वृद्धांसाठी मोफत होणार तीर्थयात्रा, सरकारची योजना जाणून घ्या

मध्य प्रदेश सरकारने पुन्हा एकदा ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’ सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत तीर्थ दर्शन योजना ट्रेन चालवली जात आहे, ज्यामुळे वृद्धांना देशातील सर्व तीर्थक्षेत्रांचा मोफत प्रवास करता येईल. यावेळी सरकारने वृद्धांसाठी काशीधामची यात्रा करण्याचे नियोजन देखील केले आहे त्यासाठी याची तारीख 19 एप्रिल ते 22 एप्रिल ही निश्चित करण्यात आली आहे. प्रवासासाठी तीर्थ दर्शन योजना ट्रेन भोपाळच्या रानी कमलापति स्टेशनवरुन विदिशा मार्गे काशीला जाईल.

या योजनेनुसार 60 वर्षांवरील वृद्ध आणि अपंग व्यक्ती प्रवासासाठी अर्ज करू शकतात. यासोबतच महिलांना वयात दोन वर्षांची सूट देण्यात आली आहे, म्हणजेच 58 वर्षांवरील महिलाही या योजनेचा लाभ घेऊ शकतात. याशिवाय, या योजनेअंतर्गत 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि 80% पेक्षा जास्त अपंग व्यक्तींनाही त्यांच्यासोबत प्रवासात सहाय्यक घेण्याची परवानगी असेल. एवढेच नाही तर या योजनेअंतर्गत ट्रेनमध्ये प्रवाशांना खाण्यापिण्याच्या विविध प्रकारच्या सुविधाही देखील दिल्या जाणार आहेत.

या योजनेची माहिती तीर्थ दर्शन योजनेची वेबसाइट http://www.tirthdarshan.mp.gov.in/ येथे दिली आहे. या लिंकवर जाऊन अर्ज डाउनलोड करा. फॉर्मची प्रिंट काढा आणि काळजीपूर्वक भरा. यानंतर, आवश्यक कागदपत्रांसह फॉर्म तहसील किंवा उप-तहसील कार्यालयात जमा करा.

स्रोत: नई दुनिया

तुमच्या जीवनाशी निगडीत अशाच महत्त्वाच्या बातम्या आणि शेतीशी संबंधित सर्व माहितीसाठी दररोज ग्रामोफोनचे लेख वाचत राहा आणि हा लेख खाली देलेल्या शेअर बटणाद्वारे तुमच्या मित्रांसह देखील सामायिक करा.

Share

See all tips >>