Importance of Zinc solubilizing bacteria

झिंक विरघळवणार्‍या जिवाणूंचे महत्त्व

झिंक विरघळवणारे जिवाणू हे नैसर्गिकरीत्या उपलब्ध लाभदायक जिवाणू आहेत. ते कार्बनिक अॅसिड वापरुन मातीतील अकार्बनिक झिंकला विरघळणारे बनवून रोपांसाठी उपलब्ध करून देतात. त्यामुळे रोपांच्या वाढीला मदत होते.

  • या जिवाणूंचा वापर झिंकच्या अभावाने होणार्‍या तांदळातील खैरा रोगाच्या उपचारासाठी तसेच टोमॅटो, कांदा, गहू, भेंडी इत्यादिसाठी केला जातो.
  • त्यांचामुळे पिकाचे उत्पादन आणि गुणवता वाढते.
  • ते हार्मोन्सना सक्रिय करते.
  • ते रोपे आणि मुळांच्या वाढीत वृद्धी करते.
  • ते प्रकाश संश्लेषण वाढवते.
  • मातीत जिवाणू असल्याने मातीची उर्वरकता वाढते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Control of Leaf Hopper and Jassid in Snake gourd

पडवळ/ काकडीवरील पर्ण कीटकांचे (लीफहॉपर) आणि तुडतूड्यांचे नियंत्रण

  • शिशु आणि वाढ झालेले किडे पाने आणि वेलींचा रस शोषतात. त्यामुळे पानांवर आणि वेलींवर राखाडी रंगाचे जळल्यासारखे डाग पडतात.
  • सुरुवातीच्या अवस्थेत पानांच्या कडाना पिवळा रंग येतो. त्यानंतर पाने वाळतात. फळांचा आकार लहान होते आणि गुणवत्ता घटते.
  • पेरणीच्या वेळी कार्बोफुरोन 3 जी @ 10 किलो प्रति एकर मातीत मिसळावे.
  • तुडतूड्यांचे नियंत्रण करण्यासाठी तुडतुडे दिसताच दर 15 दिवसांनी प्रोफेनोफॉस 50 % ईसी @ 400 मिली प्रति एकर किंवा अॅसिटामाप्रीड 20% @ 80 ग्राम प्रति एकर फवारावे.
  • तुडतूड्यांपासून बचाव करण्यासाठी निंबोणी-लसूणचे सत्व तुडतुडे येण्यापूर्वी दर 15 दिवसांनी फवारावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Control of downy mildew in Snake gourd

पडवळ/ काकडीवरील केवळा रोगाचे (डाऊनी मिल्ड्यू) नियंत्रण

  • अधिक दमट हवामानात पानांच्या खालील बाजूच्या पृष्ठभागावर या रोगाची लागण होते.
  • पाने लवकरच पुर्णपणे वाळतात.
  • पाण्याच्या उत्तम निचरा होण्याची व्यवस्था हवा खेळती राहण्याची व्यवस्था आणि उन्हाच्या मुबलकतेसाठी रुंद नळया बनवल्याने या रोगाचा प्रसार कमी होतो.
  • मॅन्कोझेब 75% WP @ 350-400 ग्रॅम/ एकर किंवा क्लोरोथालोनिल 75% WP @ 200-250 ग्रॅम/ एकर फवारावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Nutrient management in tomato

टोमॅटोसाठी पोषक तत्वांचे व्यवस्थापन

  • जमिनीची मशागत करताना एकरी 6-8 टन शेणखत/ कम्पोस्ट मातीत चांगल्या प्रकारे मिसळावे.
  • एकरी डीएपी @ 70 किलो, यूरिया @ 105 किलो, एमओपी @ 50 किलो वापरावे.
  • नत्रची (नायट्रोजन) चतुर्थ्यांश आणि पालाशची (पोटाश) प्रत्येकी अर्धी मात्रा पेरणीनंतर 20-30 दिवसांनी वापरता येते.
  • एकरी बोरेक्स 4 किलो आणि झिंक सल्फेट 20 किलो मूलभूत मात्रा म्हणून वापरावे आणि यूरिया पेरणीनंतर 30 व्या दिवशी एकरी 30 किग्रॅ वापरावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Control of Powdery Mildew of Snake gourd

काकडीवरील भुरी रोगाचे नियंत्रण

  • पानांवर पांढर्‍या किंवा धूसर रंगाचे डाग पडतात. ते नंतर वाढून पांढरी भुकटी तैय्यार होते.
  • दर 15 दिवसांनी हेक्झाकोनाजोल 5% SC 300 मिली. प्रति एकर किंवा थायोफिनेट मिथाईल 400 ग्रॅम प्रति एकर चे मिश्रण फवारावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Irrigation in Bottle gourd

दुधी भोपळ्याच्या पिकासाठी सिंचन व्यवस्थापन

  • बियाणे पेरण्यापूर्वी शेतात पहिले सिंचन करावे आणि त्यानंतर एका आठवड्याने पुन्हा सिंचन करावे.
  • फेब्रुवारी – मार्च महिन्यात पेरलेल्या पिकस पेरणीनंतर 2-3 दिवसांनी पहिले सिंचन करावे.
  • त्यानंतर 7-8 दिवसांच्या अंतराने सिंचन करावे.

ठिबक सिंचन

  • ठिबक सिंचन यंत्रणा बसवून मुख्य आणि उपमुख्य नळ्यांना एकमेकांपासुन 1.5 मीटर अंतरावर ठेवावे. क्रमशः 4 लीटर प्रति तास आणि 3.5 लीटर प्रति तास क्षमतेचे ड्रिपर्स एकमेकांपासुन 60 सेमी आणि 50 सेमी अंतरावर बसवावेत.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Fertilizer requirements in Bottle gourd

दुधी भोपळ्यासाठी खताची मात्रा

  • शेताची मशागत करताना एकरी 10 टन शेणखत मातीत मिसळावे.
  • शेवटच्या नांगरणीच्या वेळी एकरी 30 कि. ग्रॅम यूरिया, 80 कि. ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट आणि 30 कि. ग्रॅम पालाश (पोटाश) मातीत मिसळावे.
  • युरियाची उरलेली 30  कि. ग्रॅम मात्रा दोन ते तीन समान भागात विभागून द्यावी.
  • फॉस्फरस, पालाश (पोटाश) ची संपूर्ण मात्रा आणि नत्राची (नायट्रोजन) एक तृतीयांश मात्रा प्रत्येक आळ्यात पेरलेल्या बियंपासून 8 ते 10 से.मी. अंतरावर पेरावी.
  • शेतात नत्राचा (नायट्रोजन) अभाव असल्यास पाने आणि वेली पिवळ्या रंगाची होतात आणि वेलांची वाढ खुंटते.
  • जमिनीत पोटॅशियमचा अभाव असल्यास रोपांची वाढ आणि पानांचा आकार कमी होऊन फुले गळतात आणि फलधारणा बंद होते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Advantage of PSB in watermelon

फॉस्फरस विरघळवणार्‍या जिवाणूंचे (पीएसबी) कलिंगडाच्या पिकासाठी महत्त्व

  • हे जिवाणू फॉस्फरससह मॅंगनीज, मॅग्नेशियम, आयर्न, मॉलिब्डेनम, झिंक आणि कॉपर यासारख्या सूक्ष्म पोषक तत्वांना देखील रोपांना पुरवण्यास सहाय्य करतात.
  • ते मुळांचा वेगाने करण्यास सहाय्य करतात. त्यामुळे रोपाळा पाणी आणि पोशाक तत्वे सहजपणे मिळतात.
  • पीएसबी काही मॅलिक, सक्सिनिक, टार्टरिक अॅसिड आणि अॅसिटीक अॅसिड यासारखी काही खास जैविक आम्ले बनवतात. ही आम्ले फॉस्फरस\ची उपलब्धता वाढवतात.
  • ते रोग आणि शुष्कतेबाबतची प्रतिरोधकता वाढवतात.
  • त्यांचा वापर करण्याने फॉस्फेटिक उर्वरकांची आवश्यकतेत 25 -30% घट होते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Irrigation Schedule in Muskmelon

खरबूजासाठी सिंचन व्यवस्थापन

  • खरबूज हे अधिक पाणी लागणारे पीक आहे पण पाणी तुंबणे त्याच्यासाठी हानिकारक असते.
  • बियाणे शेतात पेरण्यापूर्वी एकदा सिंचन करावे आणि त्यानंतर का आठवड्याटुन्न एकदा सिंचन करावे.
  • फुलोरा येण्यापूर्वी, फुलोरा येण्याच्या वेळी आणि फळांच्या वाढीच्या अवस्थेत पाण्याचा अभाव असल्यास उत्पादनात मोठी घट येते.
  • फळे पिकण्याच्या वेळी पाणी तोडल्याने फळांची गुणवत्ता वाढते आणि फळे फुटत नाहीत.
  • सतत पाणी दिल्याने भुरी, फल गलन इत्यादि रोगांचा उपद्रव वाढतो. त्यांच्या नियंत्रणासाठी वेळोवेळी बुरशीनाशके फवारावीत.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Use of PSB in Snake Gourd

काकडीच्या पिकासाठी  फॉस्फरस विरघळवणार्‍या जिवाणूंचे (पीएसबी) महत्व