Picking of Tomato

टोमॅटोची तोडणी

टोमॅटोची तोडणी त्याच्या वापरावर अवलंबून असते. सामान्यता चार अवस्था आढळून आलेल्या आहेत.

  • हिरवी फळे:- पुर्णपणे विकसित हिरवी फळे दूरवरच्या बाजारपेठेसाठी तोडली जातात.
  • गुलाबी फळे:- फळांची टोके गुलाबी किंवा लाल रंगाची झाल्यावर फळांची स्थानिक बाजारपेठेसाठी तोडणी केली जाते.
  • परिपक्व फळे:- फळे जवळपास लाल होतात आणि मऊ पडण्यास सुरुवात होते,
  • पूर्ण परिपक्व फळे:- फळे पुर्णपणे लाल आणि मऊ होतात. अशा फळांना डबा बंद करण्यासाठी आणि प्रोसेसिंगसाठी तोडतात.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

How to improve flowering in tomato

टोमॅटोच्या पिकातील फुलोर्‍याच्या वृद्धीसाठी उपाययोजना

  • खालीलपैकी काही उत्पादने वापरुन टोमॅटोच्या पिकावरील फुलांची संख्या वाढवता येते.
  • होमोब्रासिनोलॉइड 0.04% डब्लू/डब्लू 100-120 मिली/ एकर फवारावे.
  • समुद्री शेवाळाचे सत्व 180-200 मिली/ एकर या प्रमाणात वापरावे.
  • सूक्ष्म पोषक तत्त्वे 300 ग्रॅम/ एकर फवारावीत.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Control of leaf curl disease in tomato

Share

Advantages of PSB in Tomato

टोमॅटोच्या पिकासाठी फॉस्फरस विरघळवणार्‍या जिवाणूचे महत्व

  • हे जिवाणू फॉस्फरससह मॅंगनीज, मॅग्नेशियम, आयर्न, मॉलिब्डेनम, झिंक आणि कॉपर यासारख्या सूक्ष्म पोषक तत्वांना देखील रोपांना पुरवण्यास सहाय्य करतात.
  • ते मुळांचा वेगाने करण्यास सहाय्य करतात. त्यामुळे रोपाला पाणी आणि पोषक तत्वे सहजपणे मिळतात.
  • पीएसबी काही मॅलिक, सक्सिनिक, टार्टरिक अॅसिड आणि अॅसिटीक अॅसिड यासारखी काही खास जैविक आम्ले बनवतात. ही आम्ले फॉस्फरसची उपलब्धता वाढवतात.
  • ते रोग आणि शुष्कतेबाबतची प्रतिरोधकता वाढवतात.
  • त्यांचा वापर करण्याने फॉस्फेटिक उर्वरकांची आवश्यकतेत 25 -30% घट होते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Nutrient management in tomato

टोमॅटोसाठी पोषक तत्वांचे व्यवस्थापन

  • जमिनीची मशागत करताना एकरी 6-8 टन शेणखत/ कम्पोस्ट मातीत चांगल्या प्रकारे मिसळावे.
  • एकरी डीएपी @ 70 किलो, यूरिया @ 105 किलो, एमओपी @ 50 किलो वापरावे.
  • नत्रची (नायट्रोजन) चतुर्थ्यांश आणि पालाशची (पोटाश) प्रत्येकी अर्धी मात्रा पेरणीनंतर 20-30 दिवसांनी वापरता येते.
  • एकरी बोरेक्स 4 किलो आणि झिंक सल्फेट 20 किलो मूलभूत मात्रा म्हणून वापरावे आणि यूरिया पेरणीनंतर 30 व्या दिवशी एकरी 30 किग्रॅ वापरावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Irrigation in Tomato

टोमॅटोच्या पिकासाठी सिंचन

  • पिकाला साधारणपणे 8-12 दिवसांच्या अंतराने सिंचित केले जाते.
  • उन्हाळी पिकाला 5-6 दिवसांच्या अंतराने सिंचनाची आवश्यकता असते.
  • सामान्यता सिंचनासाठी खुल्या पाटांचा पद्धतीचा (ओपन फ्लो) वापर केला जातो.
  • फुलोरा येण्याच्या अवस्थेत पीक असताना पाण्याचा अभाव असल्यास फलन आणि उत्पादनावर विपरीत परिणाम होतो.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Sowing time Suitable of Tomato Cultivation-

टोमॅटोच्या पेरणीसाठी योग्य वेळ:-

  • टोमॅटोचे पीक खरीप, रब्बी आणि जायद या तिन्ही हंगामात घेता येते.
  • रब्बीच्या हंगामात धुके पडत असल्याने त्याच्या उत्पादनात घट येते.
  • खरीपाच्या हंगामात पीक घेतल्यास त्याचे पुनर्रोपण जुलै महिन्यात होते.
  • रब्बीच्या हंगामातील पिकाचे पुनर्रोपण ऑक्टोबर महिन्यात होते.
  • जायद हंगामातील पिकाचे पुनर्रोपण फेब्रुवारी महिन्यात होते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Control of Fruit borer in Tomato

टोमॅटोवरील फळे पोखरणार्‍या किडीचे नियंत्रण:-

  • फळे पोखरणारी अळी भोक पाडून फळात शिरते आणि त्याला संपूर्णपणे नष्ट करते. त्यामुळे गुणवत्ता आणि उत्पादनाचे खूप नुकसान होते.
  • या किडीच्या प्रभावी नियंत्रणासाठी प्रोफेनफोस 40% ईसी @ 400 मिलीलीटर / एकर किंवा इंडोक्सकार्ब 14.5% एससी @ 200 मिलीलीटर /एकर किंवा इमामेक्टिन बेंजोएट (5% एस.जी) 80 ग्रॅम/एकर फवारावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Nursery bed preparation for Tomato

टोमॅटोसाठी नर्सरी बनवणे:-

  • वाफ्यांची लांबी 3 मी., रुंदी 0.6 मी. आणि ऊंची 10-15 से.मी. असावी.
  • दोन नर्सरी वाफ्यात 70 से.मी. अंतर असावे. त्यामुळे नर्सरीत निंदणी, खुरपणी, सिंचन करणे इत्यादि अंतर्गत क्रिया सहजपणे करणे शक्य होईल.
  • नर्सरी वाफ्यांचा पृष्ठभाग भुसभुशीत, सपाट, उंच असावा आणि त्यात पाण्याच्या निचर्‍याची योग्य व्यवस्था असावी.
  • नर्सरी वाफ्यात पेरणी करण्यापुर्वी मॅन्कोझेब वापरुन मृदा संस्करण करावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Control of Late Blight in Tomato

टोमॅटोच्या उशिरा अवस्थेतील अंगक्षय रोगाचे नियंत्रण:-

  • या रोगाची लागण रोपाच्या कोणत्याही अवस्थेत पानांवर होते.
  • करडे आणि काळपट जांभळे डाग पर्णवृन्त, कोंब, फळे आणि खोडाच्या कोणत्याही भागावर पडतात.
  • संक्रमणाच्या अंतिम अवस्थेत रोप मरते.
  • हा रोग कमी तापमान आणि अत्यधिक ओल असल्यास पानांच्या खालील बाजूला दिसतो.

नियंत्रण:-

  • व्लीचिंग पावडरची 15 किलोग्रॅम प्रति हेक्टर मात्रा फवारावी.
  • बुरशीनाशक मॅन्कोझेब 75% WP @ 400 ग्रॅम/एकर किंवा प्रोपिनेब 70% WP @ 400 ग्रॅम/ एकर किंवा क्लोरोथॉलोनिल 75% WP @ 300 ग्रॅम/एकरच्या मात्रेचा वापर करावा.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share