Control of White fly in Okra

भेंडीवरील पांढर्‍या माशीचे नियंत्रण:-

  • कोवळ्या तसेच वाढ झालेल्या पानांच्या खालील भागातून रस शोषतात आणि त्यांनी निर्माण केलेल्या गोड चिकट्यामुळे प्रकाश संश्लेषणात अडथळा येतो.
  • पाने रोगग्रस्त दिसतात. आणि सुटी मोल्डने झाकली जाते. ही कीड पिवळा शिरांचे मोज़ेक विषाणू आणि पान मुरड रोगाची वाहक असते.
  • नियंत्रण:- पिवळ्या रंगाचे चिकट कागद शेतात ठिकठिकाणी लावावेत.
  • डायमिथोएट 30 मिली./पम्प किंवा थायमेथोक्जोम 5 ग्रॅम/पम्प किंवा एसीटामीप्रिड 15 ग्रॅम/ पम्प ची फवारणी 10 दिवसांच्या अंतराने 4-5 वेळा करावी.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Irrigation in Coriander

कोथिंबीरीच्या शेतातील सिंचन:-

पेरणीनंतर लगेचच पहिले सिंचन करावे आणि दुसरे सिंचन त्यानंतर तीन दिवसांनी करावे. त्यानंतर दर 7-10 दिवसांनी पाणी सोडावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Nutrient management in sponge gourd and ridge gourd

घोसाळी आणि दोडक्यातील पोषक तत्वांचे व्यवस्थापन:-

  • शेताची मशागत करताना 20-25 टन प्रति हेक्टर शेणखत वापरावे.
  • 75 किलोग्रॅम यूरिया 200 किलोग्रॅम सिंगल सुपर फास्फेट आणि 80 किलोग्रॅम म्यूरेट ऑफ़ पोटाश शेवटच्या नांगरणीच्या वेळी द्यावे.
  • उठलेल्या 75 किलोग्रॅम यूरियाची अर्धी मात्रा रोपांना 8-10 पाने फुटल्यावर आणि उरलेली अर्धी मात्रा फुलोरा येण्याच्या वेळी द्यावी.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

ग्रामोफोन को बेस्ट एग्री स्टार्टअप अवार्ड

ग्रामोफोनला बेस्ट अ‍ॅग्री स्टार्टअप अ‍ॅवॉर्ड

दिनांक 22 फेब्रुवारी रोजी नवी दिल्ली येथे भारतीय कृषि आणि खाद्य परिषदेने आयोजित केलेल्या पहिल्या ऑल इंडिया अ‍ॅग्री स्टार्टअप कन्व्हेंशनमध्ये ग्रामोफ़ोन (एगस्टेक टेक्नोलॉजिज प्रा. लि.) ला कृषि क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी माननीय श्री सुरेश प्रभु केन्द्रीय मंत्री, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय यांच्या हस्ते बेस्ट अ‍ॅग्री स्टार्टअप अ‍ॅवॉर्ड दिले गेले.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Staking in Tomato

टोमॅटोच्या रोपांना आधार देणे:-

  • टोमॅटोच्या रोपांना पेरणीनंतर 2-3 आठवड्यांनी आधार देतात.
  • अमर्याद वाढ होणार्‍या वाणांसाठी ओळीच्या समांतर बांबूच्या खुंटया गाडून त्यांना दोन किंवा तीन तारा ताणून बांधतात. या तारांना सुतळी किंवा दोरीने रोपे बांधतात.
  • रोपांना योग्य वेळी आधार देण्याने फळांची गुणवत्ता आणि उत्पादन वाढते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Season of Planting of Okra

भेंडीच्या लागवडीसाठी सुयोग्य वेळ:-

  • भेंडीचे पीक वर्षात दोन वेळा घेतले जाते.
  • खरीपाच्या पिकासाठी जून महिन्याच्या शेवटी पेरणी करावी.
  • उन्हाळी पिकासाठी फेब्रुवारी महिन्याच्या शेवटापासून ते मार्च महिन्याच्या सुरुवातीपर्यंत पेरणी करावी.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Time of Sowing of Bitter Gourd

कारल्याच्या लागवडीसाठी सुयोग्य वेळ:-

  • उन्हाळी पिकासाठी बियाणे जानेवारी-फेब्रुवारीत पेरावे.
  • खरीपाच्या पिकासाठी बियाणे मे-जून महिन्यात पेरावे.
  • रब्बीच्या पिकासाठी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये बियाणे पेरावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Land preparation for Brinjal

वांग्याच्या पिकासाठी जमिनीची मशागत:-

  • वांग्याची वाढ आणि विकास चांगल्या प्रकारे होण्यासाठी शेतात पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था उत्तम असावी.
  • शेताची 4-5 वेळा नांगरणी करून माती मोकळी करावी.
  • शेताची शेवटची नांगरणी करताना शेणखत मिसळावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Objectives of Soil testing

मृदा परीक्षणाचे उद्देश्य:-

  • पिकांसाठी रासायनिक खतांची योग्य मात्रा ठरवण्यासाठी.
  • अल्कली आणि आम्ल जमीनींत सुधारणा करून त्यांना सुधारून कसण्यायोग्य बनवण्याचा योग्य मार्ग ठरवण्यासाठी.
  • पिकाची लागवड करण्यासाठी जमिनीची अनुकूलता ठरवण्यासाठी.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Control of Thrips

थ्रिप्सचे (फुलकिड्यांचे) नियंत्रण

फुलकिडे रोपांमधील रस शोषतात त्यामुळे रोपे पिवळी पडून कमज़ोर होतात आणि उत्पादन घटते. त्यांच्या नियंत्रणासाठी प्रोफेनोफोस 400 मिली. प्रति एकर किंवा फिप्रोनिल 400 मिली. प्रति एकर किंवा थायमेथोक्झोम 100 ग्रॅम प्रति एकर दर 10 दिवसांनी फवारावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share