तीळ – उत्तम उन्हाळी पीक
पेरणीसाठी योग्य वेळ: – एप्रिल ते मे या दरम्यानचा कालावधी हा पेरणीसाठी उत्तम काळ आहे.
बियाण्याचे प्रमाण: बियाण्याचे प्रमाण पेरणीची पद्धत, बियाणे आणि हंगामाचा प्रकार यावरून ठरते. पावसाच्या पाण्यावरील पिकासाठी हेक्टरी 6 किग्रॅ/ हेक्टर तर सिंचित शेतात 5 किग्रॅ/ हेक्टर प्रमाण वापरावे.
उत्पादन: – उत्पादन वेगवेगळ्या जातींवर अवलंबून असते आणि चांगल्या पीक व्यवस्थापणामुळे खरीपाच्या पिकाचे सरासरी 200 ते 500 किग्रॅ / हेक्टर तर उन्हाळी सिंचित पिकातून 300 ते 600 किग्रॅ / हेक्टर उत्पादन मिळू शकते.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share