Control of Fruit fly in Bitter Gourd

कारल्यातील फळमाशीचा बंदोबस्त

ओळख:-

  • अंडी 1.0 ते 1.5 मिमी. लांब, लाटण्याच्या आकाराची के पांढरी असतात आणि त्यांच्या कडा पातळ असतात.
  • पूर्ण विकसित लार्वा 5 ते 10 मिमी. लांब, दंडगोल असून त्यांचा पुढील भाग निमुळता आणि मागील भाग  बोथट आणि पांढर्‍या रंगाचा असतो.
  • प्यूपा 5 ते 8 सेमी. लांब, नळीच्या आकाराचा आणि धुरकट रंगाचा असतो.
  • पूर्ण वाढ झालेल्या माशीचे शरीर लाल-करडे असते. तिचे पंख पारदर्शक असतात आणि पारदर्शक आणि चमकदार पंखांवर पिवळट करड्या रंगाचे पट्टे असतात.
  • पूर्ण वाढ झालेली माशी 4 ते 5 मिमी. लांब असते. पूर्ण वाढ झालेली मादी माशी आपल्या पंखांना 14 ते 16 मिमी. तर नर माशी आपल्या पंखांना 11 ते 13 मिमी. पर्यन्त पसरवू शकते.

हानी:-

  • लार्वा फळात भोक पाडून त्यातील रस शोषतात.
  • त्याने ग्रासलेले फळ खराब होऊन गळते.
  • माशी सहसा कोवळ्या फळांवर अंडी देते.
  • माशी जेथे अंडी देते तेथे फळात भोक पाडून त्याला हानी पोहोचवते. त्या भोकामधून फळाचा रस पाझरताना दिसतो.
  • शेवटी भोक पडलेले फळ सडू लागते.
  • लार्वा फळात भोक पाडून गर आणि कोवळ्या बिया खातात. त्यामुळे फळ पिकण्यापूर्वीच गळून पडते.

नियंत्रण:-

  • लागण झालेल्या फळांना गोळा करून नष्ट करावे.
  • अंडी देणार्‍या माशांचा उपद्रव रोखण्यासाठी शेतात फेरोमेन ट्रॅप लावावेत. त्या फेरोमेन ट्रॅपमध्ये में माशा मारण्यासाठी 1% मिथाईल इझीनोल किंवा सिंत्रोनेला तेल किंवा अॅसीटिक आम्ल किंवा लॅक्टिक आम्हाचे मिश्रण ठेवावे.
  • परागणानंतर लगेचच तयार होत असलेल्या फळांना पॉलिथीन किंवा कागदाने झाकावे.
  • या माशांचे नियंत्रण करण्यासाठी कारल्याच्या शेतात ओळींच्या मध्ये मक्याची रोपे लावावीत. या रोपांची ऊंची जास्त असल्याने माशा पानांखाली अंडी देतात.
  • ज्या भागात फळमाशीचा जास्त उपद्रव आहे तेथे खतामध्ये कार्बाइल भुकटी 10% मातीत मिसळावी.
  • डायक्लोरोवास कीटनाशकाचे 3 मिली. प्रति ली. या प्रमाणात पाण्यात मिश्रण करून फवारावे.
  • उन्हाळ्यात खोल नांगरणी करून जमिनीतील माशांची अंडी सुप्तावस्थेत नष्ट करावी.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

See all tips >>