भाजीपाल्यासाठी रोगमुक्त नर्सरीची निर्मिती करण्यासाठी सूचना

  • पेरणीसाठी निरोगी बियाणे वापरावे.
  • पेरणीपूर्वी शिफारस केलेली बुरशीनाशके वापरुन बिज प्रक्रिया करावी.
  • नर्सरी सतत एकाच शेतात घेणे टाळावे.
  • नर्सरीमधील मातीवर कार्बन्डाझिम 5 ग्रॅ/ चौ फुट वापरावे आणि दर आठवड्याला कार्बन्डाझिम 5 ग्रॅ/ 1 लीटर पाणी याप्रमाणे फवारावे.
  • उन्हाळी पेरणी करण्यापूर्वी वाफ्यावर 250 गेजचे पॉलिथिन अंथरून सूर्यप्रकाशाने वाफ्याला 30 दिवस संस्कारित करावे.
  • ट्रायकोडर्मा जैविक औषधाचा @ 500 ग्रॅ/ एकर केल्याने आद्रगलन (मर रोग) प्रभावीपणे रोखता येते.
Share

Nursery preparation in brinjal

वांग्यासाठी नर्सरी बनवणे

  • जड मातीत पाणी तुंबवणे रोखण्यासाठी उंच वाफे बनवणे आवश्यक आहे.
  • रेताड मातीत जमीन समतल करून बियाणे पेरावे.
  • सामान्यता उंच वाफ्यांचा आकार सुमारे 3 x1 मी. आणि ऊंची 10 ते 15 से.मी. असणे आवश्यक असते.
  • दोन वाफ्यात सुमारे 70 से.मी. अंतर ठेवल्यास सिंचन, निंदणी अशा आंतरक्रिया करणे सुलभ जाते.
  • नर्सरी वाफ्यांचा पृष्ठभाग साफ आणि समतल असावा.
  • वाफे बनवताना उत्तम प्रतीचे शेणखत किंवा कुजलेल्या पानांचे खत मातीत मिसळावे.
  • नर्सरीमध्ये आर्द्रगलन रोगाने रोपे मरण्याचा प्रतिबंध करण्यासाठी मॅन्कोझेब 75% WP @ 400-600 ग्रॅम/ एकर या प्रमाणात वापरुन चांगल्या प्रकारे वाफ्यांचे ड्रेंचिंग करावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Nursery Preparation Method for CauliFlower

फुलकोबीची नर्सरी तयार करण्याची पद्धत

  • बियाणे वाफ्यात पेरतात. वाफ्यांची ऊंची 10 ते 15 सेंटीमीटर आणि आकार 3*6 मीटर असावा.
  • दोन वाफ्यात 70 सेंटीमीटर अंतर ठेवल्याने अंतरक्रिया सहज करता येतात.
  • नर्सरीतील वाफ्यातील माती भुसभुशीत आणि समतल असावी.
  • नर्सरी वाफे बनवताना शेणखत 8-10 किलो/ वर्ग मीटर या प्रमाणात मिसळावे.
  • भारी मातीत उंच वाफे बनवून पाणी तुंबण्यावर उपाय करता येतो.
  • आद्र गलन रोगाने रोपांना होणार्‍या हानीला रोखण्यासाठी कार्बेन्डाजिम 50% डब्ल्यूपी चे 15-20 ग्रॅम /10 लि. पाण्यात मिश्रण बनवून मातीत मिसळावे किंवा थायोफिनेट मिथाइल 0.5 ग्रॅम/ वर्ग मीटर या प्रमाणात वापरुन ड्रेंचिंग करावे.
  • रोपांना किडीपासून वाचवण्यासाठी थायोमेथोक्सम 0.3 ग्रॅम/ वर्ग मीटर या प्रमाणात नर्सरी तयार करताना  घालावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

How to prepare Nursery for chilli

मिरचीच्या नर्सरीची तयारी कशी करावी

  • मिरचीसाठी नर्सरी बनवण्यासाठी योग्य वेळ 1 मे ते 30 मे हा असतो.
  • सर्वप्रथम नांगरणी करून माती भुसभुशीत करावी.
  • एक एकर क्षेत्रफळासाठी 60 वर्ग मीटर क्षेत्रफळाची आवश्यकता असते. या जागेत 3 मीटर लांब आणि 1.25 मीटर रुंद 16 ते नर्सरी वाफे बनवावेत.
  • 60 वर्ग मीटर क्षेत्रासाठी 750 gm डीएपी, 150 किलो शेणखत लागते.
  • बुरशीजन्य रोगांपसून बचाव करण्यासाठी थियोफॅनेट मिथाइल 0.5 ग्रॅम/ वर्ग मीटर या प्रमाणात मातीत मिसळावे.
  • मिरचीसाठी 100 ग्रॅम/ एकर या प्रमाणात बियाणे लागते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Soil solarization in chilli nursery

मिरचीच्या नर्सरीसाठी मातीचे सौरीकरण

  • बुरशीजन्य रोग आणि कीड इत्यादीपासून बचाव करण्यासाठी मिरचीच्या पिकाची नर्सरी तयार करण्यापूर्वी  उन्हाळ्यात सौरीकरण करावे.
  • सौरीकरण करण्यासाठी एप्रिल-मे हा योग्य काळ असतो कारण त्यावेळी वातावरणाचे तापमान 40ºC पर्यन्त वाढते.
  • सर्वप्रथम मातीला पाण्याने ओले किंवा संतृप्त करावे.
  • त्यानंतर सुमारे 5-6 आठवडे पूर्ण नर्सरीवर 200 गेजचे (50 माइक्रॉन) पारदर्शक  पॉलीथीन पसरावे.
  • पॉलिथीनच्या कडाना ओल्या मातीने लिंपावे. त्यामुळे आत हवा शिरणार नाही.
  • 5-6 आठवड्यांनी पॉलीथिन शीट काढावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Nursery bed preparation for Cabbage

पानकोबीसाठी नर्सरी बनवणे

  • बियाणे वाफ्यात पेरले जाते. सामान्यता 4 – 6 आठवडे वयाची रोपे पुनर्रोपित केली जातात.
  • वाफ्यांची ऊंची 10 ते 15 से.मी. असते आणि आकार 3 x 6 मी. असतो.
  • दोन वाफ्यात 70 से.मी. अंतर असते. त्यामुळे निंदणी सारखी आंतरिक कामे करणे सोपे जाते.
  • नर्सरीतील वाफ्यांची माती भुसभुशीत आणि समतल असावी.
  • नर्सरी वाफे तयार करताना 8-10 कि.ग्रॅ. शेणखत प्रति वर्ग मीटर मिसळावे.
  • जड मातीत उंच वाफे तयार करून पाणी तुंबण्याची समस्या सोडवता येते.
  • आर्द्र गलन रोगापासून होणार्‍या हानीचा बचाव करण्यासाठी थायोफेनेट मिथाइल 70% चे 30 ग्रॅम प्रति 15 लीटर पाण्यात मिश्रण बनवून मातीत मिसळावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Nursery preparation in brinjal

वांग्याच्या पिकासाठी नर्सरीची तयारी

  • भारी मृदा असल्यास पाणी तुंबणार नाही यासाठी उंच वाफे बनवणे आवश्यक असते.
  • रेताड जमिनीत समतल जमीन करून पेरणी केली जाते.
  • सामान्यता उंच वाफ्यांचा आकार 3 x1 मी. आणि ऊंची 10 ते 15 से.मी. असणे आवश्यक असते.
  • दोन वाफ्यात सुमारे 70 से.मी. अंतर असावे. त्याने सिंचन, निंदणीसारखी आंतरिक कार्ये करणे सोपे जाते.
  • नर्सरी वाफे स्वच्छ आणि समतल असावेत.
  • उत्तम प्रतीचे शेणखत किंवा पाने कुजवून केलेले खत वाफे तैय्यार करताना मिसळावे.
  • नर्सरीत आर्द्र गलनरोगाने रोपे मरणे रोखण्यासाठी मॅन्कोझेब 75% WP @ 400-600 ग्रॅम/ एकर वापरुन वाफ्यात ड्रेंचिंग करावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Nursery bed preparation for Tomato

टोमॅटोसाठी नर्सरी बनवणे:-

  • वाफ्यांची लांबी 3 मी., रुंदी 0.6 मी. आणि ऊंची 10-15 से.मी. असावी.
  • दोन नर्सरी वाफ्यात 70 से.मी. अंतर असावे. त्यामुळे नर्सरीत निंदणी, खुरपणी, सिंचन करणे इत्यादि अंतर्गत क्रिया सहजपणे करणे शक्य होईल.
  • नर्सरी वाफ्यांचा पृष्ठभाग भुसभुशीत, सपाट, उंच असावा आणि त्यात पाण्याच्या निचर्‍याची योग्य व्यवस्था असावी.
  • नर्सरी वाफ्यात पेरणी करण्यापुर्वी मॅन्कोझेब वापरुन मृदा संस्करण करावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Disease Free Nursery bed preparation and Season of Transplanting for Chilli

मिरचीच्या पिकासाठी रोगमुक्त नर्सरी बनवणे आणि पुनर्रोपणीसाठी सुयोग्य वेळ:-

  • शेताची नांगरणी करून माती भुसभुशीत करावी.
  • एक हेक्टर शेतासाठी 180 मि X 1.2 मि.(3 मि. X 1.2 मि चे छोटे वाफे) आकाराच्या नर्सरीची आवश्यकता असते.
  • उत्तम प्रतीचे शेणखत किंवा कम्पोस्ट एक बैलगाड़ी आणि 10 किलो सुपर फॉस्फेट मातीत चांगल्या प्रकारे मिसळावे.
  • पांढर्‍या मुंग्यांपासून बचाव करण्यासाठी मातीत 30 ग्रॅम एलड्रिन किंवा विरघळणारे डायएलड्रिन मिसळावे.
  • वाफ्यांची ऊंची सुमारे 15 से.मी. ठेवावी. त्यामुळे पाण्याचा उत्तम निचरा होईल.
  • आर्द्र गलन रोगापासून बचाव करण्यासाठी नर्सरीतील मातीवर बियाणे पेरण्यापूर्वी एक आठवडा रासायनिक उपचार करावे. त्यासाठी फॉर्मेलीनची (फॉर्मेलडिहाईड 40%) 1:100 प्रमाणातील मात्रा वापरावी.
  • निरोगी बियाणे वापरावे. कार्बेन्डाझिम+ मॅन्कोझेबची मात्रा 75% 2 ग्रॅम/किलों बियाणे या प्रमाणात वापरुन बीजसंस्करण करावे.
  • एकाच जागी पुन्हा पुन्हा नर्सरी बनवू नये.
  • जैविक नियंत्रक ट्रायकोडरमा विरिडीची मात्रा 1.2 किलो/हेक्टर प्रमाणात वापरावी.

पुनर्रोपणीसाठी सुयोग्य वेळ:-

  • ऑगस्टचा महिना मिरचीच्या पेरणीसाठी सर्वोत्तम असतो. त्याखालोखाल सप्टेंबर महिना उत्तम असतो.
  • ऑगस्ट महिन्यात पेरणी केल्यास रोपांची वाढ आणि उत्पादन यात वृद्धी होते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Disease Free Nursery Raising For Tomato

टोमॅटोच्या पिकासाठी रोगमुक्त नर्सरी बनवणे:-

  • पेरणीसाठी निरोगी बियाणे वापरावे.
  • पेरणीपुर्वी शिफारस केलेले जिवाणूनाशक वापरुन बीजसंस्करण करावे.
  • एकाच प्लॉटमध्ये पुन्हापुन्हा नर्सरी बनवू नये.
  • नर्सरीच्या पृष्ठभागावरील मातीचा कार्बेन्डाझिम 5 ग्रॅम/वर्ग मी. वापरुन उपचार करावा आणि त्याच रसायनाच्या 2 ग्रॅम/ लीटर पाणी मात्रेने नर्सरीत दर 15 दिवसांनी ड्रेंचिंग करावे.
  • मृदा सोर्यकरण करण्यासाठी पिकाच्या पेरणीपुर्वी उन्हाळ्यात नर्सरी वाफ्याला 250 गेजच्या पॉलीथीन शीटने 30 दिवस झाकून ठेवावे.
  • आद्रगलन रोगाच्या जैव-नियंत्रणासाठी ट्रायकोड्रमा विरिडी 1.2 किलोग्रॅम/ हे. ची मात्रा द्यावी.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share