आपण अद्याप प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत नोंदणी केली नसेल तर, ही बातमी तुमच्यासाठी आहे. ज्या शेतकऱ्यांना आतापर्यंत या योजनेचा लाभ मिळू शकला नाही त्यांना 31 ऑक्टोबरपूर्वी या योजनेत नोंदणी करून योजनेचा लाभ मिळू शकेल. त्यांचा अर्ज स्वीकारल्यास त्यांना नोव्हेंबरमध्ये दोन हजार रुपयांचा हप्ता तसेच डिसेंबरमध्ये आणखी एक हप्ता मिळेल.
केंद्र सरकारने सुरू केलेल्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी तीन हप्त्यांमध्ये 6 हजार रुपये दिले जातात. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, या योजनेतून आतापर्यंतचे हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठविण्यात आले असल्याचे स्पष्ट केले आहे.
स्रोत: कृषी जागरण
Share