Management of Little Leaf in Brinjal

वांग्यावरील पर्ण संकोचन रोग:-

लक्षणे:-

  • या रोगाची लागण झालेल्या रोपाची पाने सुरूवातीला फिकट पिवळ्या रंगाची होतात.
  • पानांचा आकार बदलून ती आकसतात.
  • रोगग्रस्त रोपांना निरोगी रोपांहून जास्त फांद्या, मुळे आणि पाने फुटतात.
  • पानाचे आणि फांद्यांचे जोड आकुंचन पावतात त्याने झाड खुरटते.
  • झाडाला फुले येत नाहीत, आलीच तर त्यांचा रंग हिरवा असतो किंवा ती रंगहीन होतात.
  • रोगग्रस्त झाडाला फळे लागत नाहीत.

प्रतिबंध:-

  • ट्रॅप पीक लावावे.
  • रोगग्रस्त रोपे उपटून नष्ट करावीत.
  • लीफ हॉपर किडीचा उपद्रव होणार नाही अशा वेळी पेरणी करावी.
  • लीफ हॉपर किडीच्या नाशासाठी डायमिथोएट 2 मिली. प्रति ली पाण्यात मिसळून फवारावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

See all tips >>