सामग्री पर जाएं
- पानांवर जांभळ्या रंगाचे लहान डाग पडतात. ते वाढून करड्या रंगाचे, विशिष्ठ आकाराचे गोलाकार बनतात.
- असेच व्रण खोडांवर देखील होतात आणि त्यांचा विस्तार वाढून खोड करड्या किंवा काळ्या रंगाचे होते.
- शेंगांवर तपकिरी किंवा करड्या रंगाचे अनियमित आकाराचे गोल व्रण पडतात.
Share
- कुसुम योजनेअंतर्गत सोलर पॅनल बसवण्यासाठी शेतकऱ्यांना संचाच्या एकूण किंमतीच्या 10 टक्के रक्कम भरावी लागते.
- उरलेल्या रकमेपैकी 30 टक्के रक्कम केंद्र सरकारकडून सबसिडीच्या स्वरुपात तर 30 टक्के रक्कम राज्य सरकारकडून देण्यात येते.
- उरलेल्या 30 टक्के रकमेच्या एवढे कर्ज शेतकरी बँकेकडून घेऊ शकतो.
- बँकेकडून कर्ज मिळवण्यासाठी देखील सरकार शेतकऱ्यांना मदत करते.
Share
- किसान ऊर्जा सुरक्षा एवं उथ्थान महाभियान (कुसुम) योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना विनाअडथळा त्यांच्या शेतात सिंचन करण्यास सक्षम करणे असा आहे.
- या योजनेअंतर्गत एजन्सीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सोलर वॉटर पंप उपलब्ध करून देण्याची जबाबदारी केंद्र सरकारने एनर्जी एफिशियन्सी सर्व्हिसेस लिमिटेड (ईईएसएल) कंपनीकडे सोपवली आहे.
Share
- डोकेदुखी, सूज, दातदुखी, जखमा, कर्करोग, चट्टे आणि इतर अनेक त्वचारोगांवरील वैद्यकीय उपचारांसाठीच्या वापरामुळे झेंडूला चांगली किंमत मिळते.
- झेंडूच्या पाकळ्या सजावट आणि मेक-अप, पुडिंग इत्यादीत वापरण्यासाठी खाद्य रंग, कपड्याचा रंग यासाठी वापरल्या जातात.
- जखमा, भाजलेले, कर्करोग आणि त्वचारोग यावर झेंडू वापरून उपचार करता येतात.
- झेंडूचा अर्क मेणबत्तीत देखील वापरला जातो.
Share
- कोथिंबीर/ धन्याच्या पिकासाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी लोम माती उत्तम असते.
- पावसावर आधारित पिकासाठी चिकणमाती उत्तम असते. सामू 6-8 असावे.
- 20-25o C तापमान कोथिंबीर/ धन्याच्या पिकासाठी उत्तम असते.
- कोथिंबीर/ धन्याच्या पिकासाठी थंड, कोरडे आणि धुकेरहित वातावरण उत्तम असते.
Share
- लहान किडे हिरवे असतात. वाढ झालेले किडे मोठ्या नासपतीच्या आकाराचे हिरव्या, पिवळ्या किंवा गुलाबी रंगाचे असतात.
हानी:-
- पाने, फुले आणि शेंगांमधून रस शोषतात.
- ग्रस्त पाने वाकतात किंवा अनियमित आकाराची होतात. कोंब खुरटतात आणि विकृत आकाराचे होतात.
- माव्यांनी सोडलेल्या चिकट्यावर भुरी वाढते.
Share
- कीड प्रतिकारक वाणे वापरावीत.
- सूत्रकृमींचा बंदोबस्त करण्यासाठी उन्हाळ्यात खोल नांगरणी करावी.
- निंबोणीची पेंड 80 किग्रॅ/ एकर या प्रमाणात वापरावी.
- कार्बोफ्युरॉन 3 जी 8 किग्रॅ/ एकर या प्रमाणात वापरून मृदा उपचार करावेत.
- पेसीलोमायसेस इलासिनस -1% डब्ल्यूपी @ 10 ग्रॅ/ किग्रॅ बियाणे वापरून बीज संस्करण करावे, नर्सरी उपचारासाठी 50 ग्रॅ/ चौ मीटर वापरावे, 2.5 ते 5 किग्रॅ/ हेक्टर मृदा उपचारासाठी वापरावे.
Share
हानी:-
- सूत्रकृमी मुळांवर हल्ला करून लहान गाठी बनवतात.
- हल्ला झालेली रोपांची पाने कोमेजतात आणि गळतात.
- गाठींमुळे पोषक तत्वांच्या आणि पाण्याच्या शोषणात अडथळा येतो आणि त्यामुळे रोपे सुकून मरतात.
- रोपांची वाढ खुरटते आणि फळ धारण शक्ती कमी होते.
- पाने पिवळी पडून वरील पाने सुकतात.
Share
- पुढील उत्पादने वापरून आपण फुलोरा वाढवून उत्पादनात वाढ करू शकतो:
- होमोब्रासिनोलिड 0.04% डब्ल्यू/ डब्ल्यू 100 मिली/ एकर फवारावे.
- समुद्री शेवाळाचे सत्व 200-250 मिली/ एकर वापरावे.
- सूक्ष्म पोषक तत्वे, विशेषतः बोरॉन 200 ग्रॅ/ एकर द्यावीत.
- जिब्रेलिक अॅसिड 2 ग्रॅ/ एकर फवारावे.
Share
- बटाट्याच्या पिकासाठी संपूर्ण हंगाम जास्तीतजास्त ओल राखण्यासाठी उच्च दर्जाचे सिंचन व्यवस्थापन आवश्यक असते.
- वाढीच्या पुढील टप्प्यांमध्ये सिंचन व्यवस्थापन अत्यंत महत्वाचे असते:
- 1) फुटवे येण्याची अवस्था
- 2) कंद स्थापित होण्याची अवस्था
- 3) कंद भरण्याची अवस्था
- 4) पिकाची अंतिम अवस्था
- 5) काढणीपूर्व सिंचन अवस्था
Share