कपास की कीमतों में बढ़ोतरी के आसार

कापसाच्या दरात वाढ होण्याची चिन्हे

कापसाची निर्यात 27% वाढू शकते:- चीनने अमरीकेकडून आयात केलेल्या उत्पादनांवर आयात शुल्क लावल्याने अमेरीकन कापूस महाग झाला आहे. त्यामुळे चीनने नुकताच भारताशी 2 लाख गाठी कापूस आयात करण्याचा सौदा केला आहे. आगामी पिकाच्या हंगामात भारतातून चीनला 25-30 लाख गाठी निर्यात होतील असा अंदाज आहे. देशात कापसाची निर्यात 70 लाख गाठींची पोहचेल अशी आशा आहे. निर्यात मागील अंदाजाहून सुमारे 27 टक्के अधिक असू शकेल. तज्ञांच्या मते कॉटनच्या एक्सपोर्टला चांगली मागणी असल्याचा कापूस उत्पादकांना लाभ होईल.

स्त्रोत :- पत्रिका न्यूज नेटवर्क

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Suitable Soil for Chilli Production

मिरचीच्या उत्पादनास उपयुक्त मृदा:-

  • पाण्याचा उत्तम निचरा होणारी सर्व प्रकारची माती.
  • रेताड, दोमट माती सर्वोत्तम असते.
  • अधिक क्षारयुक्त आणि आम्लीय जमीन उपयुक्त नसते.
  • जमिनीचा पी.एच. स्तर 6- 7 असावा.
  • अधिक लवणीय जमीन अंकुरण आणि वाढ रोखते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Suitable Climate for Chilli

मिरचीसाठी उपयुक्त हवामान:-

  • गरम, आद्र हवामानात उष्णकटिबंधीय परदेशात पीक घेतले जाते.
  • 15-30  डिग्री से तापमान मिरचीच्या लागवडीस उत्तम असते.
  • सरासरी वार्षिक पर्जन्यमान 1200 मि.मि. असते तेथे मिरचीची लागवड पावसावर अवलंबून असलेले पीक म्हणून केली जाते.
  • अधिक उष्णतेने फुलोरा आणि फळे गळून पडतात.
  • डोज 9-10 तास सूर्यप्रकाश मिळाल्यास उत्पादन 21-24% पर्यन्त वाढते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Nutrient Management in Brinjal

वांग्यासाठी पोषक तत्वांचे व्यवस्थापन:-

  • उर्वरकाची मात्रा जमिनीची उर्वरकता आणि पिकाला दिलेल्या कार्बनिक खताच्या मात्रेवर अवलंबून असते.
  • पिकाच्या चांगल्या उत्पादनासाठी 20-25 टन उत्तम प्रतीचे शेणखत मशागत करताना शेतात मिसळावे.
  • शेताची मशागत करताना 50 किलो यूरिया 350 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि 100 किलो म्यूरेट ऑफ पोटाश ची मात्र प्रति हेक्टर घालावी.
  • उरलेली 100 किलो यूरियाची मात्रा एक महिन्यांनंतर रोपणाच्या 3-4 आठवड्यानंतर घालावी.
  • संकरीत वाणांसाठी 200 किलो नायट्रोजन, 100 किलो फॉस्फरस आणि 100 किलो पोटाशची मात्रा देण्याची शिफारस आहे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Land Preparation For Tomato

टोमॅटोसाठी शेताची मशागत:-

  • शेताची चार वेळा नांगरणी केल्यावर कुळव चालवून जमीन नरम, भुसभुशीत आणि सपाट करावी.
  • मशागत करताना 25 टन प्रति हेक्टर शेणखत किंवा कम्पोस्ट खत घालावे.
  • फॉस्फरस आणि पोटाशची पूर्ण मात्रा आणि नायट्रोजनची 25 से 33  टक्के मात्रा वापरावी.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Nutrient Management in Watermelon

कलिंगडासाठी पोषक तत्वांचे व्यवस्थापन:-

  • शेताची मशागत करताना 25-30 टन शेणखत द्यावे.
  • शेवटच्या नांगरणीच्या वेळी 75 किलो यूरिया, 200 किलो SSP आणि 75 किलो पोटाशची मात्रा शेतात मिसळावी.
  • उरलेली 75 किलो यूरियाची मात्रा शेतात दोन ते तीन वेळा समान भागात विभागून द्यावी.
  • फॉस्फरस, पोटाशची सम्पूर्ण मात्रा नायट्रोजनची एक तृतीयांश मात्रा द्यावी.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Time of sowing of Bottle Gourd

दुधीभोपळ्याच्या पेरणीसाठी सुयोग्य वेळ:-

  • दुधीभोपळ्याच्या पिकाची लागवड जानेवारी ते मार्च आणि सप्टेंबर ते डिसेंबरचा मध्य या काळात केली जाते.
  • पावसावर अवलंबून असलेल्या भागात दुधीभोपळ्याची पेरणी मे ते जून महिन्याचा पहिला आठवडा या काळात पाऊस सुरू होण्यापूर्वी करावी.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Irrigation in Bitter Gourd

कारल्यासाठी सिंचन व्यवस्थापन

  • कारल्याचे पीक दुष्काळी आणि अतिरिक्त पाणी असलेल्या भागासाठी सहनशील नसते.
  • रोपण किंवा पेरणीनंतर लगेचच सिंचन करावे. त्यानंतर तिसर्‍या दिवशी आणि त्यानंतर आठवड्यातून एकदा जमिनीतील ओलीनुसार सिंचन करावे.
  • जमिनीच्या वरील भागात (50 सेमी. पर्यन्त) ओल टिकवून धरावी. या भागात अधिक संख्येने मुळे असतात.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Weed Control in Cauliflower

फुलकोबीमधील तणाचे नियंत्रण:-

  • पिकाच्या चांगल्या वाढीसाठी शेताची निंदणी करणे अत्यावश्यक असते.
  • दोन-तीन वेळा हाताने निंदणी आणि एक-दोन वेळा कुदळणी करावी. खोल कुदळणी करू नये.
  • रोपणानंतर पेंडामिथेलीन 30% EC 3-3.5 लीटर प्रति हेक्टर फवारावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Nutrient management of Cauliflower

फुलकोबीमधील पोषक तत्वांचे व्यवस्थापन:-

  • फुलकोबी पिकवण्यासाठी सर्वाधिक पोषक तत्वांची आवश्यकता असते.
  • उर्वरकांची मात्रा जमिनीचा प्रकार आणि कार्बनिक पदार्थांच्या वापरावर अवलंबून असते.
  • शेतात रोपे लावण्यापूर्वी 4 आठवडे 15-20 टन शेणखत मातीत मिसळावे.
  • पिकाच्या चांगल्या वाढीसाठी उर्वरकांची शिफारस केलेली मात्रा – सामान्य वाणासाठी 100 किलो नत्र, 60 किलो फॉस्फरस आणि 100 किलो पोटाश प्रति हेक्टर, संकरीत वाणासाठी 120-180 किलो नत्र, 60 किलो फॉस्फरस आणि 100 किलो पोटाश प्रति हेक्टर|
  • शेताची मशागत करताना नत्राची अर्धी आणि फॉस्फरस आणि पोटाशची पूर्णा मात्रा दिली जाते.
  • नत्रची उरलेली मात्र माती पसरताना दिली जाते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share