प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून कोट्यावधी शेतकर्यांना लाभ होत आहे. या योजनेचा सातवा हप्ता लवकरच शेतकऱ्यांना मिळणार आहे. तथापि, सातव्या हप्त्यापूर्वीच केंद्र सरकारने या योजनेत काही बदल केले आहेत, ज्याची तुम्हाला माहिती व्हायला हवी.
पंतप्रधान किसान सन्मान निधीचा लाभ घेणार्या शेतकर्यांना यापुढे पंतप्रधान किसानधन योजनेसाठी कोणतीही कागदपत्रे द्यावी लागणार नाहीत. या योजनअंतर्गत शेतकरी पंतप्रधान-किसान योजनेतून मिळणाऱ्या लाभामध्ये थेट योगदान देण्यास निवडू शकतात.
किसान क्रेडिट कार्ड पीएम किसान योजनेशी जोडले गेले आहे. यातून पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या लाभार्थ्यांना केसीसी करणे सोपे झाले आहे.
शेतकर्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर, त्यांच्याकडे आधारकार्ड असणे आवश्यक आहे. आधारकार्डशिवाय आपण या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या सुरूवातीस केवळ 2 हेक्टर किंवा 5 एकर शेती असणारे शेतकरी त्याचा फायदा घेऊ शकले हाेते, परंतु आता मोदी सरकारने हे बंधन संपुष्टात आणले आहे.
स्रोत: इंडिया डॉट कॉम
Share