कांदा लसूणच्या साठवणीस प्रभावित करणार्या बाबी:- जातीची निवड:- सर्व जातींची साठवण क्षमता एकसारखी नसते. खरीपाच्या हंगामात केल्या जाणार्या जातींचे कांदे टिकाऊ नसतात तर रब्बीच्या हंगामात केल्या जाणार्या जातींचे कांदे साधारणत: 4-5 महीने साठवता येतात. जातींनुसार हे बदलू शकते. गेल्या 10-15 वर्षांच्या अनुभवानुसार एन-2-4-2, अॅग्रीफाउंड लार्इट रेड, अर्का निकेतन इत्यादि जाती 4-5 महीने उत्तम प्रकारे साठवता येतात. लसूणच्या जी-1. जी- 2 ,जी 50 आणि जी 323 इत्यादि जाती 6 ते 8 महिने साठवता येतात.
उर्वरक आणि पाणी व्यवस्थापन:- उर्वरकांची मात्रा, त्यांचा प्रकार आणि पाणी व्यवस्थापन यांचा कांदा लसूणच्या साठवण क्षमतेवर प्रभाव पड़तो. शेणखतामुळे साठवण क्षमता वाढते. त्यामुळे शेणखत किंवा हरित खते वापरणे आवश्यक असते. कांदा लसूणमध्ये हेक्टरी 150 किग्रॅ. नत्र, 50 किग्रॅ. फॉस्फरस आणि 50 किग्रॅ. पोटाश देण्याची शिफारस केली जाते. शक्य असल्यास सर्व नत्र कार्बनिक खतांच्या माध्यमातून द्यावे आणि नत्राची पूर्ण मात्रा रोपणींनंतर 60 दिवसात द्यावी. उशिरा नत्र दिल्यास रोपांची खोडे जाड होतात आणि कांदा टिकत नाही तसेच बुरशीजन्य रोगांची लागण अधिक प्रमाणात होते व प्रस्फुटन जास्त होते, पोटॅशियमची मात्रा 50 किग्रॅ. पासून वाढवून 80 किग्रॅ. प्रति हेक्टर करावी. अशा प्रकारे 50 किग्रॅ. प्रति हेक्टर मात्रा देण्याने कांदा आणि लसूणाची साठवण क्षमता आणि गुणवत्ता वाढते. गन्धकासाठी अमोनियम सल्फेट, सिंगल सुपर फॉस्फेट किंवा पोटॅशियम सल्फेट वापरल्याने रोपांना पुरेशा प्रमाणात गन्धक मिळते.
स्टोरेज हाऊसमधील वातावरण :- कांदा लसूणची दीर्घकाळ साठवण करण्यासाठी स्टोरेज हाऊसचे तापमान आणि अपेक्षाकृत आद्रता महत्वपूर्ण असते. अधिक आर्द्रता (70% हून अधिक) हा कांद्याच्या साठवणुकीचा सर्वात मोठा शत्रू आहे. त्यामुळे जिवाणूंचा उपद्रव देखील वाढतो आणि कांदा सडू लागतो. याउलट आर्द्रता कमी (65% हून अधिक) असल्यास कांद्यातून अधिक वाष्पोत्सर्जन होते आणि वजन घटते. चांगल्या साठवणुकीसाठी स्टोरेज हाऊसचे तापमान 25-30 डिग्री सें. आणि आर्द्रता 65-70 टक्के या दरम्यान असणे आवश्यक असते. मे-जून महिन्यात स्टोरेज हाऊसमधील तापमान अधिक असल्याने आणि आर्द्रता कमी असल्याने वजन घटते. जुलै ते सप्टेंबर या काळात आर्द्रता 70 टक्क्यांहून अधिक असल्याने सडण्याचे प्रमाण वाढते. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये तापमान कमी असल्यानं सुप्तावस्था मोडते आणि मोड येण्याची समस्या वाढते.
Share