Irrigation scheduling in Brinjal

वांग्याच्या पिकासाठी सिंचनाचे नियोजन

  • रोपांच्या चांगल्या वाढीसाठी तसेच फुले आणि फळांच्या वाढीसाठी आणि विकासासाठी वेळेवर सिंचन करणे आवश्यक असते.
  • हिवाळ्यात 8 ते 10 दिवसांच्या अंतराने हलके सिंचन करावे तर उन्हाळ्यात 5 ते 6 दिवसांच्या अंतराने सिंचन करावे.
  • थंडीत हलके सिंचन करून थंडीने होणारी हानी नियंत्रित करता येते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Storage technique in wheat

गव्हाच्या बियाण्याच्या साठवणीचे तंत्र

  • 10 % आर्द्र बियाणे साठवणीसाठी योग्य असते. त्यामुळे बियाणे उन्हात सुकवावे.
  • धान्य साफ केल्यावर ते पोत्यात भरून साठवावे.
  • भेसळीपासून बचाव करण्यासाठी बियाणे नेहमी नवीन पोत्यात ठेवाव्यात.
  • बियाणे म्हणून वापरले जाणारे धान्य उच्च गुणवत्तेचे असणे आवश्यक असते.
  • उन्हाळ्यात गोदामातील तापमान थंड ठेवावे.
  • वेळोवेळी धान्याची तपासणी करावी.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Post-harvest management in wheat

गव्हाच्या कापणीनंतरचे नियोजन

  • गव्हाच्या ओंब्या पिवळ्या पडून सुकल्यानंतर पिकाची कापणी करावी.
  • गव्हाची कापणी करताना 13-14% आर्द्रता असावी.
  • गव्हाच्या पिकाची राइपर (मशीन) द्वारे कापणी केल्यावर थ्रेशिंग फ्लोरवर 3-4 दिवस सुकवावे.
  • बियाणे कायम नव्या पिशव्यात ठेवावे. सहसा गोदामात साठवलेल्या धान्यावर किडीचा हल्ला होतो. त्यापासून बचाव करण्यासाठी वेळोवेळी कीटकनाशक रसायनांची धुरी द्यावी.
  • गोदामात गव्हाच्या बियाण्यात 10-11% आर्द्रता असावी.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Use of wheat and gram sawdust/straw

गहू आणि हरबर्‍याच्या तूस/ भुश्याचा वापर

  • भुस्सा म्हणजे उत्पादनातून धान्याला वेगळे काढल्यानंतर उरणारे अवशेष असतात.
  • त्याचा खत बनवण्यासाठी, मल्चिंगसाठी, नर्सरी बनवताना अशा अनेक प्रकारे उपयोग केला जाऊ शकतो. तसेच तो मातीची जैविक क्षमता वाढवण्यासाठी महत्वपूर्ण असतो.
  • गव्हाचा भुस्सा/ तूस मशरूम उत्पादनासाठी उपयुक्त असतो.
  • गहू आणि हरबर्‍याच्या भुश्याचा वापर शेणखत बनवतानाही केला जातो. तसेच गोवर्‍या बनवताना त्याला शेणात मिसळले जाते.
  • कुक्कुटपालनासारख्या कृषि उद्योगात त्याला पृष्ठभाग कोरडा ठेवण्यासाठी आणि तापमान नियंत्रित करण्यासाथू पसरले जाते.
  • गव्हाच्या भुस्सा/ तुसाचा वापर पशु आहारात देखील केला जातो.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Harvesting in wheat

गव्हाची कापणी

  • तुसे पिवळी, शुष्क आणि ठिसुळ होतात आणि दाणे कडक होतात तेव्हा पिकाची कापणी केली जाते.
  • गेल्या काही वर्षात देशातल्या अनेक राज्यात पिकाच्या कापणी आणि मळणीसाठी थ्रेशिंग मशीन वापरले जाऊ लागले आहे.
  • धान्यात सुमारे 15 टक्के आर्द्रता असताना पिकाची कापणी करावी.
  • गव्हाच्या ओंब्या पिवळ्या झाल्यावरच पिकाची कापणी करतात.
  • गव्हाच्या पेरणीपासून 110-130 दिवसांनी गव्हाची कापणी करतात.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Post-harvest management in gram

हरबर्‍याच्या पिकाच्या कापणीनंतरचे नियोजन

  • हरबर्‍याच्या पिकाच्या कापनिंनंतर पाच ते सहा दिवस उत्पादन चांगल्याप्रकारे वाळवावे.
  • सुकवल्यावर कापलेल्या धान्याची थ्रेशिंग मशीन वापरुन मळणी करावी.
  • साठवण करण्यापूर्वी पिकाचे दाणे चांगल्या प्रकारे वाळवावेत.
  • साठवण करताना भुंगेर्‍यापासून (पल्स बीटल) बचाव करण्यासाठी 10% मॅलाथियान द्रावणात पोते बुडवावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Storage technique for gram

हरबर्‍याच्या साठवणुकीचे तंत्र

  • सुमारे 13 ते 15 टक्के आर्द्रता असताना पिकाची कापणी केल्याने हरबर्‍याच्या दाण्यांचे प्रमाण घटते.
  • साठवणुक करताना योग्य काळजी घेतल्याने हरबर्‍याच्या गुणवत्तेशी संबंधित घटकांवर जसे रंग, बाह्य रूप इ. परिणाम होतो.
  • उत्पादनाच्या साठवणुकीपूर्वी त्याची सफाई करावी.
  • साठवण केलेल्या धान्याचे वेळोवेळी निरिक्षण करावे.
  • साठवणुकीच्या वेळी धान्यातील आर्द्रतेकडे खास लक्ष द्यावे. आर्द्रता कमी असल्यास दाणे तुटू शकतात.
  • वातावरण अनुकूल नसल्यास धान्य अधिक तुटते.
  • निरोगी दाण्यांची बाजारातील किंमत जास्त असते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Lesser grain borer control in wheat

साठवणुक केलेला गहू पोखरणार्‍या किड्यांचे नियंत्रण

  • धान्य साठवण्यापूर्वी त्याला कडक उन्हात वाळवावे.
  • हवा खेळती असलेल्या सीमेंट किंवा कॉन्क्रीटने बांधलेल्या पक्क्या गोदामाचा वापर करावा.
  • गोदामातील धान्याच्या थप्प्यांमध्ये किमान 2 फुट अंतर ठेवावे.
  • गोदामात धान्याच्या पोत्यांची थप्पी लावताना पोती छताला किंवा भिंतींना चिकटणार नाहीत याची खबरदारी घ्यावी.
  • गोदामात हवा खेळती असल्यास धान्यातील आर्द्रता वाढत नाही. त्यामुळे वेगवेगळ्या रोगांपासून आणि किड्यांपासून धान्याचा बचाव होतो.
  • धान्याच्या साठवणुकीसाठी दमट आणि ओल्या पोत्यांचा वापर करू नये.
  • कोरड्या मोसमात महिन्यातून किमान एकदा आणि पावसाळ्यात आठवड्यातून किमान एकदा धान्याची पाहणी करावी. धान्यात प्रमाणाबाहेर आर्द्रता असल्यास ते गोदामातून बाहेर काढून वाळवावे.
  • मेलाथियाँन @ 100 मिलीग्रॅम प्रति वर्ग मीटर फवारावे.
  • डाईक्लोरवास @ 0.5 ग्रॅम प्रति वर्ग मीटर वापरल्याने देखील धान्याचा संक्रमणापासून बचाव होतो.
  • डेल्टामेथ्रिन की 10 ग्रॅम प्रति लीटर द्रावण गोदामात फवारावे.
  • कीटकनाशके विषारी असल्याने त्यांच्या लेबलवरील सर्व खबरदारीच्या सूचनांचे पालन करावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Gram harvesting

हरबर्‍याची कापणी

  • अधिकांश शेंगा पिवळ्या झाल्यावर हरबर्‍याची कापणी करावी.
  • कापणीच्या वेळी हरबर्‍यात सुमारे 15 टक्के आर्द्रता असावी.
  • झाड वाळते आणि त्याची पाने लालसर राखाडी रंगाची होऊन गळू लागतात तेव्हा पीक कापणीस तयार झालेले असते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Thrips control in tomato

टोमॅटोवरील तेलकिड्यांचे (थ्रिप्स) नियंत्रण

  • तेलकिडे (थ्रिप्स) रोपांमधील रस शोषतात. त्यामुळे रोपे पिवळी पडतात आणि कमजोर होतात आणि उत्पादन घटते.
  • या किडीच्या नियंत्रणासाठी प्रोफेनॉफॉस 3 मिली. प्रति ली. पाणी किंवा फिप्रोनिल 3 मिली. प्रति ली. पाणी किंवा थायमेथोक्झोम 0.5 ग्रॅम प्रति ली. पाणी दर 10 दिवसांनी फवारावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share