Subsidy on Onion Storage House

कांद्याच्या स्टोरेज हाऊससाठी अनुदान

योजनेअंतर्गत NHRDF नाशिकच्या ड्रॉइंग- डिझाईननुसार 25-50 मेट्रिक टन क्षमतेच्या कांदा स्टोरेज हाऊसच्या निर्मितीसाठी तरतूद करण्यात आलेली आहे. MIDH नॉर्मसनुसार 25 मेट्रिक टन क्षमता निर्धारित एककाच्या स्टोरेज हाऊससाठीच्या रु. 1.75 लाख एवढ्या खर्चाच्या 50% अनुदान किंवा कमाल रक्कम रु. 0.875 लाख आणि 50 मेट्रिक टन क्षमता निर्धारित एककासाठी खर्चाच्या रु 3.50 लाख रकमेच्या 50% किंवा कमाल रक्कम रु. 1.75 लाख देय आहे. योजना सर्व जिल्ह्यात लागू असून सर्व वर्गाचे शेतकरी तिचा लाभ घेऊन शकतात. अर्ज भरण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करावी आणि वरिष्ठ उद्यान विकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.

http://www.mphorticulture.gov.in/schemes.php

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Soil and its preparation in Garlic

लसूणच्या पिकासाठी योग्य माती आणि शेताची मशागत

माती आणि शेताची मशागत: – लसूण वेगवेगळ्या प्रकारच्या मातीत लावता येतो. परंतु रेताड दमट, चिकणी दमट आणि दाट भुरभुरीत माती लसूनच्या पिकासाठी सर्वात उपयुक्त असते. 5-6 वेळा नांगरट करून जमीन तयार केले जाते. कमाल पीएच श्रेणी 5.8 आणि 6.5 या दरम्यान असावी. पीएच पातळी राखण्यासाठी प्रति हेक्टर 50 किलोग्रॅम जिप्सम वापरावे. (मातीच्या पीएच पातळीनुसार) शेत अशा प्रकारे तयार करावे की जास्तीतजास्त पाण्याचा सहजपणे निचरा होईल आणि शेत तणमुक्त राहील. शेवटच्या नांगरणीपूर्वी 15-20 टन उत्तम प्रतीचे शेणखत द्यावे.

Share

Fertilizer application for Chickpea

हरबर्‍यासाठी खताबाबत माहिती

हरबर्‍याचे पीक दळदार असल्याने त्याला कमी नायट्रोजन लागतो. हरबर्‍याच्या रोपांच्या मुळात ग्रन्थि असतात. ग्रन्थितील जीवाणु वातावरणातील नायट्रोजनचे मुळात स्थिरीकरण करून रोपाला लागणारा नायट्रोजन मिळवून देतात. परंतु सुरूवातीला रोपाच्या मुळातील ग्रंन्थिचा पूर्ण विकास न झाल्याने रोपे जमिनीतून नायट्रोजन मिळवतात. त्यामुळे नायट्रोजनची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी हेक्टरी 20 कि.ग्रॅ. नायट्रोजनची आवश्यकता असते. त्याबरोबर 40 कि.ग्रॅ. फॉस्फरस प्रति हेक्टर द्यावा. नायट्रोजनची मात्रा यूरिया किंवा डाई अमोनियम फॉस्फेट (डीएपी) आणि शेणखत आणि कम्पोस्ट खताद्वारे देता येते. फॉस्फरसची आवश्यकता सिंगल सुपर फॉस्फेट किंवा डीएपी किंवा शेणखत आणि कम्पोस्ट खताद्वारे पूर्ण करता येते. एकीकृत पोषक व्यवस्थापनाद्वारे पोषक तत्वांची आवश्यकता पूर्ण करणे फायदेशीर ठरते. एक हेक्टर क्षेत्रासाठी 2.50 टन शेणखत किंवा कंपोस्ट खत जमिनीची मशागत करतेवेळी मातीत मिसळावे. पेरणीच्या वेळी 22 कि.ग्रॅ. यूरिया आणि 125 कि.ग्रॅ. सिंगल सुपर फॉस्फेट किंवा 44 कि.ग्रॅ. डीएपी मध्ये 5 किलोग्रॅम यूरिया मिसळून प्रति हेक्टरी सरींमध्ये देणे पुरेसे असते.

Share

Subsidy for Fruit Planting

या योजनेची राज्यातील जमीन, वातावरण आणि सिंचन सुविधेच्या उपलब्धतेच्या आधारे राज्यात अंमलबजावणी केली जाते. या योजनेअंतर्गत शेतकर्‍यांना आंबा, पेरु, संत्री, मोसंबी, सीताफळ, बोर, चिकू आणि द्राक्षे, कल्चर पद्धतीने लागवड केलेली डाळिंबे, स्ट्रोबेरी आणि केळी, संकरीत बियाण्यापासून लागवड केलेली शेवगा आणि पपई, तसेच बियाण्यापासून लागवड केलेली लिंबू या पिकांच्या उच्च आणि अतिउच्च ड्रिपसह फळबाग लागवडीसाठी शेतकर्‍याच्या खर्चाच्या 40% रकमेचे अनुदान 60:20:20 या प्रमाणात तीन वर्षात देण्यात येते. या योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकर्‍यास 0.25 ते 4.00 हेक्टर जमिनीवर फळबाग लागवडीसाठी अनुदान देण्यात येते.

अधिक माहितीसाठी फलोत्पादन विभागात वरिष्ठ फलोत्पादन अधिकारी यांच्याशी सनपरका साधावा.

स्त्रोत:- http://www.mphorticulture.gov.in/schemes.php

पोस्टला पसंती दर्शवण्यासाठी खाली दिलेले लाईक बटन दाबा आणि शेअर बटन दाबून इतर शेतकर्‍यांशी माहितीचे आदानप्रदान करा.

Share

Management of Purple Blotch in Onion

कांद्यावरील जांभळ्या डागांच्या रोगाचे नियंत्रण:

सुरूवातीला छोटे असलेले अंडाकृती छिद्रे किंवा ठिपके वाढून फिकट जांभळे होतात आणि पिवळ्या कडांच्या चारी बाजूंनी दिसतात. डाग मोठे होताना पिवळ्या कडा पसरून वर-खाली छिद्रे पाडतात. छिद्रे पानाच्या मधोमध असतात त्यामुळे ती गळतात. छिद्रे जुन्या पानांच्या टोकापासून सुरू होतात. या रोगाचा प्रभावी प्रतिबंध करण्यासाठी निरोगी बियाणे वापरावे. संबंधित नसलेल्या पिकांसह 2-3 वर्षांचे पीकचक्र अंमलात आणावे. जिवाणूनाशके फवारणी मैन्कोज़ेब 75% WP @ 45 ग्रॅम/ 15 लीटर पाणी किंवा हेक्साकोनोजोल 5% एससी @ 20 मिलीलीटर / 15 लीटर पाणी किंवा प्रोपिकोनाज़ोल 25% ईसी @ 15 मिलीलीटर / 15 लीटर पाणी पेरणी केल्यावर 30 दिवसांपासून किंवा रोग लक्षात आल्यावर लगेचपासून दर 10-15 दिवसांनंतर करावी.

पोस्टला पसंती दर्शवण्यासाठी खाली दिलेले लाईक बटन दाबा आणि शेअर बटन दाबून इतर शेतकर्‍यांशी माहितीचे आदानप्रदान करा.

Share

Thrips management in Onion

थ्रिप्स (फुलकिडे) ही कीड कांद्याचे सर्वात जास्त नुकसान करते. जेथे कांद्याची लागवड होते तेथे देशभर ती आढळून येते. थ्रिप्स (फुलकिडे) किडीची लागण झालेल्या रोपांच्या पानांवर रस शोषल्याने डाग पडतात आणि ते पिवळट पांढरे पडतात. थ्रिप्स (फुलकिडे) किडीमुळे उत्पादनात 50-60 टक्के घट झाल्याचे दिसून आले आहे. थ्रिप्समुळे बियाण्याच्या जीवनक्षमतेत आणि उत्पादनात घट होते. ही कीड खूप लहान पिवळ्या किंवा डाट काळ्या रंगाची असते. तिचे आयुष्य 8-10 दिवसांचे असते. ती हिरव्या पानांच्या जोडाजवळ नव्याने उगवणार्‍या पानांचा रस शोषते. ती शेतातील जमिनीत, गवतात आणि इतर वनस्पतीवर सुप्तावस्थेत असते. पावसाळ्यात थ्रिप्स किडे कंदात जाऊन पुढील वर्षातील संक्रमणाचा स्रोत बनतात. भारताच्या उत्तर भागात मार्च-एप्रिल या काळात ते बियाणे उत्पादन आणि कांद्याच्या कंदात मोठ्या संख्येने प्रसवतात. लागण झालेल्या रोपांची वाढ खुंटते आणि पानांच्या सुरळया होतात. वाढीच्या काळात हल्ला झाल्यास कंदांची निर्मिती पुर्णपणे थबते आणि रोप हळूहळू मरते. साठवणीच्या दरम्यान देखील कंदांवर किडे हल्ला करतात. प्रोफेनोफोस @ 45 मिली. / पम्प किंवा एमामेक्टीन बेंजोएट 15 ग्रॅम/पम्प किंवा स्पिनोसेड @ 10 मिली. ची फवारणी करावी. फवारणी करताना सिलिकॉन आधारित सोल्वंटमध्ये मिसळून करावी आणि जमिनीतून फिप्रोनिल 0.03% GR @ 5 किलो प्रति एकर किंवा फोरेट 10 G @ 4 किलो प्रति एकर किंवा कार्बोफ्युरोन 3% G @ 4 किलो प्रति एकर द्यावे.

पोस्टला पसंती दर्शवण्यासाठी खाली दिलेले लाईक बटन दाबा आणि शेअर बटन दाबून इतर शेतकर्‍यांशी माहितीचे आदानप्रदान करा.

Share

Control of Powdery mildew in Tomato

हा रोग लेवीलुलाटोरिका जिवाणूमुळे होतो. सुरूवातीला पानांच्या वरील बाजूवर फिकट हिरव्या ते फिकट पिवळ्या रंगाचे डाग दिसू लागतात. पानावर भुकटीचे हलके आवरण दिसते आणि पाने पिवळी पडू व कुजू लागतात. या रोगाच्या प्रभावी नियंत्रणासाठी हेक्साकोनोजोल 5% एससी @ 30 मिलीलीटर / 15 लीटर पाणी किंवा सल्फर 80% डब्लूडीजी @ 50 ग्रॅम / 15 लीटर पाणी या मिश्रणाची फवारणी करावी.

पोस्टला पसंती दर्शवण्यासाठी खाली दिलेले लाईक बटन दाबा आणि शेअर बटन दाबून इतर शेतकर्‍यांशी माहितीचे आदानप्रदान करा.

Share

Ideal soil and its preparation for growing Onion

कांद्याच्या पिकासाठी योग्य जमीन आणि तिची मशागत:-

कांद्याचे पीक वेगवेगळ्या प्रकारच्या मातीत घेता येते पण रेताड दमट, चिकणी दमट आणि डाट भुरभुरीत माती कांद्याच्या पिकासाठी सर्वोत्तम असते.

5-6 वेळा नांगरणी करून जमिनीची मशागत केली जाते.

जास्तीतजास्त पीएच घटक 5.8 आणि 6.5 यादरम्यान असावेत. पीएच स्तर राखण्यासाठी हेक्टरी 50 किलोग्रॅम जिप्सम वापरावे. (मातीतील पीएच स्तरानुसार)

जमिनीची मशागत करताना जास्तीतजास्त पाण्याचा निचरा कसा होईल आणि जमीन तणमुक्त कशी राहील हे पहावे.

शेवटच्या नांगरणीपूर्वी 15-20 टन उत्तम प्रतीचे शेणखत द्यावे.

पोस्टला पसंती दर्शवण्यासाठी खाली दिलेले लाईक बटन दाबा आणि शेअर बटन दाबून इतर शेतकर्‍यांशी माहितीचे आदानप्रदान करा.

Share

Application and Dose of Sulphur in Chickpea

सल्फर हे हरबर्‍यासाठी सर्वात महत्वाच्या पोषक तत्वांपैकी एक आहे. हेक्टरी 20 किलो सल्फरचा वापर उत्तम असल्याचे आढळून आले आहे. 90% डब्लूडीजी, जिप्सम, पाइराइट, सिंगल सुपर फॉस्फेट अशा सल्फरच्या वेगवेगळ्या स्रोतांचे  परिणाम समान असल्याचे आढळून आले आहे.

पोस्टला पसंती दर्शवण्यासाठी खाली दिलेले लाईक बटन दाबा आणि शेअर बटन दाबून इतर शेतकर्‍यांशी माहितीचे आदानप्रदान करा.

Share

Irrigation management in Onion

कांद्याच्या पिकाची पाण्याची आवश्यकता ऋतु, मातीचा प्रकार, सिंचनाची पद्धत आणि पिकाचे वय यावर अवलंबून असते. सामान्यता पेरणीच्या वेळी, पेरणीनंतर तीन दिवसांनी पाणी देण्याची गरज असते आणि त्यानंतर मातीतील ओलीनुसार 7-10 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे लागते. खरीप पिकाला सामान्यता 5-8 वेळा पाण्याची गरज असते. उशिरा केलेल्या खरीप लागवडीला 10-12 वेळा पाणी द्यावे लागते. रब्बीच्या पिकाला 12-15 वेळा पाणी द्यावे लागते. कांद्याच्या पिकाची मुळे उथळ असल्याने चांगली वाढ आणि कंदाच्या विकासासाठी जमिनीत आवश्यक ती ओल टिकवण्यासाठी सतत थोडे थोडे पाणी देणे आवश्यक असते. पीक तयार झाल्यावर (काढणीच्या 10-15 दिवस आधी) आणि रोपे मान टाकू लागल्यावर पाण्याला ताण दिल्यास साठवणुकीच्या काळात कुजणे कमी होण्यास मदत होते.

पोस्टला पसंती दर्शवण्यासाठी खाली दिलेले लाईक बटन दाबा आणि शेअर बटन दाबून इतर शेतकर्‍यांशी माहितीचे आदानप्रदान करा.

Share