Importance of Microbes in Soil (ZnSB )

मातीतील सूक्ष्मजीवांचे महत्व:- (जस्त विरघळवणारे बॅक्टरीया झेडएनएसबी)

  • भारतातील सुमारे 50% शेतजमिनीत जस्ताचा (झिंक) अभाव आढळून येतो.
  • जस्त (झिंक) हे रोपांच्या विकासासाठी अत्यावश्यक सुक्ष्म पोषक तत्व आहे. परंतु ते मातीत अनुपलब्ध रूपात असते. त्यामुळे रोपे त्याचा सहज वापर करू शकत नाहीत.
  • हे जीवाणु (बॅक्टरीया) रोपांना जस्त (झिंक) उपलब्ध करून देतात. त्यामुळे पिकावरील रोगांचे नियंत्रण होते आणि पिकाच्या उत्पादन आणि गुणवत्तेत वाढ होण्यास मदत होते. त्यांच्यामुळे मातीचे आरोग्य सुधारते आणि हार्मोन्सची सक्रियता वाढते आणि प्रकाशसंश्लेषणाची प्रक्रिया देखील वाढते.
  • जस्त (झिंक) विरघळवणारे जीवाणु (बॅक्टरीया) मातीत कार्बनिक आम्ल उत्पन्न करतात. त्यामुळे न विरघळणारे जस्त (झिंक सल्फाइड, झिंक ऑक्साइड आणि झिंक कार्बोनेट), झेडएन+ (रोपांसाठी उपलब्ध जस्त) या रूपात बदलते. त्याशिवाय ते मातीचे पीएच संतुलन राखतात.
  • जस्त विरघळवणारे जीवाणु (बॅक्टरीया) उत्तम प्रतीच्या शेणखतात 2 किलो/ एकर या प्रमाणात उत्तम प्रतीच्या 50 किलो शेणखतात मिसळून शेतात भुरभुरावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत  पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

See all tips >>