स्वीट कॉर्नमधील खोड पोखरकिडयाचे नियंत्रण कसे करावे
- ही स्वीट कॉर्नमधील प्रमुख आणि पिकाला मोठी हानी करणारी कीड आहे.
- खोड पोखरकिडयाची अळी मक्याच्या खोडात शिरून ते पोखरते.
- ही अळी खोडात शिरून उती खाते. त्यामुळे रोपास पाणी आणि पोषक तत्वे मिळत नाहीत. रोप हळूहळू पिवळे पडून सुकते आणि शेवटी मरते.
नियंत्रण –
- पिकाच्या पेरणीनंतर 15 -20 दिवसांनी फोरेट 10% जी 4 किलो/ एकर किंवा फिप्रोनिल 0.3% जी 5 किलो/ एकर 50 किलो मातीत मिसळून जमिनीतून द्यावे आणि त्याचवेळी सिंचन करावे.
- दाणेदार कीटकनाशक वापरले नसल्यास पुढीलपैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची फवारणी करावी:
- पेरणीनंतर 20 दिवसांनी बायफेंथ्रीन 10% EC 200 मिली प्रति एकर या प्रमाणात वापरावे किंवा
- पेरणीनंतर 20 दिवसांनी फिप्रोनिल 5% SC 500 मिली प्रति एकर या प्रमाणात फवारावे किंवा
- करटाप हायड्रोक्लोराईड 50% SP 400 ग्राम/ एकर फवारावे.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
—
कोणत्या आधारावर कापसाचे वाण निवडावे
कोणत्या आधारावर कापसाचे वाण निवडावे
मातीच्या प्रकाराच्या आधारे:-
- हलक्या ते मध्यम मातीसाठी:- नीयो (रासी)
- जड मातीसाठी:- Rch 659 BG II, मॅग्ना (रासी), मोक्ष बीजी-II (आदित्य), सुपर कॉट Bt-II (प्रभात)
सिंचनाच्या आधारे:-
- पावसावर अवलंबून:- जादु (कावेरी), मोक्ष बीजी 2 (आदित्य)
- अर्ध सिंचित: – नीयो, मॅग्ना (रासी), मनीमेकर (कावेरी), सुपर कॉट Bt- II (प्रभात)
- सिंचित: – Rch 659 BG II (रासी), जादू (कावेरी)
रोपांच्या वाढण्याच्या स्वभावाच्या आधारे: –
- सरळ वाढणार्या रोपांची वाणे: – जादु (कावेरी), मोक्ष बीजी-II (आदित्य), भक्ति (नुजिवीडु)
- फसरणार्या रोपांची वाणे:- Rch 659 BG-II (रासी), सुपर कॉट Bt- II (प्रभात)
पिकाच्या अवधिच्या आधारे: –
- लवकर तयार होणारी वाणे (140-150 दिवस)
- Rch 659 BG-II (रासी)
- भक्ति (नुजिवीडु)
- सुपर कॉट Bt- II (प्रभात)
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share