Weed management in Onion
कांद्यातील तणवाढीचे नियंत्रण करण्यासाठी पुनर्रोपणीनंतर 3 दिवसांनी पेंडिमेथालीन @ 100 मिली. / 15 लीटर पाणी किंवा ऑक्सिफ्लोरफेन 23.5% EC @ 15 मिली. / 15 लीटर पाणी वापरण्याची शिफारस केली जाते. त्याचबरोबर खरीप पिकच्या पुनर्रोपणीनंतर 25-30 दिवसांनी आणि रब्बी पिकाच्या पुनर्रोपणीनंतर 40-45 दिवसांनंतर हाताने निंदणी करून तण काढावे. रब्बीच्या मोसमात तांदळाचा भुस्सा, गवत किंवा गव्हाची टरफले वापरुन मल्चिंग करण्याने उत्पादन वाढते अशी शिफारस करण्यात येते. ऑक्सिफ्लोरफेन 23.5% EC 1 मिलीलीटर / ली.पाणी + क्विजलॉफॉप एथाइल 5% ईसी @ 2 मिलीलीटर / लीटर पाणी हे मिश्रण पुनर्रोपणीनंतर 20-25 दिवसांत आणि त्यानंतर 30-35 दिवसांनी फवारल्यास तणावर अधिक चांगले नियंत्रण होते आणि उत्पादन वाढते.
पोस्टला पसंती दर्शवण्यासाठी खाली दिलेले लाईक बटन दाबा आणि शेअर बटन दाबून इतर शेतकर्यांशी माहितीचे आदानप्रदान करा.
SharePrevention of Fusarium Wilt in Gram
हरभर्यावरील मर आणि पानगळीचा रोग फ्युजॅरियम ऑक्सिस्पोरम जिवाणुंमुळे होतो. उष्ण आणि दमट वातावरण त्यांच्यासाठी पोषक असते. या रोगापासून बचाव करण्यासाठी पुढील खबरदारीचे उपाय योजावेत:
- सहा वर्षाच्या उत्पादनाचे चक्र अवलंबावे.
- पावसाळ्यातील शेतातील ओल टिकवावी.
- खोल नांगरणी (6-7 इंच) करून शेत समपातळीत आणावे.
- रोगमुक्त बियाणे वापरावे.
- रोगप्रतिकारक जाती लावाव्यात.
- एक किलो बियाण्यासाठी 3 ग्रॅम या प्रमाणात कार्बेन्डाजिम वापरुन बीजसंस्करण करावे.
- तापमान अधिक असताना (उष्ण वातावरणात पेरणी करू नये. ऑक्टोबरच्या दुसर्या आणि तिसर्या आठवड्यात पेरणी करावी.
- नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये पाणी द्यावे.
Share
Fertilizer and Manure in Onion
शेणखत हेक्टरी 12-20 टन या प्रमाणात जमीन तयार करताना मिसळा. नायट्रोजन हेक्टरी 120 किलो, फॉस्फरस हेक्टरी 60 किलो, पोटाश हेक्टरी 75 किलो वापरा.
20 किलो सल्फर, 10 किलो बोरेक्स आणि 10-15 किलो झाईम दिल्याने उत्पादन आणि गुणवत्तेत वाढ होते.
SharePea seed rate and sowing
मटारच्या बियाण्याचे प्रमाण आणि पेरणी: बियाण्याचे प्रमाण सुरूवातीला – हेक्टरी 100 ते 120 किग्रा. बियाणे वापरावे. मध्ये आणि उशिरा हेक्टरी 80-90 किग्रा. बियाणे वापरावे. बीजसंस्करण: बियाण्याचे राइजोबियम कल्चरने संस्करण करून पेरणी केल्याने मटारचे उत्पादन वाढते. जमीनीची प्रजननक्षमता देखील वाढते. पेरणीपूर्वी 2.5 ग्राम कार्बेन्डाजिम/ किलोग्रॅम वापरुन बियाण्यास शुद्ध करून घ्यावे. पेरणीची वेळ: या पिकाची पेरणी ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यात केली जाते.
ShareSeed and Nursery Bed Treatment in Onion
पेरणीपुर्वी कांद्याच्या बियांवर थायरम @ 2 ग्रॅम/किलो या प्रमाणात वापरुन उपचार करा.
पोस्टला पसंती दर्शवण्यासाठी लाईक बटन दाबा आणि शेअर बटन दाबून इतर शेतकर्यांशी माहितीचे आदानप्रदान करा.
ShareCalcium deficiency in tomato
कमतरतेची लक्षणे आढळून येताच कैल्शियम EDTA @ 15 ग्रॅम/ 15 लीटर पाण्यात मिसळून फवारावे.
ShareSeed treatment of Potato
बटाटा हे कंदाभ पीक असून त्याला बियाणे आणि मातीतून पसरणार्या वेगवेगळ्या जिवाणूजन्य रोगांची लागण होते. त्यामुळे बटाट्याचे बीज संस्करण करणे अत्यंत महत्वाचे ठरते. बटाट्याचे बीज संस्करण करण्यासाठी कार्बोक्सीन 37. 5 % + थायरम 37. 5 % @ 200 ग्रॅम/एकर किंवा कार्बेन्डाजिम 12 % + मेंकोजेब 63% WP @ 200 ग्रॅम/ एकर या प्रमाणात वापरावे.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
ShareControl of leaf miner in Tomato
पाने पोखरणारी अळी ही टोमॅटोच्या पिकावरील प्रमुख कीड असून ती सुरुवातीच्या अवस्थेत पिकाला हानी पोहोचवते. टोमॅटोवरील पाने पोखरणार्या अळीचे नियंत्रण करण्यासाठी ट्रायजोफॉस 40% EC @ 40 मिली /15 लीटर पाणी किंवा करटोप हाइड्रो क्लोराइड 50% SP @ 25 ग्रॅम/ 15 लीटर पाणी याची फवारणी करावी.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
ShareControl of Bacterial leaf spot disease in Tomato
या रोगामुळे उत्पादनात प्रचंड घट होते. त्याचे प्रभावी नियंत्रण करण्यासाठी स्ट्रेप्टोमायसिन सल्फेट I.P. 90% w/w, टेट्रासायक्लीन हायड्रोक्लोराईड 10% w/w @ 2 ग्रॅम/ 15 लीटर पाणी या प्रमाणात किंवा कासुगामायसिन 3% एस.एल. @ 40 ml / 15 लीटर पाणी + कॉपर ऑक्सी क्लोराइड 50% WP @ 40 ग्रॅम/ 15 लीटर पाणी रोगाची सुरुवातीची लक्षणे आढळून येताच फवारावे.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share