Spacing for Cauliflower

फुलकोबीच्या रोपातील अंतर

  • रोपातील अंतर वाण, जमिनीचा प्रकार आणि हवामानानुसार ठरते.
  • रोपातील अंतर पुढीलप्रमाणे असावे:
  • लवकर तयार होणारी वाणे:- 45 x  45 से.मी.
  • मध्य अवधीत तयार होणारी वाणे:- 60 x 40 से.मी.
  • उशिरा तयार होणारी वाणे:- 60 x 60 से.मी. किंवा 60 x 45 से.मी.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Field Preparation for Cauliflower

फुलकोबीच्या पिकासाठी शेताची मशागत

  • पलटी नांगराने 1-2 वेळा उभी-आडवी नांगरणी केल्यावर देशी नांगराने 3-4 वेळा नांगरणी करावी.
  • अधिक उत्पादनासाठी चांगली वाणे वापरावीत.
  • नांगरणीच्या वेळी हेक्टरी 20 ते 25 टन शेणखत मातीत मिसळावे.
  • शेतात सूत्रकृमीचा (नेमाटोड) उपद्रव असल्यास 10 किलो प्रति एकर या प्रमाणात कार्बोफ्यूरान कीटकनाशक पावडर शिंपडावी.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Calcium deficiency Symptoms in Tomato plant

टोमॅटोच्या शेतातील कॅल्शियमच्या अभावाची लक्षणे

  • रोपांमधील उतींमध्ये कॅल्शियमच्या अभावाची लक्षणे मुख्याता झपाट्याने रोपांच्या वाढणार्‍या भागांमध्ये आढळतात.
  • कॅल्शियमचा अभाव असलेली पाने पिवळी पडतात आणि सुकू लागतात. ही लक्षणे पानांना आधार देणार्‍य भागात दिसतात.
  • रोपांच्या खोडांवर सुकलेले मृत डाग दिसू लागतात आणि वाढणारा वरील भाग मरतो.
  • सुरूवातीला वरील बाजूच्या पानांचा रंग गडद हिरवा असतं. नंतर त्यांच्या कडा पिवळ्या पडू लागतात आणि शेवटी रोप मरते.
  • रोपांमध्ये फळांवर कॅल्शियमच्या अभावामुळे फळ कुजीची लक्षणे आढळून येतात.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Control of Neck Blast in Paddy

भातातील गळा करपा (नेक ब्लास्ट) रोगाचे नियंत्रण

  • ट्रायसायक्लाज़ोल 75% डब्ल्यूपी 120 ग्रॅम/ एकर किंवा
  • कसुगामाइसिन 5% + कॉपर ऑक्सीक्लोराइड 45% डब्ल्यू पी @ 300 ग्रॅम/ एकर किंवा
  • थियोफोनेट मिथाइल 70% डब्ल्यूपी @ 250 ग्रॅम/ एकर वापरावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Neck Blast of Paddy

भातातील गळा करपा (नेक ब्लास्ट) रोगाची लक्षणे

  • भातातील गळा करपा (नेक ब्लास्ट) हा सर्वाधिक विनाशकारी रोग आहे कारण त्याने पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटते.
  • ग्रस्त रोगाचे संक्रमण झाल्याने ओंब्यांच्या सांध्यावर राखाडी ते काळ्या रंगाचा चट्टा उठतो.
  • संक्रमण  सांध्यावर होत असल्याने सांध्याच्या वरील भाग लटकतो किंवा तुटतो.
  • संक्रमण दाणे भरण्यापूर्वी झाल्यास दाणे भरत नाहीत. संक्रमण उशिरा झाल्यास दाण्यांची गुणवत्ता खालावते.
  • कधी कधी याची लक्षणे पोखरकिडीसारखी असतात. अशा वेळी ओंब्या पांढर्‍या पडतात.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Control of late blight of tomato

टोमॅटोच्या पिकावरील उशीराच्या अवस्थेतील करपा रोगाचे नियंत्रण

  • कापणीनंतर पिकाचे अवशेष नष्ट करावेत.
  • शेतात पाणी तुंबू देऊ नये.
  • रोग नियंत्रणासाठी कोणत्याही एका बुरशीनाशकाची फवारणी करावी.
  • मेटलॅक्सिल 8% + मॅन्कोझेव 64% @ 500 ग्रॅम/ एकर किंवा
  • कसुगामायसिन 5% + कॉपर ऑक्सीक्लोराइड 45% WP @ 300 ग्रॅम/ एकर किंवा
  • पायरोस्टॉकलोबिन 5% + मेटीराम 55% @ 600 ग्रॅम/ एकर किंवा
  • डाइमेथोमॉर्फ 50% डब्लू पी @ 400 ग्रॅम/ एकर वापरावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Late blight of tomato

टोमॅटोच्या पिकावरील उशीराच्या अवस्थेतील करपा रोग

  • उशीराच्या अवस्थेतील करपा रोगाची लक्षणे जुन्या पानांच्या खालील बाजूवरील पाण्याने भरलेल्या फिकट हिरव्या रंगाच्या डागांच्या स्वरुपात दिसतात.
  • रोग वाढत जाईल तसतसे हे डाग काळे पडतात आणि त्यात पांढर्‍या बुरशीची वाढ होते आणि शेवटी संपूर्ण रोप संक्रमित होते.
  • या रोगामुळे पिकांचे भारी नुकसान होऊ शकते. हा रोग शेतभर वेगाने पसरतो. वेळीच उपचार न केल्यास पूर्ण पीक नष्ट होते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Weed Control in Tomato Crop

टोमॅटोच्या पिकातील तणाचे नियंत्रण:-

  • सुरुवातीच्या अवस्थेत रोपांच्या चांगल्या वाढीसाठी 2-3 वेळा निंदणी-खुरपणी करणे आवश्यक असते.
  • तणाच्या नियंत्रणासाठी अंकुरणीपूर्वी तणनाशक पेन्डामेथिलिन 30% SC @ 700 मिली प्रति एकरच्या मात्रेने फवारणी करून पेरणीनंतर 45 दिवसांनी हाताने निंदणी करावी.
  • तण नियंत्रण करण्यासाठी पेरणीनंतर 15 दिवसांनी मॅट्रिब्यूझिन 70% WP @ 300 ग्रॅम प्रति एकरच्या मात्रेची फवारणी करावी.
  • संपूर्ण नियंत्रण करण्यासाठी पॅरा, लाकडाचा भुस्सा आणि काले पॉलीथीन अशा मल्चचा वापर केला जातो. मल्च जमिनीतील ओलीचे संरक्षण देखील करते आणि उत्पादन आणि गुणवत्ता वाढवते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Seed treatment of Potato

बटाट्याचे बीजसंस्करण

बटाटा हे कंदाचे पीक आहे. त्यात बियाणे आणि मातीद्वारे फैलावणारे वेगवेगळे बुरशीजन्य रोग होतात.

बटाट्याचे बीजसंस्करण कसे करावे:- कार्बोक्सीन 37. 5 % + थायरम 37. 5 % @ 200 ग्रॅम/ 6 लीटर पाणी प्रती 1 एकर जमिनीत पेरण्याच्या बियाण्यासाठी किंवा थायोफनेट मिथाइल 45% + पाइरक्लोस्ट्रोबिन 5% एफएस @ 800 मिली/16 लीटर पाणी 40 क्विंटल बियाण्यासाठी वापरावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Control of Verticillium wilt in cotton

कापसातील व्हर्टिसिलिअम मररोगाचे नियंत्रण

  • सहा वर्षांचे पीक चक्र अवलंबावे.
  • उन्हाळ्यात खोल नांगरणी (6-7 इंच) करून शेत समतल करावे.
  • रोगमुक्त बियाणे वापरावे.
  • रोग प्रतिरोधक वाणे वापरावी.
  • पेरणीपुर्वी ट्रायकोडर्मा विरिडी @ 2 किलो प्रति एकर या प्रमाणात 40- 50 किलो शेणखतात घालून जमिनीत मिसळावी.
  • कार्बोक्सीन 37.5 % + थायरम 37.5 % @ 3 ग्रॅम/किलो बियाणे किंवा ट्रायकोडर्मा विरिडी @ 5 ग्रॅम/किलो बियाणे वापरुन बीजसंस्करण करावे.
  • ट्रायकोडर्मा विरिडी @ 1 किलो + सूडोमोनास फ्लोरोसेंसे @ 1 किलो चे मिश्रण 200 लीटर पाण्यात मिसळून ड्रेंचिंग करावे.
  • माइकोरायझा @ 4 किलो प्रति एकर 15 दिवसांच्या पिकात भुरभुरावे.
  • फुलोरा येण्यापूर्वी थायोफिनेट मिथाईल 75% @ 300 ग्रॅम/ एकर फवारावे.
  • बोंडे निर्माण होताना प्रोपिकोनाज़ोल 25% @ 125 मिली/ एकर फवारावे किंवा
  • कासुगामायसिन 5% + कॉपर ऑक्सीक्लोराइड 46% WP @ 300 ग्रॅम प्रति एकर या प्रमाणात फवारावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share