रोपातील कॅल्शियमची भूमिका:- कॅल्शियम हे आवश्यक पोषक तत्व असून त्याच्या अनेक भूमिका आहेत.
- ते अन्य पोषक तत्वांच्या चयापचय प्रक्रियेत भाग घेते.
- रोपातील योग्य त्या कोशिकांच्या वाढीस चालना देते.
- कोशिका भित्तीची संरचना मजबूत बनवते – कॅल्शियम रोपाच्या कोशिका भित्तीचा अनिवार्य भाग आहे. ते कॅल्शियम पेक्टेट सन्युग बनवते, ज्यामुळे कोशिका भित्ति आणि कडाच्या कोशिकाना स्थिरता मिळते.
- एंझायमेटिक आणि हार्मोनल प्रक्रियात भाग घेते. |
- उष्णतेच्या ताणाविरोधात रोपांचे रक्षण करण्यास सहाय्य करते – कॅल्शियम स्टोमेटा प्रकियेत सुधार घडवून हीट शॉक प्रोटीन बनवण्यात सहभागी होते.
- रोपांचा रोगापासून बचाव करण्यात मदत करते – अनेक प्रकारच्या बुरशी आणि जिवाणू गुप्त एंझाइम्स सोडून रोपाच्या कोशिका भित्ति खराब करतात. कॅल्शियमने प्रेरित मजबूत कोशिका भित्ति या आक्रमणापासून बचाव करू शकतात.
- फळांची गुणवत्ता प्रभावित करते.
- स्टोमेटाच्या नियमनात भूमिका अदा करते.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share