कांद्याच्या पिकाची पाण्याची आवश्यकता ऋतु, मातीचा प्रकार, सिंचनाची पद्धत आणि पिकाचे वय यावर अवलंबून असते. सामान्यता पेरणीच्या वेळी, पेरणीनंतर तीन दिवसांनी पाणी देण्याची गरज असते आणि त्यानंतर मातीतील ओलीनुसार 7-10 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे लागते. खरीप पिकाला सामान्यता 5-8 वेळा पाण्याची गरज असते. उशिरा केलेल्या खरीप लागवडीला 10-12 वेळा पाणी द्यावे लागते. रब्बीच्या पिकाला 12-15 वेळा पाणी द्यावे लागते. कांद्याच्या पिकाची मुळे उथळ असल्याने चांगली वाढ आणि कंदाच्या विकासासाठी जमिनीत आवश्यक ती ओल टिकवण्यासाठी सतत थोडे थोडे पाणी देणे आवश्यक असते. पीक तयार झाल्यावर (काढणीच्या 10-15 दिवस आधी) आणि रोपे मान टाकू लागल्यावर पाण्याला ताण दिल्यास साठवणुकीच्या काळात कुजणे कमी होण्यास मदत होते.
पोस्टला पसंती दर्शवण्यासाठी खाली दिलेले लाईक बटन दाबा आणि शेअर बटन दाबून इतर शेतकर्यांशी माहितीचे आदानप्रदान करा.
Share