Soil preparation for snake gourd farming

 

पडवळ/ बालम काकडीसाठी शेताची मशागत:-

  • पडवळ/ बालम काकडीचे पीक सर्व प्रकारच्या मातीत घेता येते.
  • पेरणीपुर्वी जमिनीची 3-4 वेळा नांगरणी करावी.
  • पडवळ/ बालम काकडीच्या शेतीसाठी पाण्याच्या निचर्‍याची उत्तम व्यवस्था लागते.
  • भरघोस उत्पादन आणि गुणवत्तेसाठी मातीत कम्पोस्ट खत मिसळावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Management of Yellow Rust disease in Wheat

गव्हाच्या पिकावरील पिवळा तांबेरा रोगाचे नियंत्रण:- 

  • हा रोग बुरशीजन्य आहे.
  • नारिंगी-पिवळ्या रंगाचे जिवाणू या बुरशीचा रोगग्रस्त शेतातून निरोगी शेतात प्रसार करतात.
  • ही बुरशी पानांच्या शिरांच्या लांबीला समांतर पट्ट्यांमध्ये विकसित होते आणि लहान डाग पाडते.
  • हळूहळू डाग पानांच्या दोन्ही बाजूंवर पसरत जातात.
  • हे भुकटीने भरलेले डाग 10-14 दिवसात फुटतात.
  • या रोगाचा फैलाव अधिक थंड आणि दमट हवामानात सुमारे 10-15° से.ग्रे. तापमान असताना होतो.

नियंत्रण-

  • तांबेरा रोगाच्या नियंत्रणासाठी पीक चक्र अवलंबावे.
  • रोग प्रतिकारक वाणांची पेरणी करावी.
  • बीजसंस्करण किंवा उर्वरक उपचार करून पेरणीपासून चार आठवडेपर्यंत तांबेर्‍याला नियंत्रित करता येते आणि त्यानंतर औषधे वापरून त्याला दाबणे शक्य असते.
  • एकच सक्रिय घटक असलेली बुरशीनाशके पुन्हापुन्हा वापरू नयेत.
  • कासुगामीसिन 5% + कॉपर ऑक्सीक्लोरिड 45% डब्लू.पी. 320 ग्रॅम/एकर किंवा प्रोपिकोनाज़ोल 25% ई.सी.240 मिली /एकरची फवारणी करावी.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Sowing time suitable for snake gourd

पडवळ/ बालम काकडीच्या पेरणीसाठी योग्य वेळ:-  

  • पडवळ/ बालम काकडीच्या पेरणीसाठी जानेवारी/ फेब्रुवारी महीने ही योग्य वेळ असते.
  • पडवळ/ बालम काकडीसाठी उष्ण-दमट हवामान उत्तम असते.
  • पडवळ/ बालम काकडीच्या वाढीसाठी 25-38°सें.ग्रे तापमान उत्तम असते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Control of fall armyworm in Maize

मक्याच्या पिकावर झुंडीने हल्ला करणार्‍या लष्करी अळीचे नियंत्रण:-

हानी:-

  • की कीड सामान्यता पाने खाते. तीव्र हल्ला झाल्यास ती मक्याची कणसे देखील कुरतडते.
  • किडीने ग्रासलेल्या रोपाची वरील बाजूची पाने फाटतात आणि पाने आणि देठांच्या जोडाजवळ दमट भुस्सा साचलेला आढळून येतो.
  • ही कीड कणीस खाण्यास वरील बाजूने सुरुवात करते.

नियंत्रण :-

  • लाईट ट्रॅप लावावेत.
  • मादीचा गंध असलेले फेरोमान ट्रॅप एकरात 5 या प्रमाणात लावावेत.
  • अळी आढळताच पुढीलपैकी एका कीटकनाशकाची फवारणी करावी:-
  • एमामेक्टीन बेंजोएट 5% SG @ 100 ग्रॅम प्रति एकर
  • फिप्रोनिल 5% SC @ 400 मिली प्रति एकर
  • क्लोरोपाइरीफॉस 50% EC @ 400 मिली प्रति एकर

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Sowing time Suitable of Tomato Cultivation-

टोमॅटोच्या पेरणीसाठी योग्य वेळ:-

  • टोमॅटोचे पीक खरीप, रब्बी आणि जायद या तिन्ही हंगामात घेता येते.
  • रब्बीच्या हंगामात धुके पडत असल्याने त्याच्या उत्पादनात घट येते.
  • खरीपाच्या हंगामात पीक घेतल्यास त्याचे पुनर्रोपण जुलै महिन्यात होते.
  • रब्बीच्या हंगामातील पिकाचे पुनर्रोपण ऑक्टोबर महिन्यात होते.
  • जायद हंगामातील पिकाचे पुनर्रोपण फेब्रुवारी महिन्यात होते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Irrigation management in watermelon

कलिंगडाच्या पिकासाठी सिंचन व्यवस्थापन:-

  • कलिंगडाच्या पिकासाठी जास्त पाणी लागते पण पाणी तुंबणे त्यासाठी हानिकारक असते.
  • कलिंगडाची शेती उष्ण हवामानात होते. त्यामुळे कलिंगडाच्या पिकासाठी सिंचनातील अंतर महत्वाचे असते.
  • कलिंगडाच्या पिकासाठी 3-5 दिवसांच्या अंतराने सिंचन करावे.
  • फुलोरा येण्यापूर्वी, फुलोरा येण्याच्या वेळी आणि फळांच्या विकासाच्या वेळी पाण्याच्या अभावाने उत्पादन घटते.
  • फळे पक्व होण्याच्या वेळी सिंचन थांबवावे. असे करण्याने फळाची गुणवत्ता वाढते आणि फळे फुटण्याची समस्या उभी राहत नाही.
  • सतत पाणी देण्याने पिकातील रोगांचा (पांढरी भुकटी रोग, फल गलन रोग इत्यादि) उपद्रव वाढतो. त्याच्या नियंत्रणासाठी वेळोवेळी बुरशीनाशक फवारावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

How to flower promotion in chickpea

हरबर्‍यातील फुलोर्‍याच्या वृद्धिसाठी सुचना:-

  • खालील उत्पादनांच्या द्वारे हरबर्‍याच्या पिकातील फुलोर्‍याचे प्रमाण वाढवता येऊ शकते:-
  • होमोब्रासिनोलॉइड 0.04% डब्लू/डब्लू 100-120 एम.एल./एकर फवारावे.
  • समुद्री शेवाळाचे सत्व 180-200 ग्रॅम/एकर वापरावे.
  • सूक्ष्म पोषक तत्वांची, विशेषता बोरॉनची, मात्रा 200 ग्रॅम/एकर या प्रमाणात फवारावी.
  • 2 ग्रॅम/एकर या प्रमाणात जिब्रेलिक अॅसिड देखील फवारले जाऊ शकते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Seed rate of watermelon

कलिंगडाच्या पेरणीसाठी बियाण्याचे प्रमाण:-

कलिंगडाच्या पेरणीसाठी बियाण्याचे प्रमाण लागवडीची पद्धत आणि वाणावर पुढीलप्रमाणे अवलंबून असते:-

  • उन्नत आणि संशोधित वाणे:- 1.5 -2 किलो/ एकर
  • संकरीत (हायब्रिड) वाणे:- 300-500 ग्रॅम/ एकर

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Seed treatment of Muskmelon

खरबूजासाठी बीजसंस्करण:-

  • खरबूज पेरणीपासून काढण्याच्या वेळेपर्यंत वेगवेगळ्या रोगांनी ग्रस्त होते. त्यामुळे त्याचे उत्पादन घटते.
  • खरबूजावरील या रोगांचे नियंत्रण करण्यासाठी आणि त्यांचा उपद्रव कमी करण्यासाठी बीजसंस्करण महत्वाचे असते.
  • बीजसंस्करण कार्बेन्डाजिम 50% WP 2 ग्रॅम/किलोग्रॅम बियाणे वापरुन करावे.
  • किंवा कार्बोक्सिन 37.5% + थायरम 37. 5 % ग्रॅम /किलोग्रॅम बियाणे बीजसंस्करणासाठी वापरावे.
  • विषाणूजन्य रोगांच्या प्रतिबंधासाठी इमिडाक्लोप्रिड 600 एफ.एस (48%) 1 एम.एल./किलोग्रॅम वापरुन बीजसंस्करण करावे.
  • रासायनिक बीजसंस्करणानंतर ट्रायकोडर्मा विरिडी @ 4 ग्रॅम/कि.ग्रॅ. बियाणे वापरुन उपचार करणे शक्य असते.
  • एका रसायनानंतर दुसर्‍या रसायनाने उपचार करण्यात 20-30 मिनिटांचे अंतर ठेवावे.
  • बीजसंस्करण केल्यावर बियाणे सुमारे 30 मिनिटे सावलीत सुकवावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Sowing Time suitable for Watermelon

कलिंगडाच्या पेरणीसाठी सुयोग्य वेळ:-

  • कलिंगडाच्या पेरणीसाठी नोव्हेंबर ते मार्च हा कालावधी उत्तम असतो.
  • नोव्हेंबर-डिसेंबर मधील पेरणीनंतर वेलांना धुक्यापासून संरक्षित करावे. जास्तीतजास्त पेरणी जानेवारी ते मार्च या कालावधीत केली जाते.
  • डोंगराळ भागात मार्च-एप्रिल या काळात पेरणी करतात.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share