केंद्र सरकार द्वारा चालवली जाणारी, पी.एम. किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत गरजू शेतकरी बांधवांना आर्थिक मदत दिली जाते. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना वर्षाकाठी 6 हजार रुपये दिले जातात. हे 6 हजार रुपये 2-2 हजार रुपयांच्या 3 हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांना दिले जातात.
या योजनेअंतर्गत आतापर्यंत 7 हप्ते जमा करण्यात आले असून आता आठव्या हप्ताची प्रतीक्षा आहे. मीडिया रिपोर्टनुसार त्याचा आठवा हप्ता मार्च अखेरपर्यंत चालू केला जाईल.
या योजनेअंतर्गत आपले नाव तपासण्यासाठी पी.एम. किसान योजनेच्या संकेतस्थळावर https://pmkisan.gov.in/ शेतकरी कोर्नर वरती क्लिक करा. त्यानंतर लाभार्थी स्थितीवर क्लिक केल्यानंतर आता नवीन पेज उघडेल त्यामध्ये आपला आधारकार्ड नंबर, मोबाईल नंबर, बँक खाते क्रमांक सत्यापित करा. त्यानंतर आपल्या खात्यात पैसे आले आहेत की नाही हे आपल्याला कळेल.
स्रोत: किसान जागरण
Share