बटाट्याची साठवण

बटाट्याची साठवण

  • सुयोग्य साठवण शेतीशी संबंधित काही कार्यांवर अवलांबून असते.
  • बटाट्याच्या खोदाईपूर्वी एक आठवडा पिकाला सिंचन करणे बंद करावे. त्यामुळे बटाट्याची साल कडक होते.
  • त्याचबरोबर बटाट्याच्या झाडाची पाने सुकून गळल्यावरच खोदाई सुरू करण्याकडे लक्ष द्यावे.
  • खोदाईनंतर बटाट्याला चांगल्या प्रकारे स्वच्छ करावे आणि 18°सेंटीग्रेट तापमानात आणि 95% आद्रतेत साठवण करावी.
  • हिरवी साले असलेले, सडलेले आणि कापले गेलेले बटाटे वेगळे काढावेत.
  • 2-4° सेंटीग्रेट तापमानात बटाटे 6-8 महिन्यांपर्यंत सहजपणे साठवता येतात.
  • अशाच प्रकारे 4° सेंटीग्रेट तापमानात बटाट्याची 3-4 साठवण करता येते. |

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

बटाट्यावर उशिरा पडलेल्या मर रोगाचे नियंत्रण

बटाट्यावर उशिरा पडलेल्या मर रोगाचे नियंत्रण:-

  • रोगग्रस्त रोपांना काळजीपूर्वक नष्ट करणे आवश्यक आहे. थंड पावसाळी हवामानात सिंचन करू नये. सिंचनाची वेळ अशी निवडावी की रात्रीपर्यंत रोपे सुकतील.
  • मातीची उर्वरता आणि पिकाची शक्ती वाचवावी. कंदांचे साल कडक झाले असेल आणि त्यामुळे खरडले गेल्याने संक्रमण होण्याची शक्यता नसेल अशा वेळी पिकाची खोदणी  करावी.
  • लक्षणे सुरू होताच 2 ग्रॅम मॅन्कोझेब 75 डब्लूपी + 10 ग्रॅम यूरिया प्रति लीटर 15 दिवसांच्या अंतराने किंवा कार्बेन्डाजिम 12% + मॅन्कोझेब 63% WP @ 50 ग्रॅ/ 15 लीटर पाणी किंवा कॉपर ऑक्सीक्लोराइड 50 % WP @ 50 ग्रॅ/ 15 लीटर पाणी फवारणे सुरू करावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

बटाट्यावरील पर्ण सुरळी विषाणूचे नियंत्रण

    • कोवळ्या पानांचा आकार खूप लहान असतो आणि ती सुरकुतलेली असतात. त्यांच्या शिरांमधील भाग पिवळा पडतो.

 

  • विषाणूपासून मुक्त बियाणे वापरून रोगाचे नियंत्रण करता येते.
  • विषाणूमुक्त बियाणे माव्यापासून मुक्त भागात पेरा.

  • रोगाचा प्रसार करणारी माव्याची कीड योग्य ती कीटकनाशके वापरून नियंत्रित करता येते.

  • माव्याचे नियंत्रण करण्यासाठी असिटामीप्रिड 20% एसपी @ 10 ग्रॅ/ 15 लिटर पाणी किंवा इमिडाक्लोप्रिड  17.8% एसएल @ 10 मिली/15 लिटर पाणी फवारा.

 

 

Share

बटाट्यावर उशिरा पडलेल्या मर रोगाचे निदान

    • पानांच्या वरील बाजूस काळपट-करड्या रंगाची, पाणथळ, अंडाकार वर्तुळे उमटतात.

 

  • कार्बनडाझिम 12%+ मॅन्कोझेब 63% @ 300 ग्रॅ/ एकर.
  • थिओफॅनेट मेथील 70% डब्ल्यूपी @ 250 ग्रॅ/ एकर

  • क्लोरोथरलोनील 75% डब्ल्यूपी @ 250 ग्रॅ/ एकर.

  • कसुगामायसिन 5% + कॉपर ऑक्सिक्लोराईड 46% डब्ल्यूपी @ 300 ग्रॅ/ एकर.

 

Share

बटाट्यातील विषाणूजन्य पर्ण गुंडाळी रोगाचे नियंत्रण

बटाट्यातील विषाणूजन्य पर्ण गुंडाळी रोगाचे नियंत्रण:-

  • विषाणूमुक्त बियाणे वापरुन या रोगाचे नियंत्रण करता येते.
  • मावा मुक्त जमिनीत बियाणे तयार करावे.
  • रोगवाहक माव्याची संख्या नियंत्रित ठेवण्यासाठी उपयुक्त सम्पर्क/दैहिक कीटकनाशके वापरावीत.
  • माव्याच्या प्रभावी नियंत्रणासाठी अॅसिटामिप्रिड 20% एसपी @ 10 ग्रॅ / 15 लीटर पाण्यातून किंवा इमिडेकलोप्रिड 17.8% एसएल @ 10 एमएल / 15 लीटर पाण्यातून फवारावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

The critical stage of irrigation in Potato

  • बटाट्याच्या पिकासाठी संपूर्ण हंगाम जास्तीतजास्त ओल राखण्यासाठी उच्च दर्जाचे सिंचन व्यवस्थापन आवश्यक असते.
  • वाढीच्या पुढील टप्प्यांमध्ये सिंचन व्यवस्थापन अत्यंत महत्वाचे असते:
  • 1) फुटवे येण्याची अवस्था
  • 2) कंद स्थापित होण्याची अवस्था
  • 3) कंद भरण्याची अवस्था
  • 4) पिकाची अंतिम अवस्था
  • 5) काढणीपूर्व सिंचन अवस्था

Share

Soil Preparation for Potato Cultivation

बटाट्याच्या पिकासाठी जमिनीची मशागत:-

  • बटाट्याच्या पिकात उत्तम कंद बनण्यासाठी भुसभुशीत जमीन आवश्यक असते.
  • बटाट्याचे पीक रब्बीच्या हंगामात घेतले जाते. खरीपाच्या पिकाच्या काढणीनंतर 20-25 से.मी. खोल नांगरणी करून मातीला पालटावे.
  • त्यानंतर 2-3 वेळा दाताळे आडवे फिरवावे किंवा 4-5 वेळा देशी नांगराने नांगरणी करावी.
  • एक दोन वेळा वखर फिरवून जमिनीला सपाट करणे आवश्यक असते.
  • पेरणीच्या वेळी पुरेशी ओल असणे आवश्यक असते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Critical stage of irrigation in Potato

बटाट्याच्या सिंचनातील क्रांतिकारक अवस्था

  • बटाट्याच्या पिकासाठी हंगामाच्या दरम्यान मातीत उच्चतम ओलावा राखण्यासाठी उच्च स्तरीय व्यवस्थापन आवश्यक असते.
  • वाढीच्या पुढील टप्प्यांमध्ये पाण्याचे व्यवस्थापन खूप महत्वाचे असते –
  • 1). अंकुरण अवस्था
  • 2). कंद निर्माण होण्याची अवस्था
  • 3). कंद वाढण्याची अवस्था
  • 4). पिकाची अंतिम अवस्था
  • 5). खोदाईपूर्वी

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत  पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Field preparation of Potato crop

बटाट्याच्या पिकासाठी शेताची मशागत

शेताच्या मशागतीच्या वेळी देण्याची उर्वरकांची मात्रा

  • एसएसपी @ 80 किग्रॅ/ एकर
  • डीएपी @ 40 किग्रॅ/ एकर
  • यूरिया @ 20 किग्रॅ/ एकर
  • पोटाश @ 50 किग्रॅ/ एकर

पेरणीच्या वेळी

  • समुद्री शेवाळ (लाटू ) 5 किग्रॅ/ एकर
  • फिप्रोनिल जीआर (फॅक्स जीआर / हरीना जीआर) @ 8 किग्रॅ/ एकर
  • एनपीके बॅक्टीरियाचे मिश्रण (टीबी 3 ) @ 3-4 किग्रॅ/ एकर
  • ZnSB (तांबे जी ) @ 4 किग्रॅ/ एकर

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत  पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Seed treatment of Potato

बटाट्याचे बीजसंस्करण

बटाटा हे कंदाचे पीक आहे. त्यात बियाणे आणि मातीद्वारे फैलावणारे वेगवेगळे बुरशीजन्य रोग होतात.

बटाट्याचे बीजसंस्करण कसे करावे:- कार्बोक्सीन 37. 5 % + थायरम 37. 5 % @ 200 ग्रॅम/ 6 लीटर पाणी प्रती 1 एकर जमिनीत पेरण्याच्या बियाण्यासाठी किंवा थायोफनेट मिथाइल 45% + पाइरक्लोस्ट्रोबिन 5% एफएस @ 800 मिली/16 लीटर पाणी 40 क्विंटल बियाण्यासाठी वापरावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share