Control of Fruit Rot in Brinjal

वांग्यातील फळ कूज रोगाचे नियंत्रण

नियंत्रण:-

  • रोपांच्या रोगग्रस्त पाने आणि इतर भागांना तोडून नष्ट करा.
  • पिकावर मॅन्कोझेब @ 400 ग्रॅम/ एकर, किंवा जिनेब @ 400 ग्रॅम किंवा केप्टॉन + हेक्झाकोनाझोल @ 250 ग्रॅम/ एकर या प्रमाणात 10 दिवसांच्या अंतराने फवारा.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत  पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Fruit Rot in Brinjal

वांग्यातील फळ कूज रोगाचे निदान

लक्षणे:-

  • जास्त दमटपणा या रोगाच्या विकासास सहाय्यक ठरतो.
  • फळांवर जळाल्याचे कोरडे डाग पडतात. ते हळूहळू इतर फळांवर पसरतात.
  • रोगग्रस्त फळांच्या वरील भागाचा रंग तपकिरी होते आणि त्याच्यावर पांढरी बुरशी येते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत  पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Control of Eriophyid mite in Garlic and Onion

लसूण आणि कांद्याच्या पिकातील कोळी (एरिओफाइड) किडीचे नियंत्रण

  • शिशु आणि वाढ झालेले किडे कोवळी पाने आणि कळ्यांच्या मधून रस शोषतात. पाने पूर्ण विकसित होत नाहीत. संपूर्ण रोप लहान, वाकडे होते आणि त्याच्यावर पिवळे डाग पडतात.
  • पानांच्या कडांवर जास्त डाग दिसतात.
  • किडीच्या प्रभावी नियंत्रणासाठी विरघळणारे सल्फर 80% चे 3 ग्रॅम प्रति लीटर या प्रमाणात मिश्रण बनवून फवारा.
  • हल्ला तीव्र असल्यास प्रॉपरझाईट 57% 400 मिली. प्रति एकर या प्रमाणात 7 दिवसांच्या अंतराने दोनदा फवारा.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत  पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Powdery Mildew of Pea

मटारवरील भुरीचे (डाऊनी मिल्ड्यू) नियंत्रण

लक्षणे:-

  • आधी जुन्या पानांवर भुरी पडते. त्यानंतर रोपांच्या अन्य भागांवर ती पसरते.
  • पानांच्या दोन्ही पृष्ठभागांवर भुरी जमते.
  • त्यानंतर कोवळ्या फांद्या, शेंगा इत्यादींवर भुरीचे डाग पडतात.
  • रोपाच्या पृष्ठभागावर पांढरी भुरी दिसते. फलधारणा होत नाही. झालीच तर शेंगा खुरटतात.
  • अंतिम अवस्थेत भुरी शेंगांना पूर्णपणे झाकते. त्यामुळे त्या बाजारात विक्री करण्यास योग्य रहात नाहीत.

नियंत्रण:-

  • उशिरा पेरणी करू नये.
  • अर्का अजीत, पीएसएम-5, जवाहर मटर-4, जेपी-83, जेआरएस-14 यासारखी रोगप्रतिबंधक वाणे वापरावीत.
  • विरघळणारे सल्फर 50% डब्ल्यूपी 3 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात किंवा डायनोकेप 48% ईसी 2 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून त्या मिश्रणाची दिवसांच्या अंतराने दोन ते तीन वेळा फवारणी करावी.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत  पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Seed Treatment of Chickpea (Gram)

हरबऱ्याचे बीजसंस्करण

  • मूळ कूज, खोड कूज, बूड कूज अशा बुरशीजन्य रोगांपासून बचाव करण्यासाठी हरबऱ्याची पेरणी करण्यापूर्वी कार्बोक्सिन5% + थायरम 37.5% किंवा कार्बेन्डाझिम 12% + मॅन्कोझेब 63% 2 ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात वापरून बीजसंस्करण करावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत  पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Suitable climate and soil for Papaya Farming

पपईच्या लागवडीसाठी उपयुक्त हवामान आणि माती

पपईच्या लागवडीसाठी उपयुक्त हवामान –

  • पपईचे पीक उष्णकटिबंधीय असल्याने उच्च तापमान आणि अधिक आर्द्रतेचे हवामान त्याच्यासाठी उत्तम असते.
  • ते थंडी आणि वादळासाठी खूप संवेदनशील असते.
  • दिवस लांब असताना लागलेल्या पपईचा स्वाद आणि गुणवत्ता जास्त असते.
  • फुलोर्‍याच्या दिवसात अधिक पाऊस पडणे हानिकारक आणि खूप नुकसानकारक असते.

माती –  

  • पपई वेगवेगळ्या प्रकारच्या मातीत लावता येते.
  • परंतु पपईच्या पिकासाठी खूप उथळ आणि खूप खोल काळी माती उपयुक्त नसते.
  • पाण्याचा निचरा होणारी आणि अल्कली नसलेली मृदा पपईसाठी सर्वोत्तम असते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Importance of Microbes in Soil (ZnSB )

मातीतील सूक्ष्मजीवांचे महत्व:- (जस्त विरघळवणारे बॅक्टरीया झेडएनएसबी)

  • भारतातील सुमारे 50% शेतजमिनीत जस्ताचा (झिंक) अभाव आढळून येतो.
  • जस्त (झिंक) हे रोपांच्या विकासासाठी अत्यावश्यक सुक्ष्म पोषक तत्व आहे. परंतु ते मातीत अनुपलब्ध रूपात असते. त्यामुळे रोपे त्याचा सहज वापर करू शकत नाहीत.
  • हे जीवाणु (बॅक्टरीया) रोपांना जस्त (झिंक) उपलब्ध करून देतात. त्यामुळे पिकावरील रोगांचे नियंत्रण होते आणि पिकाच्या उत्पादन आणि गुणवत्तेत वाढ होण्यास मदत होते. त्यांच्यामुळे मातीचे आरोग्य सुधारते आणि हार्मोन्सची सक्रियता वाढते आणि प्रकाशसंश्लेषणाची प्रक्रिया देखील वाढते.
  • जस्त (झिंक) विरघळवणारे जीवाणु (बॅक्टरीया) मातीत कार्बनिक आम्ल उत्पन्न करतात. त्यामुळे न विरघळणारे जस्त (झिंक सल्फाइड, झिंक ऑक्साइड आणि झिंक कार्बोनेट), झेडएन+ (रोपांसाठी उपलब्ध जस्त) या रूपात बदलते. त्याशिवाय ते मातीचे पीएच संतुलन राखतात.
  • जस्त विरघळवणारे जीवाणु (बॅक्टरीया) उत्तम प्रतीच्या शेणखतात 2 किलो/ एकर या प्रमाणात उत्तम प्रतीच्या 50 किलो शेणखतात मिसळून शेतात भुरभुरावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत  पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Stem and bulb nematode in Onion and Garlic

कांदा आणि लसूण पिकाच्या खोड आणि कंदातील सूत्रकृमी

ही कीड रंध्रांमधील आणि रोपाला झालेल्या व्रणांमधून आत प्रवेश करते आणि रोपांमध्ये गाठी किंवा कुवृद्धि निर्माण करते. या गाठी किंवा वाढ बुरशी आणि जीवाणु (बॅक्टरीया) सारख्या माध्यमिक रोगप्रसारकांच्या प्रवेशासाठी दारे उघडते. वाढ खुंटणे, कंद रंगहीन होणे आणि सुजणे ही त्याची लक्षणे आहेत.

नियंत्रण:- ·

  • रोगाची लक्षणे दर्शवणाऱ्या कंदांचा वापर बियाणे म्हणून करू नये.
  • शेतात आणि उपकरणात स्वच्छता राखणे आवश्यक असते कारण ही कीड संक्रमित रोपे आणि त्यांच्या अवशेषांमध्ये जिवंत राहते आणि पुन्हा उत्पन्न होते.
  • किडीच्या नियंत्रणासाठी कार्बोफ्यूरोन 3% दाणेदार @ 10 किग्रॅ/ एकर या प्रमाणात मातीतून द्यावे.
  • किडीच्या जैविक नियंत्रणासाठी लिंबाचे वाटण @ 200 किग्रॅ/ एकर या प्रमाणात मातीतून द्यावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत  पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Weed control in Garlic

लसूणच्या पिकातील तणाचे नियंत्रण:-

  • लसूणच्या पिकातील तणाचे प्रभावी नियंत्रण करण्यासाठी पेंडिमेथालीन @ 100 मिली. / 15 लीटर पानी किंवा ऑक्सीफ़्लोर्फिन @15 मिली. / 15 लीटर पाण्यात मिसळून फवारण्याची शिफारस केली जाते. तसेच, लावणींनंतर 25-30 दिवसांनी आणि रोपणीनंतर 40-45 दिवसांनी हाताने निंदणी करावी.
  • तांदळाचा भुसा किंवा गव्हाची टरफले मल्चिंगसाठी केल्याने उत्पादन वाढते.
  • ऑक्सिफ्लोरफेन 23.5% EC 1 मिलीलीटर / ली.पाण्यात + क्विजलॉफॉप एथाइल 5% ईसी @ 2 मिलीलीटर / लीटर पाण्यात या मात्रांची संयुक्त फवारणी केल्यावर 20-25 दिवसांपासून ते 30-35 दिवसांपर्यंत तणाचे प्रभावी नियंत्रण होते आणि उत्पादन वाढते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Management of Termites in Wheat

गव्हातील उधईचा प्रतिबंध:-

  • पेरणीनंतर आणि काही वेळा परिपक्वतेच्या अवस्थेत उधई पिकाची हानी करते.
  • सहसा उधई पिकाची मुळे, वाढत्या रोपांची बुडखे आणि देठ तसेच रोपांतील मृत ऊतकांना हानी पोहोचवते.
  • ग्रस्त रोपे पुर्णपणे वाळतात आणि जमिनीतून सहज उपटता येतात.
  • ज्या भागात उत्तम शेणखत वापरले जात नाही त्या भागात उधईचा उपद्रव जास्त होतो.

प्रतिबंध

  • पेरणीपूर्वी शेतात खोल नांगरणी करावी.
  • शेतात उत्तम प्रतीचे शेणखतच वापरावे.
  • उधईची वारुळे केरोसिनने भरावीत. त्यामुळे राणीसह इतर किडेही मरतील.
  • पेरणीपूर्वी क्लोरोपायरीफोस (20% ई.सी ) @ 5 मिली/ किलो वापरुन बीजसंस्करण करावे.
  • क्लोरोपायरीफोस (20% ई.सी) @ 1 लीटर/ एकर कोणत्याही उर्वरकात मिसळून जमिनीतून द्यावे आणि सिंचन करावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share