कापसातील फॉस्फरसचा अभाव:-
फॉस्फरसचा अभाव असलेल्या झाडांच्या पानांचा आकार लहान आणि रंग गडद हिरवा असतो. अभावाची लक्षणे सर्वप्रथम कापसाच्या झाडाच्या खालील बाजूच्या किंवा जुन्या पानांवर दिसतात. पानांचा हिरवा रंग जास्त गडद होतो. त्यामुळे फॉस्फरसचा अभाव जाणवतो. फॉस्फरसचा तीव्र अभाव फक्त रोपांना खुरटूनच टाकत नाही तर दुय्यम फांद्या आणि बोंडांची संख्याही त्यामुळे कमी होते. फॉस्फरसचा अभावाने फुले उमलण्यात, फलधारणेत आणि परिपक्वतेत उशीर होतो. लहान पाने जास्त गडद हिरवी दिसतात. जुन्या पानांचा आकार लहान होतो आणि त्यांच्यात जांभळे आणि लाल रंगद्रव्य विकसित होते.
उपाय :- 12:61:00 किंवा 00:52:34 @100 ग्रॅम प्रति पम्प फवारावे.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share