आपल्या सर्वांना माहित आहे की, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 2000-2000 रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये वार्षिक 6,000 रुपये दिले जातात. परंतु कदाचित आपणास हे माहित नसेल की, या योजनेत सामील झाल्यानंतर शेतकऱ्यांना आणखी काही फायदे अगदी सहज मिळतात.
पंतप्रधान किसान योजनेशी संबंधित शेतकऱ्यांनाही किसान क्रेडिट कार्ड अगदी सहज मिळते. प्रत्यक्षात आता किसान क्रेडिट कार्डदेखील पंतप्रधान किसान योजनेत जोडले गेले आहे.
याशिवाय, पी.एम. किसान योजनेशी संबंधित शेतकऱ्यांनाही पेन्शन योजनेचा लाभ सहज मिळतो. हे नमूद करणे आवश्यक आहे की, पेन्शन योजनेचे नाव आहे. पी.एम. किसानधन योजना, ज्यासाठी सहसा बऱ्याच कागदपत्रांची आवश्यकता असते. परंतु आपण पंतप्रधान किसान योजनेशी संबंधित असल्यास पेन्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कोणत्याही कागदपत्रांची गरज भासणार नाही.
स्रोत: ज़ी बिजनेस
Share