कागदपत्रांमुळे ‘पीएम किसान’ योजनेअंतर्गत शेतकर्‍यांची रक्कम थांबली, ऑनलाईन अपलोड करा आणि वार्षिक 6000 मिळवा

शेतकऱ्यांसाठी भारत सरकारची महत्वाकांक्षी योजना ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी’ योजनेअंतर्गत मिळालेला सहा हजार रुपयांचा पहिला हप्ता गेल्या काही दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला आहे. परंतु, काही शेतकर्‍यांना हा हप्ता मिळू शकलेला नाही. कारण त्यांच्या अर्जात अडथळे आले असतील किंवा कागदपत्रांची कमतरता असू शकते.

या योजनेअंतर्गत शेतकरी ऑफलाइन व ऑनलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकतात. बर्‍याच वेळा अर्ज स्वीकारला जात नाही, कारण आधारकार्ड, मोबाइल नंबर किंवा बँक खात्याची माहिती दिलेली नसते.

अशा परिस्थितीत शेतकरी आपली कागदपत्रे घरून ऑनलाइन अपलोड करू शकतात. यासाठी शेतकर्‍यांना pmkisan.gov.in या लिंकवर ‘शेतकरी कॉर्नर’ वर जाऊन त्यांची कागदपत्रे अपलोड करावी लागतील.

स्रोत: जनसत्ता

Share

See all tips >>