20 ऑगस्टपासून भारतीय रेल्वेकडून शेतकऱ्यांचे उत्पादन वेगवेगळ्या ठिकाणी पोचविण्यासाठी ‘किसान ट्रेन’ सुरू करण्यात आली आहे. या ट्रेनद्वारे फळेे, फुले, भाज्या, दूध आणि दही यांसारखी शेतकर्यांची उत्पादने लवकरच देशाच्या इतर भागांत पोहाेचविली जातील.
ही ट्रेन महाराष्ट्रातील देवलाली येथून सुरू होईल आणि बिहारमधील दानापूरला जाईल. ही ट्रेन 32 तासांत एकूण 1519 किमी अंतर पार करेल. या ट्रेनमुळे मध्य प्रदेशातील शेतकरीही लवकरच आपले उत्पादन दुसर्या ठिकाणी पोहचवू शकतील.
रेल्वे मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांना त्यांचा फायदा होण्यासाठी ही ट्रेन मध्य प्रदेशातील अनेक स्थानकांवर थांबविण्यात येणार आहे. ही ट्रेन मध्य प्रदेशातील बुरहानपूर, खंडवा, इटारसी, जबलपूर, सतना, कटनी आणि माणिकपूर इत्यादी स्थानकांवर थांबेल.
स्रोत: झी न्यूज
Share