गव्हातील उधईचा प्रतिबंध:-
- पेरणीनंतर आणि काही वेळा परिपक्वतेच्या अवस्थेत उधई पिकाची हानी करते.
- सहसा उधई पिकाची मुळे, वाढत्या रोपांची बुडखे आणि देठ तसेच रोपांतील मृत ऊतकांना हानी पोहोचवते.
- ग्रस्त रोपे पुर्णपणे वाळतात आणि जमिनीतून सहज उपटता येतात.
- ज्या भागात उत्तम शेणखत वापरले जात नाही त्या भागात उधईचा उपद्रव जास्त होतो.
प्रतिबंध–
- पेरणीपूर्वी शेतात खोल नांगरणी करावी.
- शेतात उत्तम प्रतीचे शेणखतच वापरावे.
- उधईची वारुळे केरोसिनने भरावीत. त्यामुळे राणीसह इतर किडेही मरतील.
- पेरणीपूर्वी क्लोरोपायरीफोस (20% ई.सी ) @ 5 मिली/ किलो वापरुन बीजसंस्करण करावे.
- क्लोरोपायरीफोस (20% ई.सी) @ 1 लीटर/ एकर कोणत्याही उर्वरकात मिसळून जमिनीतून द्यावे आणि सिंचन करावे.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share