टोमॅटोच्या लागवडीसाठी उपयुक्त हवामान आणि माती:-
उपयुक्त हवामान:-
- टोमॅटोचे पीक प्रकाशासाठी असंवेदनशील असते आणि उष्ण हवामानात उत्तम येते.
- त्याच्या चांगल्या वानस्पतिक वाढीसाठी दिवसाचे तापमान 21 ते 28 डिग्री से.ग्रे. आणि रात्रीचे तापमान 15 ते 20 डिग्री से.ग्रे. या दरम्यान असावे.
- फळांचा लाल रंग विकसित होण्यासाठी 21 ते 24 डिग्री से.ग्रे. तापमान उपयुक्त असते.
- या पिकाची लागवड जास्त पर्जन्यमान असलेल्या भागात सहजपणे करता येत नाही.
उपयुक्त माती:-
- टोमॅटोची लागवड रेताड ते भारी अशा सर्व प्रकारच्या मातीत सहजपणे करता येते.
- पाण्याचा चांगला निचरा, पी.एच. स्तर 7 ते 8.5 या दरम्यान असलेली जीवांशयुक्त दोमट माती या पिकासाठी उपयुक्त असते.
- सहसा रेताड जमीन लवकर पक्व होणार्या वाणांसाठी तर भारी माती असलेली जमीन उशिरा पक्व होणार्या आणि जास्त उत्पादन देणार्या वाणांसाठी चांगली असते.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share