रिड 17.8% SL 60-70 मिली प्रति एकर फवारावे.
  • किंवा थायमेथॉक्ज़ाम 25% WG @ 100 ग्रॅम प्रति एकर खत/वाळू, मातीत मिसळावे आणि त्यानंतर सिंचन करावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

गव्हावरील लष्करी अळी/ कातर किड्यांचे नियंत्रण

गव्हावरील लष्करी अळी/ कातर किड्यांचे नियंत्रण:-

  • पानगळ हे या किडीच्या उपस्थितीचे प्राथमिक लक्षण आहे.
  • हिचे लार्वा पानांना हानी पोहचवतात.
  • तीव्र लागण खूप विनाशकारी असू शकते. अशा परिस्थितीत लार्वा रोपांच्या वरील भागापर्यंत पोहोचून ओंब्यांच्या खालील भागाला कुरतडतात. काही प्रजाती मातीत राहून पिकाच्या मुळांना हानी पोहोचवतात.
  • लष्करी अळी सकाळी आणि संध्याकाळी हानी करते.

नियंत्रण-

  • या किडीचे लार्वा पानांच्या खालील बाजूस आढळतात. त्यांना सहजपणे हाताने पकडून नष्ट करता येते.
  • पक्षांना आकर्षित करण्यासाठी एकरी 4-5 ‘’T’’ आकाराच्या खुंटया गाडाव्यात.
  • रासायनिक उपचार करण्यासाठी इमामेक्टिन बेंजोएट (5% एस.जी) 100 ग्रॅम/एकर किंवा फिप्रोनिल (5% एस.सी) 400 मिली/एकरची फवारणी करावी.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Management of termite

  • पेरणीपूर्वी खोलवर नांगरणी करावी.
  • चांगले कुजलेले जैविक खत वापरावे.
  • उधईच्या वारुळात रॉकेल (केरोसीन) भरावे.
  • पेरणीपूर्वी क्लोपिरिफॉस (20% ईसी) @ 5 मिली/ किग्रॅ वापरून बीजसंस्करण करावे.
  • कोणत्याही खताबरोबर क्लोपिरिफॉस (20% ईसी) @ 1 लिटर/ एकर द्यावे.
  • ब्यूव्हेरिया बस्सीयाना 1 किग्रॅ/ एकर द्यावे.
  • फॅक्स ग्रॅन्युले 7.5 किग्रॅ/ एकर द्यावे. 

Share

Identification of termite on wheat crop

  • पेरणीनंतर लगेचच आणि काहीवेळा पक्वतेच्या थोडे आधी देखील उधई पिकाची हानी करते.
  • कीड वाढत्या रोपांची मुळे, खोडे मृत उतींसह खाते आणि सेल्युलोजवर चरते.
  • हल्ला झालेली रोपे पूर्णपणे वाळतात आणि सहजपणे उपटली जातात.
  • उशिरा हानी झालेल्या रोपांची कानी पांढरी पडते.
  • सिंचन न केल्यास आणि पेरणीपूर्वी शेतात न कुजलेले जैविक खत वापरलेले असल्यास उपद्रव तीव्र असतो.

Share

Management of root aphid in Wheat

  • उशिरा पेरणी करणे टाळावे..
  • नत्र खतांचा अतिरिक्त वापर टाळावा.
  • उभ्या पिकात लागण झाल्यास इमिडाक्लोप्रिड 17.8% एसएल @ 60-70 मिली/ एकर फवारावे
  • किंवा सिंचन करण्यापूर्वी थियामेथोक्साम 25% डब्ल्यूजी @ 100 ग्रॅम + ब्यूव्हेरिया बसीयाना 2 किग्रॅ/ एकर या प्रमाणात खत/ वाळू/ मातीत मिसळून शेतात घालावे.

Share