Importance of Zinc

पिकांसाठी झिंकचे महत्त्व

  • भारतातील शेती करण्यायोग्य जमिनीतील 50% पर्यंत जमिनीत झिंकचा अभाव आढळून येतो. हे प्रमाण सन 2025 पर्यंत 63% एवढे वाढेल असा अंदाज आहे.
  • वेगवेगळ्या अभ्यासांमधून असे आढळून आले आहे की मातीत झिंकचा अभाव असल्यास तिच्यात पिकवलेल्या पिकांमध्येदेखील झिंकचा अभाव आढळून येतो. IZAI च्या अंदाजानुसार भारतातल्या 25% लोकसंख्येत झिंकचा अभाव आढळून येतो.
  • भारतातिल झिंक (Zn) हे पिकाच्या उत्पादनातील घटीसाठी जबाबदार असलेले चौथे सर्वात महत्वाचे तत्व समजले जाते. हे आठ आवश्यक सूक्ष्म पोषक तत्वांपैकी एक आहे.
  • झिंकच्या अभावामुळे पिकाच्या उत्पादन आणि गुणवत्तेत मोठी घट येऊ शकते. रोपांमधील झिंकच्या अभावाची लक्षणे आढळून येण्यापूर्वीच पिकाच्या उत्पादनात 20 टक्केपर्यंत घट होऊ शकते असे आढळून आलेले आहे.
  • रोपाच्या विकासासाठी झिंक महत्वाचे असते. अनेक रोपात, अनेक एंझाईममध्ये आणि प्रोटीनमध्ये तो प्रमुख घटक असतो. त्याशिवाय झिंक रोपांच्या विकासाशी संबंधित हार्मोन्स निर्माण करतात. त्यामुळे पेरांची लांबी वाढते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

How to increase flowering in Bottle gourd?

दुधी भोपळ्यातील फुलोरा कसा वाढवावा

  • दुधी भोपळ्याच्या मादी फुलांपासून जास्त फलधारणा होते आणि त्यामुळे उत्पादन वाढते.
  • वेलाला 6-8 पाने फुटल्यावरइथेलीन किंवा जिब्रेलिक आम्लाचे  0.25 -1ml प्रति 10 लीटर पाण्यात मिश्रण बनवून दुधी भोपळ्याच्या वेलांवर आणि फुलांवर फवारावे. त्यामुळे मादी फुले आणि फळांची संख्या दुप्पटपर्यंत वाढते.
  • या फवारणीचा परिणाम रोपावर 80 दिवस टिकतो.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Suggestions for control of yellowing of Coriander Leaves

धने/ कोथिंबीरीच्या पानावरील पिवळेपणा नियंत्रित करण्यासाठी उपाय

  • धने/ कोथिंबीर हे महत्वाचे मसाल्याचे पीक आहे. त्याच्या खोड, पाने आणि बियाण्याचा वापर केला जातो.
  • योग्य नियंत्रणाच्या अभावी हे पीक पिवळे पडते आणि उत्पादन घटते.
  • मातीतील नायट्रोजनचा अभाव, रोग आणि किडीमुळे धने/ कोथिंबीरीची पाने पिवळी पडतात.
  • याच्या नियंत्रणासाठी मूलभूत मात्रेत उर्वरकांसह नायट्रोजन आणि फॉस्फरस स्थिरीकरण करणार्‍या जिवाणुंची मात्रा 2 kg प्रति एकर या प्रमाणात मातीत चांगल्या प्रकारे मिसळावी.
  • थायोफिनेट मिथाईल 70 % डब्लूपी @ 250-300 ग्रॅम आणि क्लोरोपायरिफॉस 20 % ईसी @ 500 ml प्रति एकर सिंचनाद्वारे द्यावे.
  • या फवारणीनंतर 19:19:19 ची 500 ग्रॅम प्रति एकर या प्रमाणात फवारणी करावी.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

How to protect our crops from White Grubs

शेणकिडयापासून (पांढरी हुमणी) पिकाचा बचाव

पांढरी हुमणी हे शेतकर्‍यांसाठी मोठे आव्हान ठरत आहे. या किडीच्या हल्ल्यामुळे 80-100 टक्के हानी होण्याची शक्यता असते. 2-14 हुमण्यांमुळे पिकाची 64.7 टक्केपर्यंत हानी नोंदवली गेलेली आहे.

जीवन चक्र:-

  1. ही कीड पहिल्या पावसानंतर कोशातून बाहेर येते आणि त्यानंतर एका महिन्यात जमिनीत 8 इंच खोलीवर अंडी घालते.
  2. या अंड्यातून 3-4 आठवड्यात अळ्या निघतात.
  3. या किडीच्या अळ्या 4-5 महिन्यात अवस्था बदलत पिकाला हानी करतात आणि उन्हाळा सुरू होण्यापूर्वी किडे पुन्हा कोशात जातात.

नियंत्रण कसे करावे ?

रासायनिक उपचार:- फेनप्रोपेथ्रिन 10% ईसी  @ 500 मिली प्रति एकर, फिप्रोनिल 40% + इमिडाक्लोप्रिड 40% डब्ल्यूजी @ 100 ग्रॅम/ एकर किंवा क्लोरपायरीफॉस 20% ईसी @ 500 मिली/ एकर मातीत मिसळावे.

जैविक उपचार:– मेटाराइजियम स्पी. @ 1 किग्रॅ/ एकर आणि बेवरिया + मेटाराइजियम  स्पी. @ 2 किग्रॅ/ एकर या प्रमाणात उर्वरकाबरोबर फवारावे.

यांत्रिक नियंत्रण:-  लाइट ट्रॅप वापरावेत.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Thing to keep in mind before selecting Suitable cotton variety to your field

आपल्या शेतासाठी उपयुक्त कापसाचे वाण निवडताना ध्यानात ठेवायच्या बाबी

भरघोस उत्पादनासाठी योग्य वाणाची निवड करणे आवश्यक असते. वाणाची निवड शेती करण्याच्या उद्देशावर अवलंबून असते. त्यामुळे खाद उद्देशांसाठी योग्य लोकप्रिय वाणांबाबत येथे माहिती दिली जात आहे.

पुढारलेली वाणे:- (140-160 दिवस)

  • आरसीएच 659 बीजी-2 (रासी)
  • मनीमेकर (कावेरी)
  • भक्ती (नुजिवीडू)

मातीच्या प्रकाराच्या आधारे वापरायची वाणे:-

  • आरसीएच 659 बीजी-2 (रासी) (मध्यम ते भारी मातीसाठी)
  • नीओ (रासी) (मध्यम ते हलक्या मातीसाठी)

दाण्याचा मोठा आकार असलेली वाणे:-

  • आरसीएच 659 बीजी-II
  • मनीमेकर (कावेरी)
  • एटीएम केसीएच- बीजी-2 (कावेरी)
  • जेकपॉट (कावेरी)

दाण्याचे वजन चांगले असलेली वाणे (6-7.5 ग्राम):-

  • जॅकपॉट (कावेरी)
  • जादू (कावेरी)
  • एटीएम केसीएच- बीजी-2 (कावेरी)

रस शोषक कीड प्रतिरोधक वाणे:-

  • नीओ (रासी)
  • भक्ति (नुज़िवीडू)

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

How to prepare Nursery for chilli

मिरचीच्या नर्सरीची तयारी कशी करावी

  • मिरचीसाठी नर्सरी बनवण्यासाठी योग्य वेळ 1 मे ते 30 मे हा असतो.
  • सर्वप्रथम नांगरणी करून माती भुसभुशीत करावी.
  • एक एकर क्षेत्रफळासाठी 60 वर्ग मीटर क्षेत्रफळाची आवश्यकता असते. या जागेत 3 मीटर लांब आणि 1.25 मीटर रुंद 16 ते नर्सरी वाफे बनवावेत.
  • 60 वर्ग मीटर क्षेत्रासाठी 750 gm डीएपी, 150 किलो शेणखत लागते.
  • बुरशीजन्य रोगांपसून बचाव करण्यासाठी थियोफॅनेट मिथाइल 0.5 ग्रॅम/ वर्ग मीटर या प्रमाणात मातीत मिसळावे.
  • मिरचीसाठी 100 ग्रॅम/ एकर या प्रमाणात बियाणे लागते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Popular varieties of chilies preferred by farmers of Madhya Pradesh

मध्य प्रदेशातील शेतकर्‍यांकडून पसंत केली जाणारी मिरचीची लोकप्रिय वाणे

निमाड़ भागातील  शेतकरी एप्रिल महिन्याच्या तिसर्‍या आठवड्यात मिरचीच्या नर्सरीची तयारी सुरू करतात. पेरणीपुर्वी 5-7 दिवस वाण निवडावे. भरघोस उत्पादनासाठी योग्य वाणाची निवड आवश्यक असते. वाणाची निवड शेतीच्या उद्देशावर अवलंबून असते. त्यामुळे वेगवेगळ्या उद्देशांसाठी लोकप्रिय वाणांबाबत येथे माहिती दिलेली आहे:

हिरव्या मिरचीच्या तोडणीसाठी उपयुक्त वाणे:-

  • नंदिता (नन्हेम्स)
  • एचपीएच -12 (सिजेंटा)
  • उजाला (नन्हेम्स)
  • एमएचसीपी 310 – तेजा (महिको)

शेतकरी बंधु कोरड्या मिरचीच्या उत्पादनासाठी लागवड करणार असल्यास उपयुक्त वाणे:-

  • सोनल (रासी सीड्स)
  • यूएस 720 (नन्हेम्स)
  • यूएस 611 (नन्हेम्स)
  • एचपीएच -12 (सिजेंटा)

विषाणू प्रतिरोधक वाणे :-

  • एचपीएच -12 (सिजेंटा)
  • सोनल (रासी सीड्स)
  • प्राईड (रासी सीड्स)
  • नंदिता (नन्हेम्स)

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Why & how to apply FYM in soil?

मातीत शेणखत कसे आणि का मिसळावे?

  • देशभरातील अधिकांश शेती करण्यास योग्य जमिनीतील 11% ते 76% पर्यन्त जमिनीत कार्बनिक कार्बनचा अभाव आहे.
  • शेणखत हा कार्बनिक कार्बनचा चांगला स्रोत आहे.
  • मृदा – जैविक कार्बन हा मातीच्या उर्वरतेचा प्रमुख घटक आहे. तो रोपांच्या योग्य वाढीसाठी पाणी धरून ठेवण्याची क्षमता, सरंध्रता अशा मातीच्या भौतिक गुणामध्ये सुधारणा करतो.
  • शेणखत हे शेतीत उर्वरकासारखे वापरले जाणारे कार्बनिक खत आहे. ते शेताची उर्वरता वाढवते. साधारणपणे चांगल्या खतात 0.5% नायट्रोजन, 0.2% फॉस्फरस, 0.5% पोटाश असते.
  • ते मातीतील सूक्ष्म पोषक तत्वे आणि पोषक तत्वे वाढवते आणि अशा तत्वांची उपलब्धता देखील वाढवते.
  • ते पाणी धरून ठेवण्याची क्षमता, सरंध्रता अशा मातीच्या भौतिक गुणामध्ये सुधारणा करते.
  • पावसाच्या पाण्यामुळे विरोचन होऊन मातीतील पोषक तत्वे नष्ट होतात. त्यामुळे एकरी उत्तम प्रतीचे 8-10 टन शेणखत नांगरणी करण्यापूर्वी मातीत चांगले मिसळावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Suitable soil for Cabbage

पानकोबीसाठी उपयुक्त माती

  • पानकोबीच्या शेतीसाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी आणि पी. एच. स्तर 5.5 ते 6.8 असलेली हलकी आणि लोम माती उत्तम असते.
  • लवकर तयार होणार्‍या वाणांसाठी हलकी माती तर मध्य अवधी आणि उशिरा तयार होणार्‍या वाणांसाठी जड लोम माती उपयुक्त असते.
  • लवणीय मातीत बुरशीजन्य आणि जिवाणूजन्य रोगांची जास्त लागण होते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Seed treatment for Sweet corn

स्वीट कॉर्नसाठी बीजसंस्करण

  • पेरणीपुर्वी 2 ग्रॅम कार्बोक्सिन 37.5% + थायरम 37.5% डब्ल्यू पी प्रति कि.ग्रॅम वापरुन बीजसंस्करण करावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share