Control of Blight and Foot Rot in Pea Crop

मटारमधील अंगक्षय आणि बुड कुजव्या रोगाचे नियंत्रण:-

लक्षणे:-

  • पानांवर गडद करड्या कडा असलेले काळपट ते करड्या रंगाचे गोल डाग आढळून येतात.
  • खोडावरील डाग लांबट, दाबलेले आणि काळपट जांभळ्या रंगाचे असतात.
  • हे डाग एकमेकात मिसळतात आणि संपूर्ण खोडावर पसरतात. अशा प्रकारे खोड कमकुवत होते.
  • फळांवरील डाग लाल किंवा करड्या रंगाचे आणि अनियमित आकाराचे असतात.

नियंत्रण:-

  • निरोगी बियाणे वापरावे आणि पेरणीपुर्वी कार्बनडेझिम+मॅन्कोझेब@ 250 ग्रॅम/ क्विन्टल मात्रेने बीज संस्करण करावे.
  • रोगग्रस्त रोपांवर फुलोरा येण्यापूर्वी मॅन्कोझेब @ 400 ग्रॅम/ एकर फवारावे आणि 10-15 दिवसांनंतर पुन्हा फवारणी करावी.
  • रोगग्रस्त रोपे उपटून नष्ट करावीत.
  • पाण्याच्या निचार्‍याची योग्य ती व्यवस्था करावी.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

See all tips >>