Thrips control in Garlic

लसूणच्या पिकातील थ्रिप्सचे (फुलकिड्यांचे) नियंत्रण

थ्रिप्स :- ही कीड खूप लहान पिवळ्या किंवा डाट काळ्या रंगाची असते आणि ती पानांवर पांढरे डाग पाडते. ती पानातील रस शोषते.
नियंत्रण :- प्रोफेनोफोस @ 400 मिली /एकर किंवा फिप्रोनिल 5% एससी @ 400 मिली प्रति एकर किंवा एमामेक्टीन बेंजोएट 80-100 ग्रॅम/एकर किंवा स्पिनोसेड @ 75 मिली/ एकर फवारावे. फवारणी करताना सिलिकॉन आधारित सोल्वंटमध्ये मिसळून करावी आणि जमिनीत मिसळून फिप्रोनिल 0.03% GR @ 8 किलो प्रति एकर किंवा फोरेट 10 G @ 8 किलो प्रति एकर द्यावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Soil and its preparation in Garlic

लसूणच्या पिकासाठी योग्य माती आणि शेताची मशागत

माती आणि शेताची मशागत: – लसूण वेगवेगळ्या प्रकारच्या मातीत लावता येतो. परंतु रेताड दमट, चिकणी दमट आणि दाट भुरभुरीत माती लसूनच्या पिकासाठी सर्वात उपयुक्त असते. 5-6 वेळा नांगरट करून जमीन तयार केले जाते. कमाल पीएच श्रेणी 5.8 आणि 6.5 या दरम्यान असावी. पीएच पातळी राखण्यासाठी प्रति हेक्टर 50 किलोग्रॅम जिप्सम वापरावे. (मातीच्या पीएच पातळीनुसार) शेत अशा प्रकारे तयार करावे की जास्तीतजास्त पाण्याचा सहजपणे निचरा होईल आणि शेत तणमुक्त राहील. शेवटच्या नांगरणीपूर्वी 15-20 टन उत्तम प्रतीचे शेणखत द्यावे.

Share

Management of Purple Blotch in Garlic

सुरूवातीला छोटे असलेले अंडाकृती छिद्रे किंवा ठिपके वाढून फिकट जांभळे होतात आणि पिवळ्या कडांच्या चारी बाजूंनी दिसतात. डाग मोठे होताना पिवळ्या कडा पसरून वर-खाली छिद्रे पाडतात. छिद्रे पानाच्या मधोमध असतात त्यामुळे ती गळतात. छिद्रे जुन्या पानांच्या टोकापासून सुरू होतात. या रोगाचा प्रभावी प्रतिबंध करण्यासाठी निरोगी बियाणे वापरावे. संबंधित नसलेल्या पिकांसह 2-3 वर्षांचे पीकचक्र अंमलात आणावे. जिवाणूनाशके फवारणी मैन्कोज़ेब 75% WP @ 45 ग्रॅम/ 15 लीटर पाणी किंवा हेक्साकोनोजोल 5% एससी @ 20 मिलीलीटर / 15 लीटर पाणी किंवा प्रोपिकोनाज़ोल 25% ईसी @ 15 मिलीलीटर / 15 लीटर पाणी पेरणी केल्यावर 30 दिवसांपासून किंवा रोग लक्षात आल्यावर लगेचपासून दर 10-15 दिवसांनंतर करावी.

पोस्टला पसंती दर्शवण्यासाठी खाली दिलेले लाईक बटन दाबा आणि शेअर बटन दाबून इतर शेतकर्‍यांशी माहितीचे आदानप्रदान करा.

Share

Root rot control in Garlic

नियंत्रण:- लागण झालेली रोपे तातडीने उपटावीत. पेरणीसाठी रोगमुक्त बियाणे वापरावे. लसूणच्या बियाण्याला गरम पाण्याने संस्कारित करून 50% पर्यन्त रोगाचे नियंत्रण करता येते. पेरणी करताना गड्ड्यांना मेन्कोजेब 2 ग्रॅम/ ली. मिश्रणात संस्कारित करावे. उभा पिकावर 45 ग्रॅम प्रति पम्प कार्बेन्डाजिम 12% + मेन्कोजेब 60% ची फवारणी करून ड्रेंचिंग करावे

पोस्टला पसंती दर्शवण्यासाठी खाली दिलेले लाईक बटन दाबा आणि शेअर बटन दाबून इतर शेतकर्‍यांशी माहितीचे आदानप्रदान करा.

Share

Management of Irrigation in Garlic

लसूण पिकासाठी पाणी व्यवस्थापन:-

पेरणीनंतर पहिल्यांदा पाणी द्यावे.

कोंब फुटल्यावर तीन दिवसांनी पुन्हा पाणी द्यावे.

त्यानंतर 10-15 दिवसांतून पाणी द्यावे.

उन्हाळ्यात 5-7 दिवसातून पाणी द्यावे.

गड्डे तयार झाल्यावर पाण्याला ताण द्यावा.

एकूण 15 वेळा पाणी देण्याची आवश्यकता असते.

पीक पक्व होताना जमीनीत दमटपणा कमी असू नये अन्यथा गड्ड्याच्या विकासावर विपरीत परिणाम होतो.

पोस्टला पसंती दर्शवण्यासाठी खाली दिलेले लाईक बटन दाबा आणि शेअर बटन दाबून इतर शेतकर्‍यांशी माहितीचे आदानप्रदान करा.

Share