मटारवरील भुरीचे (डाऊनी मिल्ड्यू) नियंत्रण
लक्षणे:-
- आधी जुन्या पानांवर भुरी पडते. त्यानंतर रोपांच्या अन्य भागांवर ती पसरते.
- पानांच्या दोन्ही पृष्ठभागांवर भुरी जमते.
- त्यानंतर कोवळ्या फांद्या, शेंगा इत्यादींवर भुरीचे डाग पडतात.
- रोपाच्या पृष्ठभागावर पांढरी भुरी दिसते. फलधारणा होत नाही. झालीच तर शेंगा खुरटतात.
- अंतिम अवस्थेत भुरी शेंगांना पूर्णपणे झाकते. त्यामुळे त्या बाजारात विक्री करण्यास योग्य रहात नाहीत.
नियंत्रण:-
- उशिरा पेरणी करू नये.
- अर्का अजीत, पीएसएम-5, जवाहर मटर-4, जेपी-83, जेआरएस-14 यासारखी रोगप्रतिबंधक वाणे वापरावीत.
- विरघळणारे सल्फर 50% डब्ल्यूपी 3 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात किंवा डायनोकेप 48% ईसी 2 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून त्या मिश्रणाची दिवसांच्या अंतराने दोन ते तीन वेळा फवारणी करावी.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share