भातातील गळा करपा (नेक ब्लास्ट) रोगाची लक्षणे
- भातातील गळा करपा (नेक ब्लास्ट) हा सर्वाधिक विनाशकारी रोग आहे कारण त्याने पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटते.
- ग्रस्त रोगाचे संक्रमण झाल्याने ओंब्यांच्या सांध्यावर राखाडी ते काळ्या रंगाचा चट्टा उठतो.
- संक्रमण सांध्यावर होत असल्याने सांध्याच्या वरील भाग लटकतो किंवा तुटतो.
- संक्रमण दाणे भरण्यापूर्वी झाल्यास दाणे भरत नाहीत. संक्रमण उशिरा झाल्यास दाण्यांची गुणवत्ता खालावते.
- कधी कधी याची लक्षणे पोखरकिडीसारखी असतात. अशा वेळी ओंब्या पांढर्या पडतात.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share