Nursery preparation in brinjal

वांग्याच्या पिकासाठी नर्सरीची तयारी

  • भारी मृदा असल्यास पाणी तुंबणार नाही यासाठी उंच वाफे बनवणे आवश्यक असते.
  • रेताड जमिनीत समतल जमीन करून पेरणी केली जाते.
  • सामान्यता उंच वाफ्यांचा आकार 3 x1 मी. आणि ऊंची 10 ते 15 से.मी. असणे आवश्यक असते.
  • दोन वाफ्यात सुमारे 70 से.मी. अंतर असावे. त्याने सिंचन, निंदणीसारखी आंतरिक कार्ये करणे सोपे जाते.
  • नर्सरी वाफे स्वच्छ आणि समतल असावेत.
  • उत्तम प्रतीचे शेणखत किंवा पाने कुजवून केलेले खत वाफे तैय्यार करताना मिसळावे.
  • नर्सरीत आर्द्र गलनरोगाने रोपे मरणे रोखण्यासाठी मॅन्कोझेब 75% WP @ 400-600 ग्रॅम/ एकर वापरुन वाफ्यात ड्रेंचिंग करावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

See all tips >>