कांद्याच्या पिकासाठी उपयुक्त हवामान आणि माती:-
- कांदा हे थंड हवामानातले भाजीपाल्याचे पीक आहे. ते सौम्य हवामानाच्या प्रदेशात घेतले जाते.
- मान्सूनच्या काळात सरासरी पर्जन्यमान 75-100 से.मी. हून अधिक असते तेव्हा हे पीक होत नाही.
- वनस्पतिक विकासासाठी आदर्श तापमान 12.8-23°C असते.
- कंदांच्या विकासासाठी लांब दिवस आणि उच्च तापमान (20-25°C) आवश्यक असते.
- कोरडे वातावरण कंदाच्या परिपक्वतेस अनुकूल असते.
माती:-
- कांद्याची लागवड सर्व प्रकारच्या जमिनीत करता येते.
- खोल भुसभुशीत लोम चिकणी जलोढ माती कांद्याच्या उत्पादनास सर्वोत्तम असते.
- भरघोस पिकासाठी मातीत कार्बनिक पदार्थाचे प्रमाण अधिक असावे, पाण्याचा निचरा पुरेसा असावा आणि जमीन तणमुक्त असावी.
- हे पीक उच्च आम्लीयता आणि क्षारीयतेसाठी संवेदनशील असते. त्यामुळे जमिनीचा आदर्श pH स्तर 5.8 ते 6.5 या दरम्यान असावा.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share