टोमॅटोच्या शेतातील कॅल्शियमच्या अभावाची लक्षणे
- रोपांमधील उतींमध्ये कॅल्शियमच्या अभावाची लक्षणे मुख्याता झपाट्याने रोपांच्या वाढणार्या भागांमध्ये आढळतात.
- कॅल्शियमचा अभाव असलेली पाने पिवळी पडतात आणि सुकू लागतात. ही लक्षणे पानांना आधार देणार्य भागात दिसतात.
- रोपांच्या खोडांवर सुकलेले मृत डाग दिसू लागतात आणि वाढणारा वरील भाग मरतो.
- सुरूवातीला वरील बाजूच्या पानांचा रंग गडद हिरवा असतं. नंतर त्यांच्या कडा पिवळ्या पडू लागतात आणि शेवटी रोप मरते.
- रोपांमध्ये फळांवर कॅल्शियमच्या अभावामुळे फळ कुजीची लक्षणे आढळून येतात.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share