Caring of Dairy Cow after Calving

दुभत्या गायींची व्याल्यानंतरची देखभाल:-

दुभत्या गायींसाठी व्याल्यानंतरचा कालावधी सर्वात महत्वाचा असतो.

या कालावधीत जनावरांच्या शरीरात कोलोस्ट्रम आणि दूध उत्पन्न करण्यासाठी ऊर्जा आणि पोषक तत्वांची अत्यधिक आवश्यकता असते. त्याच वेळी त्यांची भूक कमी झालेली असल्याने त्यांच्या शरीरातील ऊर्जेची पातळी घसरते आणि पोषक तत्वांचा अभाव जाणवतो.

त्यामुळे उत्तम आरोग्य, दुधाचे उत्पादन आणि प्रजननासाठी व्याल्यानंतर लगेचच गायींची उत्तम देखभाल करणे महत्वाचे असते. व्याल्यानंतर लगेचच गायींची देखभाल करण्यात पुढील बाबी महत्वाचा असतात –

  • व्याल्यानंतर गायी दुधाचा ताप आणि केटोसिससारख्या रोगांपासून मुक्त राहतील यासाठी त्यांची नीट देखभाल करावी.

(थरथर, कान झटकणे, सुस्ती, सुकलेले आचळ, शरीराचे तापमान कमी होणे, झोपून राहणे, सूज आणि कमी सावध असणे ही दुधाच्या तापाची काही लक्षणे आहेत.)

(मूत्र आणि श्वासाला गोड वास येणे, ताप, वजनातील घट इत्यादि केटोसिसची लक्षणे आहेत.)

  • नुकत्याच व्यालेल्या गाईला आजारी गायींच्या बरोबर ठेवू नये.
  • स्तन शोथ रोखण्यासाठी स्वच्छता राखावी. (नुकत्याच व्यालेल्या गायींना स्तन शोथ होण्याची शक्यता अधिक असते.)
  • नुकत्याच व्यालेल्या गाईला तणावमुक्त ठेवावे. अधिक उष्णता/ थंडी आणि पावसापासून त्यांचे संरक्षण करावे. कुत्री, मांजरे आणि इतर सर्व आक्रमक जनावरांना नुकत्याच व्यालेल्या गाईपासून दूर ठेवावे.
  • नुकत्याच व्यालेल्या गाईला पोषक तत्वे मिळण्यासाठी आणि भूक वाढवण्यासाठी ताज्या खाद्यासह पोषक आहार द्यावा.
  • जनावर आपला संपूर्ण आहार खात आहे, अर्धवट टाकत नाही आणि नेहमीप्रमाणे रवंथ करत आहे याकडे लक्ष द्यावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

See all tips >>