योजना
या योजनेचे उद्दीष्ट जमीनीवरील आणि भूमिगत पाण्याची उपलब्धता वाढवणे हे आहे. हे तलाव शेतकरी स्वत:च्या शेतात बनवतात आणि ते पिकांना जीवंत ठेवण्यासाठी पाणी पुरवण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरतात. बलराम तलाव भू जल संवर्धन आणि जवळपासच्या विहिरी आणि बोअरवेलना चार्ज करण्यासाठी देखील उपयुक्त असल्याचे दिसून आले आहे.
कोणाला लाभ मिळेल?
ही योजना सम्पूर्ण मध्यप्रदेशात चालवली जाते. तिच्यानुसार सर्व वर्गातील शेतकर्यांना तलाव बनवण्यासाठी अनुदान दिले जाते. निवडलेले शेतकरी केवळ एकदाच या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
लाभ कसा घ्यावा?
इच्छुक शेतकर्यांनी क्षेत्रीय ग्रामीण कृषि विस्तार अधिकारी यांच्याकडे तलाव बनवण्यासाठी केलेल्या अर्जाच्या आधारे त्यांची नोंदणी केली जाते. तलावाला तांत्रिक मंजूरी जिल्हा पंचायत/ जनपद पंचायत देते. अनुदानासाठी तलाव निर्माण झाल्यावर प्रथम येणार्यांना प्रथम द्यावे या तत्वावर प्राथमिकता मिळते.
काय लाभ मिळेल?
बलराम तलावाच्या कामाची प्रगती आणि मूल्यांकनाच्या आधारे पात्रतेनुसार खालील वित्तीय साहयाची तरतूद आहे:
अनुदान
सर्वसामान्य वर्गातील शेतकर्यांच्या गुंतवणुकीच्या 40% आणि जास्तीतजास्त रु. 80,000/-
लघु सीमान्त शेतकर्यांसाठी गुंतवणुकीच्या 50% आणि जास्तीतजास्त रु. 80,000/-
अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या शेतकर्यांना गुंतवणुकीच्या 75% आणि जास्तीतजास्त रु. 1,00,000/-
स्रोत:-http://mpkrishi.mp.gov.in/hindisite/suvidhaye.aspx
पोस्टला पसंती दर्शवण्यासाठी खाली दिलेले लाईक बटन दाबा आणि शेअर बटन दाबून इतर शेतकर्यांशी माहितीचे आदानप्रदान करा.
Share