Control of Aphids in Cabbage

पानकोबीच्या पिकातील माव्याचे नियंत्रण:-

  • शिशु आणि वाढ झालेले किडे कोवळ्या नासपातीच्या आकाराचे, काळ्या रंगाचे असतात.
  • ही कीड कोवळ्या फुटव्यावर वसाहत करून पानांचा रस शोषते.
  • तीव्र ग्रासलेले रोप पुर्णपणे सुकून मरते.

नियंत्रण:-

  • पुढीलपैकी कोणतीही एक मात्रा फवारावी:-
  1. डायमेथोएट 30 ईसी @ 300 मिली/एकर
  2. क्यूनॉलफॉस 25 ईसी @ 300 मिली/एकर
  3. प्रोफेनोफॉस 50 ईसी @ 400 मिली/ एकर
  • लागण झालेल्या रोपांचे अवशेष नष्ट करावेत तसेच शेतात वाढलेले गवत आणि तण काढावे.
  • दाणेदार फोरेटची 10 जी 10 किलोग्रॅम/हेक्टर मात्रा मातीत मिसळून माव्याच्या पुन्हा होऊ शकणारा हल्ला रोखता येतो.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Season of Planting of Cabbage

पानकोबीच्या लागवडीसाठी योग्य वेळ

पानकोबीच्या लागवडीसाठी योग्य वेळ:-

पानकोबीच्या लागवडीची वेळ वाण आणि वातावरणीय परिस्थितीवर अवलंबून असते.

लवकरच्या हंगामातील वाणाची पेरणी मे महिना ते जून महिना या काळात केली जाते.

मध्य हंगामातील वाणांची पेरणी जून महिन्याचा शेवटचा आठवडा ते जुलै महिन्याच्या मध्यापर्यंतच्या काळात केली जाते.

मध्य उशीराच्या हंगामातील वाणाची पेरणी ऑगस्ट महिन्यात केली जाते.

उशीराच्या हंगामातील वाणाची पेरणी सप्टेंबर महिना ते ऑक्टोबर महिन्याच्या मध्यापर्यंतच्या काळात केली जाते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

 

Share

Contro of Diamondback Moth (DBM) in Cabbage

पानकोबीवरील अळीचे नियंत्रण:-

ओळखणे:-

  • अंडी पिवळट पांढरी आणि फिकट हिरव्या रंगाची असतात.
  • अळ्या 7-12 मिमी. लांब, फिकट पिवळ्या-हिरव्या रंगाच्या असतात आणि त्यांच्या संपूर्ण शरीरावर बारीक रोम असतात.
  • वाढ झालेले किडे 8-10 मिमी. लांब, मातकट करड्या रंगाचे आणि आतील कडा पिवळ्या असलेले फिकट गव्हाळ रंगाचे पंखाचे असतात.
  • वाढ झालेल्या माद्या पानांवर झुबक्याने अंडी घालतात.
  • त्यांच्या पंखांवर पांढर्‍या रेषा असतात आणि ते दुमडल्यावर हिर्‍यासारखा आकार दिसतो.

नुकसान:-

  • लहान, सडपातळ हिरव्या अळ्या अंड्यातून निघाल्यावर पानांच्या बाहेरील आवरण खाऊन त्यांना भोके पाडतात.
  • हल्ला तीव्र असल्यास पानांची फक्त जाळी शिल्लक राहते.

नियंत्रण:- डायमंड बॅक मॉथचा उपद्रव रोखण्यासाठी बोल्ड मोहरीची लागवड  कोबीच्या प्रत्येक 25 ओळींनंतर मोहरीच्या दोन ओळी अशा प्रमाणात करावी. प्रोफेनोफ़ोस (50 र्इ.सी.) ची 3 मि.ली. प्रति लीटर पाणी मात्रा फवारावी. स्पाइनोसेड (25 एस. सी.) 0.5 मि.ली. प्रति ली. किंवा ईंडोक्साकार्ब 1.5 मि.ली. प्रति ली पाणी मात्रेची फवारणी पेरणीनंतर 25 दिवसांनी आणि पुन्हा त्यानंतर 15 दिवसांनी अशी दोन वेळा करावी.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Today’s Farmer

आजचे शेतकरी

नाव:- सचिन ठाकुर

गाव:- दिलावरा

जिल्हा:-धार

समस्या:- पानकोबीवरील अळी

शिफारस:- एमामेक्टीन बेंजोएट 15 ग्रॅम + प्रोफेनोफॉस 30 मिली प्रति पम्प ची मात्र फवारावी.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Nursery Bed Preparation of Cabbage

पानकोबीसाठी नर्सरी बनवणे:-

  • बियाण्याची पेरणी वाफ्यात केली जाते. सामान्यता 4-6 आठवडे वयाच्या रोपाचे पुनर्रोपण करावे.
  • वाफ्याची लांबी 3 मी. रुंदी 0.6 मी. आणि ऊंची 10-15 से.मी. असावी.
  • दोन नर्सरी वाफ्यात 70 से.मी. अंतर असावे. त्यामुळे नर्सरीतील निंदणी, अंदर निदाई, खुरपणी, सिंचन अशा अंतर्गत क्रिया सहजपणे करता येतील.
  • नर्सरी वाफ्याचा पृष्ठभाग भुसभुशीत आणि चांगल्या प्रकारे सपाट केलेला असावा.
  • नर्सरी वाफा बनवताना 8-10 कि.ग्रॅ. शेणखत प्रति वर्ग मीटर या प्रमाणात द्यावे.
  • भारी जमिनीत उंच वाफे केल्याने पाणी तुंबण्याची समस्या सोडवता येते.
  • आद्रगलन रोगाने रोपाला होणारी हानी रोखण्यासाठी 15 ते 20 ग्रॅम कार्बेन्डाझिम प्रति 10 लीटर पाण्याचे मिश्रण जमिनीत चांगल्या प्रकारे मिसळावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Field preparation of Cabbage:-

पानकोबीसाठी शेताची मशागत:-

  • शेतात 3-4 वेळा नांगरणी करून मातीला भुसभुशीत करावे आणि कुळव चालवून सपाट करावे.
  • शेताची मशागत करताना 25 टन प्रति हेक्टर शेणखत किंवा कम्पोस्ट खत वापरावे.
  • निंबोणीची पेंड आणि कोंबडीखत वापरल्याने रोपांची वाढ, गुणवत्ता आणि उत्पादनात वाढ होते तसेच उर्वरकांच्या मात्रेला कमी करता येते.
  • हंगाम आणि जमिनीच्या पोतानुसार वाफ्यात, सरींमध्ये आणि नळयात पेरणी करावी.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Nutrient management of Cabbage

पानकोबीच्या शेतातील पोषक तत्वांचे व्यवस्थापन:-

  • पानकोबीची लागवड करण्यासाठी सर्वाधिक पोशाक तत्वांची आवश्यकता असते.
  • उर्वरकांची मात्रा जमिनीचा पोत आणि कार्बनिक पदार्थांच्या वापरावर ठरते.
  • रोपे लावण्यापूर्वी 4 आठवडे 15-20 टन शेणखत मातीत मिसळले जाते.
  • चांगल्या उत्पादनासाठी उर्वरकांच्या मात्रेबाबत शिफारस – सामान्य वाणांसाठी 100 किलो नत्र, 60 किलो फॉस्फरस आणि 100 किलो पोटाश प्रति हेक्टर, संकरीत जातींसाठी 120-180 किलो नत्र 60 किलो फॉस्फरस आणि 100 किलो पोटाश प्रति हेक्टर|
  • शेताच्या मशागतीच्या वेळी नत्राची अर्धी मात्रा आनो फॉस्फरस आणि पोटाशची पूर्णा मात्रा दिली जाते.
  • नत्राची उरलेली मात्र माती पसरवताना दिली जाते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Alternaria Leaf Spot in Cauliflower and Cabbage

फुलकोबी आणि पानकोबीवरील आल्टर्नेरिआ (पानांवरील डागांचा रोग):-

लक्षणे:-

  • पानांवर लहान गडद पिवळ्या रंगाचे ठिपके उमटतात.
  • लवकरच हे ठिपके एकमेकात मिसळून निळसर गोल व्रण बनवतात.
  • या डागांच्या मध्यभागी केंद्रामध्ये निळसर रंगाची बुरशी वाढते.
  • लागण तीव्र झाल्यावर सर्व पाने गळून पडतात.
  • रोगग्रस्त फुलांवर आणि पानांवर गडद जांभळे, काळे-करडे डाग दिसतात.

नियंत्रण:-

  • प्रमाणित बियाणी वापरावी.
  • गरम पाण्यात (50OC) बीजसंस्करण करावे.
  • रोगाची लक्षणे दिसू लागताच मेन्कोजेब 3 ग्राम प्रति ली. पाण्याचे किंवा कॉपर ऑक्सी क्लोराईड 3 ग्राम प्रति लीटर पाण्याचे मिश्रण बनवून 10-15 दिवसांच्या अंतराने फवारावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Cauliflower Diamondback Moth (DBM)

फुलकोबीवरील डायमण्ड बॅक मोथची अळी

ओळख:-

  • अंडी पांढरट पिवळी आणि फिकट हिरव्या रंगाची असतात.
  • अळ्या 7-12 मिमी. लांब, फिकट पिवळट हिरव्या रंगाच्या असतात आणि त्यांच्या संपूर्ण शरीरावर बारीक रोम असतात.
  • वाढ झालेले किडे 8-10 मिमी. लांब, मातकट करड्या रंगाचे असतात आणि त्यांचे पंख फिकट गव्हाळ रंगाचे असतात आणि त्यांच्या आतील कडा पिवळ्या असतात.
  • वाढलेल्या माद्या पानांवर समूहाने अंडी घालतात.
  • पंखांवर पांढर्‍या रेषा असतात. पंख मिटल्यावर हिर्‍याचा आकार दिसतो.

नुकसान:-

  • लहान, सडपातळ हिरव्या अळ्या अंड्यातून निघाल्यावर पानांचा बाहेरील पृष्ठभाग खाऊन त्यात भोके पाडतात.
  • तीव्र हल्ला झाल्यावर पानांचा फक्त सांगाडा उरतो.

नियंत्रण:-

डायमण्ड बॅक मोथ रोखण्यासाठी फुलकोबीच्या प्रत्येक 25 ओळींनंतर 2 ओळी बोल्ड मोहरीच्या लावाव्यात. प्रोफेनोफ़ोस (50 र्इ.सी.) 3 मि.ली. प्रति लीटर पाणी मिश्रण फवारावे. स्पायनोसेड (25 एस. सी.) 0.5 मि.ली. प्रति ली. किंवा ईंडोक्साकार्ब 1.5 मि.ली. प्रति ली पाणी मिश्रण फवारावे. पहिली फवारणी पेरणीनंतर 25 दिवसांनी आणि दुसरी त्यानंतर 15 दिवसांनी करावी.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share