- रोगमुक्त, प्रमाणित बियाणे वापरावे.
- ज्या शेतातील पिकात लागण झाली आहे तेथे किमान दोन वर्षे वाटाण्याचे पीक घेऊ नये.
- लागण झालेली रोपे उपटून नष्ट करावीत. त्यामुळे रोगाचा फैलाव रोखला जातो.
- कार्बोक्सिन 37.5 + थिराम 37.5% @ 2.5 ग्रॅ/ किलो बियाणे वापरून बीज प्रक्रिया करावी.
- दर आठवड्याला कसुगामायसिन 5% + कॉपर ऑक्सीक्लोराईड 45% डब्ल्यूपी 320 ग्रॅ/ एकर फवारावे किंवा
- किटाझिन 48.0 डब्ल्यू/ डब्ल्यू 400 मिली/ एकर फवारावे.
वाटाण्यावरील करपा रोगाचे निदान
- पाने, खोड आणि शेंगा रोगाची लागण होण्यास संवेदनशील असतात.
- शेंगांवर लालसर-तपकिरी रंगाचे लहान, थोडेसे पिचलेले डाग पडतात.
- हे डाग झपाट्याने वाढून रोपावर मोठे, गडद रंगाचे, पिचलेले व्रण तयार होतात.
- आद्र हवामानात या व्रणांमध्ये गुलाबी बीजाणू तयार होतात.
- पानांवरील लागणीमुळे विशेषतः वरील बाजूच्या शिरा काळ्या पडतात.
वाटाण्यावरील करपा आणि मर रोगाचे नियंत्रण
- निरोगी बियाणे वापरावे आणि कार्बनडाझिम + मॅन्कोझेब @ 250 ग्रॅम/ क्विंटल वापरून पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया करावी.
- फुलोरा येण्याच्या वेळी आणि त्यानंतर 10-15 दिवसांच्या अंतराने रोगग्रस्त पिकावर मॅन्कोझेब 75% @ 400 ग्रॅम/ एकर फवारावे. किंवा
- रोगग्रस्त पिकावर थियोफानेट मिथाईल 70% डब्ल्यूपी @ 250 ग्रॅम/ एकर फवारावे. किंवा
- रोगग्रस्त पिकावर क्लोरोथ्रलोनील 75% डब्ल्यूपी @ 250 ग्रॅम/ एकर फवारावे.
- रोगग्रस्त रोपे उपटून नष्ट करावीत.
- पाण्याचा निचरा होण्याची योग्य व्यवस्था करावी.
वाटण्यावरील करपा आणि मर रोग – लक्षणे आणि नियंत्रण
- पानांवर जांभळ्या रंगाचे लहान डाग पडतात. ते वाढून करड्या रंगाचे, विशिष्ठ आकाराचे गोलाकार बनतात.
- असेच व्रण खोडांवर देखील होतात आणि त्यांचा विस्तार वाढून खोड करड्या किंवा काळ्या रंगाचे होते.
- शेंगांवर तपकिरी किंवा करड्या रंगाचे अनियमित आकाराचे गोल व्रण पडतात.
मटारवरील माव्याचे नियंत्रण
- लहान किडे हिरवे असतात. वाढ झालेले किडे मोठ्या नासपतीच्या आकाराचे हिरव्या, पिवळ्या किंवा गुलाबी रंगाचे असतात.
हानी:-
- पाने, फुले आणि शेंगांमधून रस शोषतात.
- ग्रस्त पाने वाकतात किंवा अनियमित आकाराची होतात. कोंब खुरटतात आणि विकृत आकाराचे होतात.
- माव्यांनी सोडलेल्या चिकट्यावर भुरी वाढते.
Requirement of Irrigation in Pea
- योग्य प्रकारे अंकुरण होण्यासाठी जमीन कोरडी असल्यास पेरणीपूर्वी सिंचन करणे आवश्यक असते.
- सामान्यता हंगामाच्या मध्यकाळात किंवा उशिरा लागवड केलेल्या मटार पिकास 2-3 वेळा सिंचन करणे आवश्यक असते.
- फुलोरा येण्याच्या वेळी आणि शेंगात दाणे भरण्याच्या वेळी मातीत ओल असू नये. त्याने शेंगांच्या उत्पादन आणि गुणवत्तेवर विपरीत परिणाम होतो.
Share
Grading of green peas
- ताजी मटार विक्रीसाठी बाजारात पाठवताना जास्त पिकून पिवळ्या झालेल्या शेंगा, दाणे न भरलेल्या चपट्या शेंगा, रोगग्रस्त शेंगा आणि किडीने पोखरलेल्या शेंगा प्रतवारी करून वेगळ्या काढणे आवश्यक असते.
- ज्यांच्यावर प्रक्रिया करायची आहे अशा शेंगांची दाण्याच्या आकारानुसार चार प्रकारात प्रतवारी केली जाते.
- लहान आकाराचे दाणे सर्वोत्तम प्रतीचे समजले जातात.
Share
Harvesting of green pea
- हिरव्या शेंगांची तोडणी योग्य वेळी होणे अत्यावश्यक असते.
- भाजीसाठी वापर करण्यासाठी शेंगांचा गडद हिरवा रंग बदलून फिकट हिरवा होतो आणि त्यात दाणे भरतात तेव्हा तोडणी केली जाते.
- रोपाला हळुवार हाताळणे आवश्यक असते. तोडणी करताना शिरा दुखावल्यास उरलेल्या शेंगा योग्य प्रकारे विकसित होणार नाहीत.
Share
Management of Wilt in Pea
- कार्बोक्सिन 37.% + थीरम 37.5% @ 2 ग्रॅम/ किलोग्रॅम या प्रमाणात किंवा ट्रिकोडर्मा व्हीरिडी @ 5 ग्रॅम/ किलोग्रॅम या प्रमाणात वापरुन पेरणीपुर्वी बिजसंस्करण करा आणि तीव्र लागण झालेल्या भागात लवकर पेरणी करणे टाळा.
- तीन वर्षांनी पालटून पीक घ्या.
- रोगाचे वाहक असलेले तण नष्ट करा.
- पेरणीनंतर 15 दिवसांनी मायकोरिझा @ 4 किलोग्रॅम/ एकर या प्रमाणात वापरा.
- थियाफनेट मेथील 75% डब्ल्यूपी @ 300 ग्रॅम/ एकर या प्रमाणात फुलोरा येण्यापूर्वी फवारा.
- शेंगा तयार होण्याच्या वेळी प्रोपिकोनाझोल 25% ईसी @ 125 मिलि/ एकर या प्रमाणात फवारा.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
ShareSymptoms of Wilt in Pea
- मुळे काळी पडतात आणि त्यानंतर कुजतात.
- रोपाची वाढ खुंटते, पर्णसंभार पिवळा पडतो, पल्लव आणि पालवी खालील बाजूस वळते.
- संपूर्ण रोप मरते आणि खोड सुरकुतते.
Share