Soil preparation for cultivation of Bitter gourd

कारल्याच्या पिकासाठी जमिनीची मशागत

  • शेतात 1-2 वेळा नांगरणी आणि फुलीची नांगरणी करून मातीस भुसभुशीत आणि सपाट करावे.
  • शेवटच्या नांगरणीपूर्वी 8 -10 टन प्रति एकर या प्रमाणात शेणखत घालावे.
  • 2- 3 फुट रुंदीचे वाफे बनवावेत. हे आधार देण्याच्या पद्धतीवर अवलंबून असते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Management of Black Rust disease in Wheat

गव्हाच्या पिकातील काळ्या तांबेर्‍याचे नियंत्रण

  • ही बुरशी रोपांच्या पानांवर आणि खोडांवर लांबट,अंडाकृती में लाल-राखाडी डाग पाडते.
  • संक्रमणानंतर 10-20 दिवसांनी डाग दिसू लागतात.
  • काही दिवसांनी डाग फुटतात आणि त्यातून भुकटी बाहेर पडते.
  • हा रोग सिंचन, पाऊस आणि हवेच्या माध्यमातून संक्रमण करतो आणि इतर पिकांना हानी पोहोचवतो.
  • काळा तांबेरा इतर तांबेर्‍याहुन अधिक तापमानात म्हणजे 18 -30° से.ग्रे. तापमानात फैलावतो.

नियंत्रण-

  • तांबेर्‍याच्या नियंत्रणासाठी पीक चक्र अवलंबावे.
  • रोग प्रतिरोधक वाणे पेरावीत.
  • बीजसंस्करण केल्याने तांबेर्‍याचे चार आठवड्यांपर्यंत नियंत्रण होते आणि त्यानंतर उपचार करून त्याला दाबता येते.
  • एकच सक्रिय घटक असलेल्या बुरशींनाशकांचा पुन्हा पुन्हा वापर करू नये,
  • कासुगामीसिन 5% + कॉपर ऑक्सीक्लोरिड 45% डब्लू.पी. 320 ग्रॅम/एकर या प्रमाणात किंवा प्रोपिकोनाज़ोल 25% ई.सी.240 ग्रॅम/एकर या प्रमाणात फवारावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Control strategies of Maize Stem Borer

मक्यातील खोड पोखरणार्‍या किडीचे नियंत्रण

  • ही मक्याच्या पिकावरील प्रमुख आणि सर्वाधिक हानी करणारी कीड आहे.
  • खोड पोखरणार्‍या किडीची अळी मक्याच्या खोडात शिरून भोक पाडते.
  • ही अळी खोडात शिरून उती खाते. त्यामुळे रोपांना पाणी आणि आहार मिळत नाही. रोपे हळूहळू पिवळी पडून सुकतात आणि मरतात.

नियंत्रण: –

  • पिकाच्या पेरणीनंतर 15 -20 दिवसांनी फ़ोरेट 10%जी 4 किलो/एकर या प्रमाणात किंवा फिप्रोनिल 0.3% जी 5 किलो/एकर या प्रमाणात 50 किलो मातीत मिसळून पसरावे सिंचन करावे.
  • दाणेदार कीटकनाशक वापरलेले नसल्यास पुढीलपैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची फवारणी करावी:-
  • पेरणीनंतर 20 दिवसांनी बायफेंथ्रीन 10% EC 200 मिली प्रति एकर या प्रमाणात वापरावे.
  • किंवा पेरणीनंतर 20 दिवसांनी फिप्रोनिल 5% SC 500 मिली प्रति एकर या प्रमाणात वापरावे.
  • करटाप हाईड्रो क्लोराईड 50% SP 400 ग्रॅम/एकर फवारावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Seed Treatment in Bitter gourd

कारल्याचे बीजसंस्करण

  • चांगली गुणवत्ता आणि रोग व किडिपासून बचाव करण्यासाठी पेरणीपुर्वी बीजसंस्करण करणे आवश्यक असते.
  • बीजसंस्करण करण्यासाठी कार्बेन्डाजिम 12% + मॅन्कोझेब 63% बुरशीनाशक 2 ग्रॅम/किलोग्रॅम बियाणे या प्रमाणात वापरावे किंवा कार्बोक्सिन 37.5% + थायरम 37.5%  2 ग्रॅम/किलोग्रॅम या प्रमाणात वापरावे.
  • रस शोषणार्‍या किडीच्या नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रिड 600 एफ. एस. (48%) 1 एम.एल/कि.ग्रॅ. या प्रमाणात  वापरुन बीजसंस्करण करता येते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Seed Treatment in Bottle gourd

दुधी भोपळ्याचे बीजसंस्करण

  • चांगली गुणवत्ता आणि रोग व किडिपासून बचाव करण्यासाठी पेरणीपुर्वी बीजसंस्करण करणे आवश्यक असते.
  • बीजसंस्करण करण्यासाठी कार्बेन्डाजिम 12% + मॅन्कोझेब 63% बुरशीनाशक 2 ग्रॅम/किलोग्रॅम बियाणे या प्रमाणात वापरावे किंवा कार्बोक्सिन 37.5% + थायरम 37.5%  2 ग्रॅम/किलोग्रॅम या प्रमाणात वापरावे.
  • रस शोषणार्‍या किडीच्या नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रिड 600 एफ. एस. (48%) 1 एम.एल/कि.ग्रॅ. या प्रमाणात  वापरुन बीजसंस्करण करता येते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Soil preparation for Bottle gourd cultivation

दुधी भोपळ्याच्या पिकासाठी शेताची मशागत

  • सुरुवातीच्या तयारीसाठी शेताची तवा नांगराने नांगरणी आणि फुली नांगरणी करावी.
  • नांगरणीच्या वेळी मातीत हेक्टरी 20 ते 25 टन शेणखत मिसळावे.
  • शेवटची नांगरणी करताना शेतात वखर चालवून माती भुसभुशीत आणि सपाट करून घ्यावी.
  • शेतात नेमाटोड किंवा पांढर्‍या मुंग्यांची लागण झालेली असल्यास 10 किलो प्रति एकर या प्रमाणात कार्बोफ्यूरान कीटकनाशक पावडर फवारावी.
  • शेत सपाट केल्यावर 40 ते 50 से.मी. रुंदीच्या नळ्या एकमेकांपासुन 2 ते 2.5 से.मी. अंतरावर पाडाव्या.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Potato Harvester

बटाटा काढण्याचे यंत्र (पोटॅटो हार्वेस्टर)

  • पोटॅटो हार्वेस्टर हे यंत्र बटाट्याच्या खोदाईसाठी वापरतात.

|

  • हे यंत्र बटाट्याना जमिनीतून काढून यंत्राच्या वरील भागात पोहोचवते.
  • बटाटे यंत्राच्या खोदाई करणार्‍या युनिटद्वारे बटाटे आणि माती वेगळी करून काढले जातात .
  • बटाटे आणि मातीचे पृथक्करण करताना खडे, दगड आणि इतर अशुद्ध घटक देखील हाताने काढतात.
  • या प्रक्रियेनंतर बटाटे साठवणीच्या युनिटमध्ये गोळा होतात.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Seed Treatment in snake gourd

पडवळ/ वाळवंटी काकडी/ बालम काकडीचे बीजसंस्करण

  • चांगली गुणवत्ता आणि रोग व किडिपासून बचाव करण्यासाठी पेरणीपुर्वी बीजसंस्करण करणे आवश्यक असते.
  • बीजसंस्करण करण्यासाठी कार्बेन्डाजिम 12% + मॅन्कोझेब 63% बुरशीनाशक 2 ग्रॅम/किलोग्रॅम बियाणे या प्रमाणात वापरावे किंवा कार्बोक्सिन 37.5% + थायरम 37.5%  2 ग्रॅम/किलोग्रॅम या प्रमाणात वापरावे.
  • रस शोषणार्‍या किडीच्या नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रिड 600 एफ. एस. (48%) 1 एम.एल/कि.ग्रॅ. या प्रमाणात  वापरुन बीजसंस्करण करता येते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Role of Calcium in Garlic

लसूणच्या पिकात कॅल्शियमची भूमिका:-

  • कॅल्शियम हे लसूणच्या पिकासाठी महत्वपूर्ण पोषक तत्व असते आणि पिकाचे उत्पादन आणि गुणवत्ता यात त्याची महत्वाची भूमिका असते.
  • कॅल्शियम मुळांची स्थापना आणि कोशिकांच्या विस्तारातील वाढीसाठी पोषक असते. त्यामुळे रोपांची ऊंची वाढते.
  • ते रोग आणि थंडीसाठी पिकाची सहनशक्ती वाढवते. लसूणच्या पिकात शिफारसीनुसार कॅल्शियमची मात्रा देणे उत्पादन, गुणवत्ता आणि साठवण क्षमतेसाठी उत्तम असते.
  • कॅल्शियमची शिफारस केलेली मात्रा 4 किलोग्रॅम/ एकर किंवा मृदा परीक्षण अहवालानुसार ठरवलेली असते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Soil preparation for snake gourd farming

पडवळ/ बालम काकडीसाठी शेताची मशागत:-

  • पडवळ/ बालम काकडीचे पीक सर्व प्रकारच्या मातीत घेता येते.
  • पेरणीपुर्वी जमिनीची 3-4 वेळा नांगरणी करावी.
  • पडवळ/ बालम काकडीच्या शेतीसाठी पाण्याच्या निचर्‍याची उत्तम व्यवस्था लागते.
  • भरघोस उत्पादन आणि गुणवत्तेसाठी मातीत कम्पोस्ट खत मिसळावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share