Suitable climate and soil for Papaya Farming

पपईच्या लागवडीसाठी उपयुक्त हवामान आणि माती

पपईच्या लागवडीसाठी उपयुक्त हवामान –

  • पपईचे पीक उष्णकटिबंधीय असल्याने उच्च तापमान आणि अधिक आर्द्रतेचे हवामान त्याच्यासाठी उत्तम असते.
  • ते थंडी आणि वादळासाठी खूप संवेदनशील असते.
  • दिवस लांब असताना लागलेल्या पपईचा स्वाद आणि गुणवत्ता जास्त असते.
  • फुलोर्‍याच्या दिवसात अधिक पाऊस पडणे हानिकारक आणि खूप नुकसानकारक असते.

माती –  

  • पपई वेगवेगळ्या प्रकारच्या मातीत लावता येते.
  • परंतु पपईच्या पिकासाठी खूप उथळ आणि खूप खोल काळी माती उपयुक्त नसते.
  • पाण्याचा निचरा होणारी आणि अल्कली नसलेली मृदा पपईसाठी सर्वोत्तम असते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Why & how to apply FYM in soil?

शेतात सेंद्रिय खत (एफवायएम) कसे आणि का मिसळावे

  • देशभरातील शेतजमिनीपैकी 11% ते 76% पर्यन्त जमिनीत कार्बनिक कार्बनचा अभाव आढळून येतो.
  • शेणखत कार्बनिक कार्बनचा उत्तम स्रोत आहे.
  • मृदेतील जैविक कार्बन मातीची उर्वरकतेचा प्रमुख कारक आहे. त्यामुळे रोपांच्या योग्य वाढीसाठी आवश्यक असलेल्या जलधारण क्षमता, सरंध्रता यात सुधारणा होते.
  • शेणखत हे कार्बनिक खत आहे. ते शेतीत उर्वरकाप्रमाणे वापरले जाते. ते शेताची उर्वरकता वाढवते. उत्तम प्रतीच्या शेणखतात सामान्यता5% नायट्रोजन, 0.2% फॉस्फरस 0.5% आणि पोटॅश असते.
  • ते मातीतील सूक्ष्म पोषक तत्वे आणि पादप पोषक तत्वांची पूर्तता करते आणि त्यांची उपलब्धता वाढवते.
  • विघटनाच्या वेळी उत्सर्जित होणारा कार्बन डायऑक्साइड (CO2) आणि उष्णता मातीतील हानिकारक बुरशी आणि कीड नष्ट करतात.
  • पावसाच्या पाण्यामुळे लीचिंग होऊन मातीतील पोषक तत्वे नष्ट होतात. त्यामुळे नांगरणीपुर्वी शेतात उत्तम प्रतीचे शेणखत 8-10 टन प्रति एकर या प्रमाणात चांगल्या प्रकारे मिसळून द्यावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत  पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Suitable Soil and Climate for Onion

कांद्याच्या पिकासाठी उपयुक्त हवामान आणि माती:-

  • कांदा हे थंड हवामानातले भाजीपाल्याचे पीक आहे. ते सौम्य हवामानाच्या प्रदेशात घेतले जाते.
  • मान्सूनच्या काळात सरासरी पर्जन्यमान 75-100 से.मी. हून अधिक असते तेव्हा हे पीक होत नाही.
  • वनस्पतिक विकासासाठी आदर्श तापमान 12.8-23°C असते.
  • कंदांच्या विकासासाठी लांब दिवस आणि उच्च तापमान (20-25°C) आवश्यक असते.
  • कोरडे वातावरण कंदाच्या परिपक्वतेस अनुकूल असते.

माती:-

  • कांद्याची लागवड सर्व प्रकारच्या जमिनीत करता येते.
  • खोल भुसभुशीत लोम चिकणी जलोढ माती कांद्याच्या उत्पादनास सर्वोत्तम असते.
  • भरघोस पिकासाठी मातीत कार्बनिक पदार्थाचे प्रमाण अधिक असावे, पाण्याचा निचरा पुरेसा असावा आणि जमीन तणमुक्त असावी.
  • हे पीक उच्च आम्लीयता आणि क्षारीयतेसाठी संवेदनशील असते. त्यामुळे जमिनीचा आदर्श pH स्तर 5.8 ते 6.5 या दरम्यान असावा.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Suitable soil for Cabbage

पानकोबीसाठी उपयुक्त माती

  • पानकोबीच्या शेतीसाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी आणि पी. एच. स्तर 5.5 ते 6.8 असलेली हलकी आणि लोम माती उत्तम असते.
  • लवकर तयार होणार्‍या वाणांसाठी हलकी माती तर मध्य अवधी आणि उशिरा तयार होणार्‍या वाणांसाठी जड लोम माती उपयुक्त असते.
  • लवणीय मातीत बुरशीजन्य आणि जिवाणूजन्य रोगांची जास्त लागण होते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Climate and soil for sweet corn

स्वीट कॉर्नसाठी योग्य हवामान आणि माती

  • मक्याच्या पिकासाठी उष्ण हवामान उत्तम असते.
  • चांगल्या अंकुरणासाठी 18 °C हून अधिक तापमान असावे.
  • चांगल्या विकास आणि गुणवत्तेसाठी योग्य तापमान 24 °C ते 30 °C असते.
  • स्वीट कॉर्नसाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी, पुरेशी आर्द्र माती उपयुक्त असते.
  • स्वीट कॉर्नच्या चांगल्या उत्पादनासाठी 5.8 – 6.5 pH पी. एच. स्तर असावा.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Suitable soil for Cauliflower

फुलकोबीसाठी उपयुक्त माती

  • फुलकोबीच्या शेतीसाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी आणि पी. एच. स्तर 5.5 ते 6.8 असलेली हलकी आणि लोम माती उत्तम असते.
  • लवकर तयार होणार्‍या वाणांसाठी हलकी माती तर मध्य अवधी आणि उशिरा तयार होणार्‍या वाणांसाठी जड लोम माती उपयुक्त असते.
  • लवणीय मातीत बुरशीजन्य आणि जिवाणूजन्य रोगांची जास्त लागण होते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Soil selection for sorghum

ज्वारीसाठी मातीची निवड

  • ज्वारीच्या पिकासाठी मातीची जल धारण क्षमता चांगली हवी.
  • ज्वारीचे पीक लोम किंवा रेताड लोम मातीत घेतात.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Ideal soil for cowpea cultivation

चवळीसाठी आदर्श माती

  • पाण्याचा चांगला निचरा होणार्‍या सर्व प्रकारच्या मातीत चवळीची शेती करता येते पण या पिकासाठी लोम माती सर्वोत्तम असते.
  • लवणीय आणि क्षारीय जमीन चवळी किंवा चवळईच्या शेतीस उपयुक्त नसते.
  • वेलांच्या चांगल्या विकासासाठी मातीचा पी.एच स्तर 5.5-6.0 असावा.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Soil and Climate for coriander

धने/ कोथिंबीरीच्या लागवडीसाठी उपयुक्त माती आणि हवामान

  • पाण्याचा चांगला निचरा होणारी लोम माती धने/ कोथिंबीरीच्या लागवडीसाठी उत्तम असते.
  • पावसाळी शेतीसाठी pH स्तर 6-8 असलेली चिकणमाती उत्तम असते.
  • धने/ कोथिंबीरीच्या लागवडीसाठी 20-25 oC  हे उत्तम तापमान असते.
  • थंड आणि कोरड्या हवामानात हे पीक उत्तम येते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Soil and Climate in makkhan grass

मक्खन घास गवतासाठी उपयुक्त माती आणि हवामान

  • मक्खन घास गवत जिचा pH स्तर 6.5 ते 7 आहे अशा शर्व प्रकारच्या मातीत लावता येते.
  • मातीचे तापमान 18 oC हून अधिक असावे.
  • अंकुरण आणि मुळांच्या विकासासाठी मातीचे तापमान 24 oC ते 27 oC असावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share