Suitable Climate and Soil for Tomato Cultivation

टोमॅटोच्या लागवडीसाठी उपयुक्त हवामान आणि माती:-

उपयुक्त हवामान:-

  • टोमॅटोचे पीक प्रकाशासाठी असंवेदनशील असते आणि उष्ण हवामानात उत्तम येते.
  • त्याच्या चांगल्या वानस्पतिक वाढीसाठी दिवसाचे तापमान 21 ते 28 डिग्री से.ग्रे. आणि रात्रीचे तापमान 15 ते 20  डिग्री से.ग्रे. या दरम्यान असावे.
  • फळांचा लाल रंग विकसित होण्यासाठी 21 ते 24 डिग्री से.ग्रे. तापमान उपयुक्त असते.
  • या पिकाची लागवड जास्त पर्जन्यमान असलेल्या भागात सहजपणे करता येत नाही.

उपयुक्त माती:-

  • टोमॅटोची लागवड रेताड ते भारी अशा सर्व प्रकारच्या मातीत सहजपणे करता येते.
  • पाण्याचा चांगला निचरा, पी.एच. स्तर 7 ते 8.5 या दरम्यान असलेली जीवांशयुक्त दोमट माती या पिकासाठी उपयुक्त असते.
  • सहसा रेताड जमीन लवकर पक्व होणार्‍या वाणांसाठी तर भारी माती असलेली जमीन उशिरा पक्व होणार्‍या आणि जास्त उत्पादन देणार्‍या वाणांसाठी चांगली असते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Control of Anthracnose or Pod Blight in Soybean

सोयाबीनवरील में अ‍ॅन्थ्रेक्नोंज आणि शेंग कुजव्या रोगाचे नियंत्रण:

  • हा बीज आणि मृदा जनित रोग आहे.
  • सोयाबीनमध्ये फुलोरा येण्याच्या वेळी खोड, पर्णवृन्त आणि शेंगांवर लाल ते गडद करड्या रंगाचे, अनियमित आकाराचे डाग दिसू लागतात.
  • नंतर हे डाग बुरशीच्या काळ्या संरचना (एसरवुलाई) आणि टोकदार संरचनानी भरतात.
  • पानांच्या शिरा पिवळ्या-करड्या होतात, पाने मुडपतात आणि गळून पडतात. ही या रोगाची लक्षणे आहेत.

नियंत्रण:-

  • एनआरसी 7 आणि 12 यासारखी रोग प्रतिकारक वाणे वापरावीत.
  • पेरणीपुर्वी थायरम + कार्बोक्सीन 2  ग्रॅम/कि.ग्रॅम. बियाणे या मात्रेचा वापर करून बीजसंस्करण करावे.
  • रोगाची लक्षणे आढळून येताच कार्बेन्डाजिम+ मॅन्कोझेब 75% 400 ग्रॅ. प्रति एकर मात्रा फवारावी.
  • उपद्रव तीव्र असल्यास टॅबुकोनाझोल 25.9% EC 200 मिली प्रति एकर मात्रा फवारावी.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Happy Raksha Bandhan

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

चन्दन का टीका रेशम का धागा,

सावन की सुगंध बारिश की फुहार,

भाई की उम्मीद बहना का प्यार,

ग्रामोफ़ोन टीम की तरफ से मुबारक हो आपको “रक्षा बंधन का त्योहार”

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Share

Spacing for Cauliflower

फुलकोबीच्या रोपांमधील सुयोग्य अंतर:-

  • फुलकोबीच्या पिकातील सुयोग्य अंतर वाण, जमिनीचा प्रकार आणि हंगामावर अवलंबून असते.
  • रोपातील अंतर पुढीलप्रमाणे असावे:
  • लवकरच्या हंगामातील वाणे:- 45 x  45 से.मी.
  • मध्य हंगामातील वाणे:- 60 x 40 से.मी.
  • उशीराच्या हंगामातील वाणे:- 60 x 60 से.मी. किंवा 60 x 45 से.मी.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Damping Off Disease in Brinjal

वांग्यातील आद्र गलन रोगाचे नियंत्रण:-

लक्षणे:-

हा रोग सामान्यता रोपे नर्सरीत असताना होतो.

  • पावसाळ्यातील अत्यधिक ओल आणि तापमान हे घटक मुख्यत्वे या रोगाच्या प्रसारास अनुकूल असतात.
  • या रोगाचा हल्ला सामान्यता पिकाच्या दोन अवस्थामध्ये होतो. या रोगाची दोन प्रकारची लक्षणे आढळून येतात.
  • पहिले आर्द्रगलन सामान्यता बियाच्याला मोड फुटण्यापूर्वी होते आणि रोप उगवण्यापूर्वी बियाणे सडून जाते.
  • दूसरे आर्द्रगलन नवीन उतींच्या संक्रमणाच्या वेळी होते.
  • कोवळ्या रोपांचे शेंडे कुजतात. संक्रमित उती मुलायम होतात आणि आखडतात. रोप जळून जाते आणि मोडून पडते.

नियंत्रण:-

  • पेरणीसाठी निरोगी बियाणे वापरावे.
  • पेरणीपुर्वी थाइरम 2 ग्रॅम प्रति कि. ग्रॅम बियाणे या प्रमाणात मात्रा वापरुन बीजसंस्करण करावे.
  • नर्सरी सतत एकाच जागी बनवू नये.
  • नर्सरीच्या पृष्ठभागातील मातीचे कार्बेन्डाझिम 50% WP 5 ग्रॅम प्रति मीटर क्षेत्रफल या प्रमाणात मात्रा वापरुन संस्करण करावे आणि कार्बेन्डाझिम+ मॅन्कोझे 75% ची मात्रा 3 ग्रॅम प्रति लीटर पाण्यात वापरुन 15 दिवसांच्या अंतराने नर्सरीत फवारणी करावी.
  • उन्हाळ्यात मे महिन्याच्या शेवटी केलेल्या नर्सरीत पाणी फवारून आणि त्यानंतर 250 गेज जाड पॉलीथिन अंथरून सूर्यउर्जेद्वारे 30 दिवस संस्करण केल्यानंतर बियाणे पेरावे.
  • आर्द्रगलनाच्या प्रतिबंधासाठी ट्राइकोडर्मा विरीडी सारख्या जैविक औषधांची 1.2 कि. ग्रॅम प्रति हेक्टर मात्रा वापरावी.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Suitable Soil for Bottle Gourd Cultivation

दुधीभोपळ्याच्या लागवडीसाठी उपयुक्त माती

  • सर्व प्रकारच्या जमिनीत दुधीभोपळ्याची लागवड सहजपणे करता येते पण जमीन जास्त आम्लीय किंवा क्षारीय किंवा लवणीय नसावी.
  • दुधीभोपळ्याच्या लागवडीसाठी दोमट किंवा रेताड दोमट मृदा सर्वाधिक उपयुक्त असते.
  • मृदेत कार्बनिक पदार्थ असावेत आणि जमिनीतून पाण्याचा निचरा करण्याची उत्तम व्यवस्था असावी.
  • पिकाला मृदाजनित रोगांपासून वाचवण्यासाठी शेतात किमान दोन वर्षांचे पीक चक्र अवलंबावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Suitable Climate for Cauliflower

फुलकोबीसाठी अनुकूल वातावरण:-

  • फुलकोबीची वाणे तापमानासाठी अतिसंवेदनशील असतात.
  • अंकुरण चांगले होण्यासाठी 10°C ते 21°C तापमान उपयुक्त असते.
  • रोपे आणि फुलकोबीच्या विकासासाठी 10°C ते 21°C तापमान अनुकूल असते.
  • 10°C हून कमी तापमानात रोपांचा विकास कमी होतो आणि फुलकोबी उशिरा पक्व होते.
  • अधिक तापमानात फुलकोबीमधून पाने फुटतात.
  • सुयोग्य वाण निवडणे त्यामुळे अत्यावश्यक असते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Land Preparation and Seed Rate for Okra Cultivation

भेंडीच्या लागवडीसाठी जमिनीची मशागत आणि बियाण्याचे योग्य प्रमाण:-

  • दोन वेळा खोल नांगरट करून आणि त्यानंतर दोन वेळा वखर चालवून माती भुसभुशीत करावी आणि आवश्यकता असल्यास कुळव वापरुन जमीन सपाट करावी.
  • जड मातीत पेरणी सरींमध्ये करावी. शेणखत, कम्पोस्ट खत आणि निंबोणीची पेंड इत्यादि वापरुन उर्वारकांची मात्रा कमी करता येऊ शकते.
  • उन्हाळी पिकासाठी 7 ते 8 कि.ग्रॅ. बियाणे/एकर या प्रमाणात बियाणे वापरुन पेरणी करावी.
  • पावसाळी पिकासाठी बियाण्याचे प्रमाण 3-4 कि.ग्रॅ.बियाणे/प्रति हेक्टर ठेवावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Cordially Greetings and Good wishes of 72 th Independence Day

72 व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

तहे दिल से मुबारक करते हैं,

चलो आज फिर उन आजादी के लम्हों को याद करते हैं,

कुर्बान हुए थे जो वीर जवान भारत देश के लिए,

उनके जज्बे और वीरता को चलो आज प्रणाम करते है|

ग्रामोफ़ोन टीमच्या वतीने 72 व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Management of Mealy Bug in Cotton

कापसावरील कापसी ढेकणी (मीली बग) किडीचे नियंत्रण:-

  • कापसी ढेकणी कापसाच्या पानाखाली वसाहत बनवून मेणचट आच्छादन तैय्यार करते.
  • कापसी ढेकणी मोठ्या प्रमाणात चिकटा तैय्यार करते. त्याच्यावर काळी बुरशी तैय्यार होते.
  • ग्रस्त झाडे कमजोर दिसतात आणि काळी पडतात. त्यामुळे त्यांची फलनक्षमता कमी होते.

नियंत्रण:-

  • पूर्ण वर्षभर शेत तणमुक्त ठेवावे.
  • शेतावर बारकाईने लक्ष ठेवावे, जेणेकरून सुरुवातीलाच किडीची लागण लक्षात येईल.
  • प्रभावी नियंत्रणासाठी सुरुवातीच्या अवस्थेतच प्रतिबंधक उपाययोजना करावी.
  • आवश्यकता असल्यास निंबोणी आधारित निंबोणीचे तेल @ 75 मिली प्रति पंप किंवा निंबोणीचे सत्व @ 75 मिली प्रति पम्प किंवा निंबोणीचे तेल यासारखी वनस्पतिजन्य कीटकनाशके फवारावीत.
  • रासायनिक नियंत्रणासाठी डायमिथोएट @ 30 मिली प्रति पम्प किंवा प्रोफेनोफॉस @ 40 मिली प्रति पम्प किंवा ब्यूप्रोफेज़िन @ 50 मिली प्रति पम्प फवारावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share