How to control early blight of potato

बटाट्याच्या पिकावर प्रारंभीच्या अवस्थेत लागण झालेल्या करपा रोगाचे नियंत्रण

या रोगाच्या नियंत्रणासाठी पुढीलपैकी कोणतेही एक बुरशीनाशक फवारावे.

  • कार्बेन्डाजिम 12% + मॅन्कोझेब 63% @ 300 ग्रॅम/ एकर
  • थियोफॅनेट मिथाइल 70% डब्ल्यूपी @ 250 ग्रॅम/ एकर
  • क्लोरोथ्रोनिल 75% WP @ 250 ग्रॅम/ एकर
  • कसुगामायसिन 5% + कॉपर ऑक्सीक्लोराइड 46% WP @ 300 ग्रॅम/ एकर

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Early blight of potato

बटाट्याच्या पिकावर प्रारंभीच्या अवस्थेत लागण झालेल्या करपा रोग

  • बुरशीचा हल्ला झाल्यावर पानांवर डाग पडू लागतात.
  • हे डाग लहान, फिकट तपकिरी रंगाचे असतात आणि पानांवर सर्वत्र पसरलेले असतात.
  • पूर्ण विकसित झालेले डाग अनियमित, एककेन्द्री वर्तुळाकार, राखाडी ते काळ्या रंगाचे आणि 2-5 मिमी आकाराचे असतात.
  • रोपांच्या या रोगाची लक्षणे खालील बाजूच्या जुन्या पानांपासून सुरू होऊन हळूहळू वरील बाजूस वाढत जातात.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Potato Harvester

बटाटा काढण्याचे यंत्र (पोटॅटो हार्वेस्टर)

  • पोटॅटो हार्वेस्टर हे यंत्र बटाट्याच्या खोदाईसाठी वापरतात.

|

  • हे यंत्र बटाट्याना जमिनीतून काढून यंत्राच्या वरील भागात पोहोचवते.
  • बटाटे यंत्राच्या खोदाई करणार्‍या युनिटद्वारे बटाटे आणि माती वेगळी करून काढले जातात .
  • बटाटे आणि मातीचे पृथक्करण करताना खडे, दगड आणि इतर अशुद्ध घटक देखील हाताने काढतात.
  • या प्रक्रियेनंतर बटाटे साठवणीच्या युनिटमध्ये गोळा होतात.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Management of Black Scurf Disease of Potato

बटाट्यावरील काळ्या बुरशीचे नियंत्रण:-

  • या रोगाने बटाट्याची साले काळी पडतात.
  • कंद रायझोकटोनियाने संक्रमित मातीच्या संपर्कात आल्याने या रोगाचा फैलाव होतो.
  • या रोगाची लक्षणे रोपाच्या वरील तसेच खालील भागात आढळून येतात.
  • या रोगामुळे रोपाच्या वरील भागातील हिरवेपणा कमी होतो आणि पाने जांभळ्या रंगाची दिसतात.
  • रोपाच्या मुळे, कंद अशा खालील भागात डाग पडतात.
  • कंद रोगग्रस्त झाल्याने पिकाची गुणवत्ता आणि बाजारभावात घट येते.

नियंत्रण:-

  • पिकाची लावणी करण्यापूर्वी मातीतील पोषक तत्वे आणि पी.एच. स्तराची तपासणी करावी. मृदेतील पी.एच. स्तर कमी असल्यास हा रोग फैलावू शकत नाही.
  • जेथे दरवर्षी रोगाची लागण होते अशा जागी बटाट्याचे पीक घेऊ नये.
  • प्रमाणित कंदच वापरावेत. असे करणे शक्य नसल्यास जिवाणूनाशक वापरुन कंदांचे संस्करण करावे.
  • सल्फर 90% wdg @ 6 किलो/प्रति एकर देणे किंवा अमोनियम सल्फेट खत वापरणे आवश्यक असते.
  • रोगाचा उपचार करण्यासाठी कंदांना पेंसिकुरोन 250 सी.एस. 25 मिली /क्विंटल कंद किंवा पेनफ्लूफेन 10 मिली/ क्विंटल कंद वापरावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Management of Late blight in Potato

बटाट्यावर उशिरा पडलेल्या मर रोगाचे नियंत्रण

  • उशिरा पडलेली मर हा बटाट्याचा मुख्य रोग आहे.
  • हा रोग फायटोप्थोरा इन्फेसटेन्स नावाच्या बुरशीमुळे होतो. तो पाने, बुडखे आणि कंदांना हानी करतो.
  • रोग आधी पानांच्या कडांवरील ओलसर, फिकट करड्या व्रणांच्या स्वरुपात दिसतो.
  • संक्रमित पानाच्या उतींना मारल्यावर व्रण गडद करडे, कोरडे आणि भुरभुरीत होतात.
  • आर्द्र वातावरणात बुरशीची वाढ दागांच्या खालील बाजूस कापसासारखी दिसते.
  • डाग काळे होतात कारण ग्रस्त पाने सडू लागतात. गंभीर हल्ल्यामुळे सर्व पाने सडून सुकतात आणि गळून पडतात तसेच खोड सुकते आणि रोप मरते. जमीनीखाली कंदांचा परिपक्व होण्यापूर्वीच क्षय होतो. कंद हिरवे पडतात.
  • बटाट्यावर उशिरा पडलेल्या मर रोगाच्या नियंत्रणासाठी मॅन्कोझेब 75% WP @ 50 ग्रॅ. / 15 लीटर पाण्यात किंवा कॉपर ऑक्सीक्लोराइड 50% WP @ 50 ग्रॅ. / 15 लीटर पाण्यात किंवा मेटालेक्सिल + मॅन्कोझेब @ 50 ग्रॅ / 15 लीटर पाण्यातून फवारावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Greening in Potato Tubers

बटाट्याच्या कंदातील हिरवेपणा –

  • हा बटाट्यामधील शारीरिक रोग आहे. तो बटाट्याचे कंद प्रकाशाच्या संपर्कात आल्याने होतो.
  • बटाट्याच्या पिकाला मातीने न झाकल्यास बटाट्याच्या कंदाचा वरील भाग सतत प्रकाशाच्या संपर्कात येत राहतो. त्यामुळे त्यात हिरवेपणा आढळू लागतो.
  • बटाट्याची साठवण घरात प्रकाश असलेल्या जागी केल्यास कंदात हिरवेपणा आढळून येऊ लागतो.
  • कच्च्या बटाट्यात सोलेनिन नावाचे रसायन निर्माण झाल्याने बटाट्यात हिरवेपणा येतो. त्यामुळे बटाट्याला कडवट चव येते.

खबरदारी –

  • कच्चे बटाटे खाऊ नयेत.
  • बटाट्याच्या पिकात कंद बनण्याची सुरुवात होताना (पेरणीनंतर 35-40 दिवसांनंतर) मातीने बटाटे झाकावेत, जेणेकरून बटाट्याचे कंद प्रकाशाच्या संपर्कात येणार नाहीत.
  • बटाट्याची साठवण अंधार्‍या जागी करावी. साठवणीच्या जागी कोठून प्रकाश येत असल्यास ते बंद करावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Critical stage of irrigation in Potato

बटाट्याच्या सिंचनातील महत्वाची अवस्था:-

  • बटाट्याच्या पिकाच्या हंगामाच्या दरम्यान मातीत सर्वाधिक ओल राखण्यासाठी उच्चस्तरीय व्यवस्थापन आवश्यक असते.
  • वाढीच्या पुढील अवस्थात पाणी व्यवस्थापन अत्यंत महत्वाचे असते:-
  • 1). अंकुरणाची वेळ
  • 2). कंद बनण्याची वेळ
  • 3). कंद वाढण्याची वेळ
  • 4). पिकाच्या पक्वतेची वेळ
  • 5). काढणीपूर्वी

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Season of Planting of Potato in Northern Plains

उत्तरेच्या मैदानी भागात बटाट्याची लागवड करण्यासाठी सुयोग्य वेळ:-

सहसा बटाट्याचे पीक जेथे तापमान 18°C हून अधिक नसते अशा थंड वातावरणाच्या प्रदेशात घेतले जाते. बटाट्याच्या पिकाच्या वाढीसाठी आणि विकासासाठी तापमान 15-25°C च्या दरम्यान असावे.

उत्तरेच्या मैदानी भागात बटाट्याची लागवड आणि काढणी करण्यासाठी सुयोग्य वेळ:-

क्र. . हंगाम लागवडीची वेळ काढणीची वेळ
1. लवकर सप्टेंबर-ऑक्टोबर डिसेंबर – जानेवारी
2. मध्य ऑक्टोबर -नोव्हेंबर फेब्रुवारी-मार्च
3. उशिरा डिसेंबर-जानेवारी मार्च-एप्रिल

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Healthy Potato Crop due to Sulphur Application

बटाट्याच्या शेतात सल्फरच्या वापराने निरोगी पीक

शेतकर्‍याचे नाव:- सुरेश पाटीदार

गाव:- कनार्दी

तहसील:- तराना

जिल्हा:- उज्जैन

शेतकरी बंधु सुरेश जी यांनी 2 एकर क्षेत्रात चिप्सोना-3 बटाटे लावले आहेत, त्यात त्यांनी सल्फर 90% WDG 6 किग्रॅ/एकर च्या मात्रेचा वापर केला. त्यामुळे चांगले परिणाम झाले आहेत. सल्फर हा एंझाइम्स आणि अन्य प्रोटीन्सचा एक महत्वपूर्ण घटक आहे आणि क्लोरोफिल निर्मितीसाठी आवश्यक आहे. शेताची मशागत करताना मातीत 20 किलो/हे. सल्फर मिसळण्याची शिफारस केली जाते.

Share

Seed treatment of Potato

बटाटा हे कंदाभ पीक असून त्याला बियाणे आणि मातीतून पसरणार्‍या वेगवेगळ्या जिवाणूजन्य रोगांची लागण होते. त्यामुळे बटाट्याचे बीज संस्करण करणे अत्यंत महत्वाचे ठरते. बटाट्याचे बीज संस्करण करण्यासाठी कार्बोक्सीन 37. 5 % + थायरम 37. 5 % @ 200 ग्रॅम/एकर किंवा कार्बेन्डाजिम 12 % + मेंकोजेब 63% WP @ 200 ग्रॅम/ एकर या प्रमाणात वापरावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share