“Neemastra” A Bio-Insecticides

“नीमास्त्र”: एक जैविक कीटकनाशक

नीमास्त्र – हे निंबोणीपासून बनवलेले अत्यंत प्रभावी जैविक कीटकनाशक आहे. ते रसशोषक कीड, अळी इत्यादि कीटकांचे नियंत्रण करण्यासाठी वापरतात.

नीमास्त्र बनवण्याची पद्धत –

सर्वप्रथम प्लॅस्टिकच्या भांड्यात 5 किलोग्रॅम निंबोणीची पानांची चटनी आणि 5 किलोग्रॅम निंबोणीची फळे वाटून आणि कुटून घ्यावीत आणि त्यात 5 लीटर गोमूत्र आणि 1 किलोग्रॅम गाईचे शेण घालावे. या सर्व सामग्रीला दांडक्याने चांगले ढवळून जाळीदार कापडाने झाकून ठेवावे. हे मिश्रण 48 तासात तयार होते. या मिश्रणाला 100 ली. पाण्यात मिसळून त्याचा कीटकनाशक म्हणून वापर करता येतो.

फायदे –

  • मनुष्य, वातावरण आणि पिकास शून्य हानी.
  • जैविक विघटन होत असल्याने जमिनीची संरचना सुधारते.
  • हे केवळ हानिकारक किडीला मारते. त्याने उपयुक्त किड्यांना हानी होत नाही.
  • शेतकर्‍यासाठी अत्यंत उपयुक्त आणि स्वस्त उपाययोजना.
  • जैविक कीटकनाशकांच्या वापराने पिकात कीड/ रोगाबाबत सहनशीलता निर्माण होत नाही. या उलट रासायनिक कीटकनाशकांच्या वापराने किदिनमध्ये प्रतिरोधक क्षमता उत्पन्न होत आहे. त्यामुळे ती निरुपयोगी ठरत आहेत.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

See all tips >>