How to Control Stem Borer in Sweet Corn

स्वीट कॉर्नमधील खोडकिडीचे नियंत्रण

  • ही स्वीट कॉर्नच्या पिकातील प्रमुख आणि जास्त हानिकारक कीड आहे.
  • खोडकिडीची अळी मक्याच्या खोडात शिरून ते पोखरते.
  • ही अळी खोडात शिरून उती खाते. त्यामुळे रोपात पाणी  आणि पोषक तत्वांचा संचार होत नाही.
  • रोप हळूहळू पिवळे पडून सुकू लागते.
  • शेवटी रोप सुकून मरते.

नियंत्रण –

  • पिकाच्या पेरणीनंतर 15 -20 दिवसांनी फ़ोरेट 10%जी 4 किलो/ एकर किंवा फिप्रोनिल 0.3% जी 5 किलो/ एकर 50 किलो मातीत मिसळून मातीतून द्यावे आणि सिंचन करावे.
  • दाणेदार कीटकनाशक वापरले नसल्यास खालीलपैकी कोणतेही एक कीटकनाशक फवारावे:
    • पेरणीनंतर 20 दिवसांनी बायफेंथ्रीन 10% EC 200 मिली प्रति एकर या प्रमाणात वापरावे.
    • किंवा पेरणीनंतर 20 दिवसांनी फिप्रोनिल 5% SC 500 मिली प्रति एकर या प्रमाणात वापरावे.
    • करटाप हायड्रोक्लोराईड 50% SP 400 ग्रॅम/ एकर फवारावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

See all tips >>